Monday, June 21, 2021

सहकारी संस्थेने लेखापरिक्षण 31 जुलै पर्यंत पुर्ण करावे

*सहकारी संस्थेने लेखापरिक्षण 31 जुलै पर्यंत पुर्ण करावे*

ठाणे दि.21 (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81(1)(अ) नुसार प्रत्येक सहकारी संस्थेने प्रत्येक वर्षांचे वैधानिक लेखापरिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नियुक्त केलेल्या सहकार विभागाच्या नामतालीकेवरील लेखापरिक्षकांकडून अथवा निर्बंधकाने नियुक्त केलेल्या लेखापरिक्षकांकडून दि. 31 जुलै पर्यंत पुर्ण करुन घेणे आवश्यक आहे. 
ज्या सहकारी संस्था, सन 2020-21 चे वैधानिक लेखापरिक्षण दि. 31.07.2021 पुर्वी पुर्ण करुन घेण्यास असमर्थता दर्शवतील अथवा टाळाटाळ करतील किंवा संबंधित लेखापरिक्षकांस विहीत मुदतीत लेखापरिक्षणासाठी दप्तर उपलब्ध करुन देण्यास कुचराई करतील अशा सर्व सहकारी संस्थांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मधील तरतुदीनुसार संस्था नोंदणी रद्द करणे, संचालक मंडळ बरखास्त करणे, संबंधित अधिकारी/पदाधिकारी पदावर राहण्यास अपात्र ठरणे तसेच संबंधितांवर उचित कायदेशिर शिक्षा व आर्थिक स्वरुपाचा दंड ई. स्वरुपाची निबंधकांकडून कारवाई करण्यात येईल.
सर्व वैधानिक लेखापरिक्षकांनी यांनी (सनदी लेखापाल/फर्म/प्रमाणित लेखापरिक्षक) त्यांची नियुक्ती झालेल्या संस्थेचे सन 2020-21 चे लेखापरिक्षण विहीत मुदतीत दि. 31.07.2021 पुर्वी पुर्ण करण्यात टाळाटाळ अथवा कुचराई केल्यास तसेच सबळ कारणाशिवाय विहित मुदतीत पुर्ण न केल्यास संबंधित लेखापरिक्षक सहकार कायदा व नियमामधील तरतुदीनुसार उचित कारवाईस पात्र राहतील. ही बाब संबंधित लेखापरिक्षकांनी गांभिर्याने घेणे आवश्यक आहे. अन्यथा अशा वैधानिक लेखापरिक्षकांचे नाव सहकार खात्याचे लेखापरिक्षक नामतालीकेवरुन कमी करणे बाबत कारवाई करण्यात येईल. असे जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-1, सहकारी संस्था, ठाणे यांनी कळविले आहे

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...