सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सफाळे पोलिस स्टेशन मधील कार्यरत महिला अंमलदार, महिला पोलिस पाटील, महिला सफाई कामगार यांचा पोलिस स्टेशन मधील कार्यरत असलेल्या प्रभारी अधिकारी वर्गाकडून महिलांना साडी, पुष्पगुलाब, व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
महिला दिनानिमित्त सफाळे पोलिस स्टेशनचे दिवस भराचे संपूर्ण कार्य महिला कर्मचारी यांनी संभाळून, पोलिस स्टेशनला येणाऱ्या तक्रारदार महिलांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करून तक्रारी दाखल करून घेण्यात आल्या.
पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत महिला अंमलदार व पोलिस पाटील यांनी मी खाकी का स्वीकारली यावर आपले मनोगत व्यक्त केले.
No comments:
Post a Comment