Tuesday, June 1, 2021

कोकुयो कॅम्लिन लिमिटेड तर्फे टिमा हॉस्पिटल, बोईसर येथे हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लांट भेट

*कोकुयो कॅम्लिन लिमिटेड तर्फे टिमा हॉस्पिटल, बोईसर येथे हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लांट भेट*

आज (प्रतिनिधी)दि. 01 जून 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता तारापूर येथील कोकुयो कॅम्लिन कंपनीतर्फे टिमा हॉस्पिटल, बोईसर येथे *कम्पनी चे उपाध्यक्ष श्री. श्रीराम दांडेकर टिमा हॉस्पिटलचे ट्रस्टी श्री. पोद्दार आणि बोईसर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. सुरेश कदम यांच्या हस्ते उदघाटन आणि हस्तांतरण सोहळा पार पडला.* 
 याप्रसंगी टिमा चे श्री. गुप्ता, उदयन सावे, श्री. निलेश पाटील तसेच  कॅम्लिन चे किशोर वठे, अजित राणे आणि लायन्स क्लब तर्फे डॉ. सूर्यकांत संखे व डॉ. रत्नाकर माने उपस्थित होते.  
या प्लान्टमुळे जवळपास 20 ते 25 बेडसाठी अविरत प्राणवायूचा साठा उपलब्ध होऊ शकेल असे सांगण्यात आले. 4.5 हजार लिटर प्राणवायू प्रति तास निर्माण करण्याची क्षमता या प्लांटमध्ये आहे. याचा फायदा परिसरातील गरजू पेशंट्सना होऊन त्यांचे प्राण वाचण्यास मदत होऊ शकते.  
याप्रसंगी टिमा हॉस्पिटल चे नोडल अधिकारी डॉ. मनोज शिंदे आणि कोकुयो कॅम्लिन कम्पनी चा मेंटेनन्स स्टाफ उपस्थित होता. उपस्थित सर्वांनी या सामाजिक व विधायक कार्यासाठी श्री. दांडेकर आणि कोकुयो कॅम्लिन व्यवस्थापनाचे कौतुक करून अजित राणे यांनी सर्वांचे आभार मानले. 

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...