Tuesday, June 1, 2021

सत्ताधारी पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांवरउपोषणाची वेळे !सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांची मनमानी ?

सत्ताधारी पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांवरउपोषणाची वेळे !
सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांची मनमानी ?
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक ३१ मे २०२१ रोजी जिल्हा परिषद सदस्या सरिता सुतार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांच्या व्दारे होत असलेल्या, एडवण जिल्हा परिषद गट अंर्तगत टेंभिखोडावे ते सफाळे दरम्यान अंदाजे ९ किलोमीटर लांबीचा रस्ता तयार होत असून, लोकप्रतिनिधी या नात्याने, आपल्या विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागा व्दारे होणाऱ्या कामाबद्दल अनेक तक्रारी त्यांनी स्व:ता कनिष्ठ अधिकारी वर्गाला सांगुन सुध्दा, कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. 
जिल्हा परिषद सदस्या सरिता सुतार यांनी कार्यकारी अभियंता श्री किणी साहेब यांनाही समक्ष भेटुन, माकणे येथील होत असलेल्या गटारीचे बांधकाम बाबत सांगितले. तरही मूलभूत सुविधा कडे व नैसर्गिक पाण्याच्या वाहणाऱ्या प्रवाहा कडे दुर्लक्ष करीत बांधकाम सुरू आहे.       माकणे येथे गटारी साठी, जागा उपलब्ध असून सुध्दा लहान व अरुंद स्वरूपात, रस्ताच्या एका बाजूने बांधकाम सुरू आहे. पुर्वी या ठिकाणी रस्ताच्या दुतर्फा गटार होते. पाणी वाहुन जाण्यासाठी मार्ग अरुंद झाल्यानंतर, तोक्ते चक्री वादळाच्या पुराचे पाणी शेतकर्‍यांच्या शेतातून वाहू लागले, त्यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. पावसाळ्यात सुध्दा पावसामुळे हिच परिस्थिती निर्माण होऊन गांवक-यांच्या घरा दारात पाणी जाऊन होणार्‍या नुकसानीस कोण जबाबदार राहणार. टेंभिखोडावे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जांचे होत आहे असे सरिता सुतार यांचे सांगणे आहे. वरिल प्रश्नांची उत्तरे लेखी निवेदन दिल्या पासून दोन दिवसा पर्यंत त्याना समाधान कारक रित्या मिळाली नाही तर त्या, सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांच्या समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा लेखी पत्र व्दारा कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांना दिला आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...