कामधेनु सोसायटी माकणे, व
सफाळे पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मदत
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) समाजाचे आपण एक घटक असून, आजच्या करोना सारख्या महामारी रोगाच्या काळात, महामारीला आळा घालण्यासाठी " ब्रेक द चेन " च्या अनुशंगाने लाॅक डाउन परिस्थितीत ओढवलेल्या स्थितीत, अनेक हाताना कामकरण्याची ईच्छा असून सुध्दा घरातच नाईलाजाने बसुन राहवे लागले आहे. सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करताना, रोजचे हातावर पोट असलेल्या गोर गरीब मजुर वर्गाला, घरातील चूल कशी पेटणार यांची चिंता पडत आहे. परंतु आजही समाजात अनेक दानशूर व्यक्ती असून, समाजाचे आपण एक घटक असून, ज्या समाजाने आपणास घडविले त्या समाजचे आपण एक देणेदार आहोत,
या भावनेने गोरगरीबांना मदत करणारे अनेक हात आजही समाजात पुढे येत आहेत.कामधेनु सोसायटी मौजे. माकणे ता,जि पालघर त्यातलीच एक आहे. अश्या वेळी सदैव जनतेच्या सेवेसाठी, अहोरात्र झटणारे पोलीस दल कसे मागे राहणार. कामधेनु सोसायटी माकणे व सफाळे पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विध्यमाने दिनांक २ मे २०२१ रोजी मौजे. तांदुळवाडी ता,जि पालघर हद्दीतील " आचार्य पाडा व डोंगर पाडा " येथील एकूण ८० कुटूंबाला जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले.
या प्रसंगी श्री. दिलीप सुरेश तरे सरपंच ग्रामपंचायत माकणे, श्री. रमेश चावरा सरपंच ग्रामपंचायत तांदुळवाडी, श्री पंकज पाटील पो, उपनिरीक्षक सफाळे पो, ठाणे. श्री कैलास शेळके पो. ना. सफाळे पो. ठाणे. श्री जतिन कदम सर सफाळे. संतोष काकड, विश्वनाथ पाटील, रवि जाबर ग्रामस्थ तांदुळवाडी. यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. कार्यक्रमाचे आयोजक व कार्यक्रम यशस्वी करणारे कामधेनु सोसायटीचे पदाधिकारी व सामाजिक कार्यात कार्यरत राहणारे विशाल साखरे, नंदकुमार म्हात्रे, राजेंद्र पाटील माजी ग्रा,पं.सदस्य, गिरीश किर्ती, उदय बारोट, अविनाश गुरव, प्रतिक धाडवे अभिलाष काटे, प्रदीप कनोजिया, राज रांगणेकर, भावेश भोईर, किरण वैती, मनोज पाटील, यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य होते. तर सचिन पाटील व प्रदीप पाटिल यांचे विषेश सहकार्य होत.
No comments:
Post a Comment