पंचम कोळंबी प्रकल्पात चोरांचा पुन्हा शिरकाव !
सफाळे ( प्रतिनिधी )
दिनांक २ मे २०२१ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मौजे वेढी येथील पंचम कोळंबी प्रकल्पातील फ्रेश वॉटर पाँड नंबर १, (मौजे विराथन बुद्रुक हद्दीतील ) जागी. यातील आरोपी १ ) जयेश दिनकर कारभारी वय वर्ष २९ , २ ) विकास पांडुरंग किणी वय वर्ष ४२, ३ )बिपिन सिताराम भगत वय वर्ष ३३, सर्व राहणार वैतीपाडा, विराथन बुद्रुक ता,जि पालघर. यांनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने पंचम कोळंबी प्रकल्पातील फ्रेश वॉटर पाँड क्रमांक १ मधील, २० किलो वजनाची शिलोन प्रकारची मच्छी ( अंदाजे किंमत ४,००० /- रूपये ) चोरी केली. या बद्दल फिर्यादी शंकर बिमल दे वय वर्ष ३६ , पंचम कोळंबी प्रकल्प टेक्निशियन सुपरवायझर, राहणार चटाळे पो. आगरवाडी ता,जि पालघर. यांनी सफाळे पोलीस ठाणे, गुन्हा रजि,न. २५ /२०२१ प्रमाणे नोंद केली आहे .
सफाळे पोलीस ठाणे , यांनी दिनांक २ मे रोजी चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला असून, ( २० किलो वजनाची सिलोन मच्छी ) मच्छी चोरी केली म्हणून व तसेच मा. मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेश क्र. DMU / 2020 / CR. 92 / DisM - 1 दिनांक २९ मार्च २०२१ नुसार काढण्यात आलेल्या, राज्यात संचारबंदी आदेशाचा भंग केला म्हणून भा.द.वि.सं.कलम ३७९,३४,१८८ प्रमाणे अटक करण्यात येऊन, पालघर कोर्टात हजर केले असताना मा. न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ अधिकारी यांच्या अधिपत्याखाली व सफाळे पोलीस ठाणे येथील प्रभारी अधिकारी श्री संदीप कहाळे सहा,पो निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.ना.श्री के.बी.शेळके हे करीत आहे.
No comments:
Post a Comment