कृषि संजीवनी मोहीम 1 जुलै 2021 पर्यंत साजरी करण्यात येणार
पालघर (प्रतिनिधी)दि. 22 :- कृषि तंत्रज्ञानामधील छोटीशी सुधारणा देखील पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करु शकते. खरीप हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यातील कृषि विभागाचे अधिकारी/कर्मचारी, कृषि विभाग- जिल्हा परिषद, कृषि विद्यापीठे/कृषि विज्ञान केंद्रे यांचे शास्त्रज्ञ, कृषिमित्र यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.
दि. 21 जुन 2021 ते 01 जुलै 2021 या कालावधीत प्रत्येक दिवशी महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन 'कृषि संजीवनी मोहीम' साजरी करण्यात येणार आहे.
1) दि. 21 जून 2021- भात रोपवाटिका कीड रोग मार्गदर्शन करणे
2) दि. 22 जून 2021 - बीजप्रक्रिया
3) दि. 23 जून 2021 - जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर
4) दि. 24 जून 2021 - सुधारित भात लागवड तंत्रज्ञान
5) दि. 25 जून 2021 - विकेल ते पिकेल
6) दि. 28 जून 2021 - महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार
7) दि. 29 जून 2021 - तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतक-यांचा सहभाग
8) दि. 30 जून 2021 -जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना
9) दि. 01 जुलै 2021 - कृषी दिन आणि मोहिमेचा समारोप कार्यक्रम
या मोहिमा कालावधीमध्ये संबंधित विषयाबाबत राज्यभर प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. गावोगावी शेतीशाळा, चर्चासत्र, वेबिनार, प्रात्यक्षिके, सभा प्रशिक्षण, शिवारफेरी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचे सुध्दा मार्गदर्शन या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी कृषि संजीवनी मोहीमेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधुंना करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषि सहायक तसेच नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment