Tuesday, March 30, 2021

महावितरणच्या कर्मचार्‍यांस दमदाटी करणारा गजाआड,

महावितरणच्या कर्मचार्‍यांस दमदाटी करणारा गजाआड, 
सफाळे( हिरालाल लोखंडे )दिनांक ३० मार्च २०२१ रोजी सफाळे विभाग महावितरणचा कर्मचारी ( वायरमेन ) श्री राहुल सुभाष सपकाळ वय वर्ष २७ हे  महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीत कार्यरत असून मौजे तांदुळवाडी ग्रामपंचायत अंतर्गत पाण्याचे मोटरी करीता देण्यात आलेला चावरेपाडा येथील वीजपुरवठा बिल एक वर्षा पासून थकित असल्याने वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार दिनांक १५ मार्च २०२१ पासून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला. दोन दिवसानंतर आपल्या कर्तव्यावर असलेले वायरमेन सपकाळ पाहणी करण्यासाठी तांदुळवाडी येथे गेले असताना, विजय सुदाम पालव राहणार चावरेपाडा तांदुळवाडी याने चावरेपाडा वीजपुरवठा खंडित केला म्हणून अरेरावी केली असताना सुध्दा वरिष्ठ अधिकारी यांना काही एक सांगितले नाही. 
  दिनांक ३० मार्च २०२१ रोजी दुपारी १२ वाजल्यानंतर वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार मौजे तांदुळवाडी येथे कर्तव्यावर जात असताना श्री रमेश चावरे सरपंच तांदुळवाडी यांचा फोन आला व त्यांनी सांगितले तु आता चंद्रकांत रामा तुंबडा चावरेपाडा यांच्या घरी जा, तेथील रहिवासी सर्व मिळून थकित बिलाचे पैसे देणार आहे. म्हणून मी तेथे गेलो. त्या ठिकाणी ४ - ५ महिला व काही पुरूष मिळून पैसे गोळाकरीत असताना अंदाजे १२ च्या सुमारास अचानक पणे विजय सुदाम पालव व त्यांची पत्नी आले, त्यांनी मला तू बाहेर गावावरून आला म्हणून शहाणा समजतोस काय, आम्ही विजबिलाचे पैसे भरणार नाहीत. बोलत, शिवीगाळ करीत, अंगावर असलेल्या गणवेशाची कॉलर पकडून, धक्का बुक्की करीत गणवेशाची दोन बटन तोडून माझ्या डोक्यात असलेली टोपी फेकून देऊन, पाण्याचे कनेक्शन आताच चालू कर सांगितले. तेथे जमलेल्या लोकांनी मला पालव यांच्या पासून सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असताना मी सरपंच यांना फोन केला असताना, ते स्वतः घटनास्थळी धावत आले. त्यांनीही मला पालव यांच्या पासून सोडवण्यासाठी प्रयत्न केला. तरी सदर खंडित केलेला वीजपुरवठा पालव यांनी दहशत, गुंडगिरी,, दमदाटी यांच्या जोरावर पुन्हा सूर करण्यास भाग पाडुन, तु जर माझ्या विरूद्ध पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार केली तर तुला सोडवणार नाही मारून टाकले अशी सर्वान समक्ष धमकी दिली. 
    माझा जिव वाचवीत सफाळे येथे येऊन घडलेला प्रकार वरिष्ठ अधिकारी यांना आॅफीसच्या मधे जाऊन सांगीतला असताना वरिष्ठ अधिकारी यांच्या सल्यांने सदर आरोपी विरूध्द सफाळे पोलिस स्टेशन मधे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
   सफाळे पोलिस स्टेशन मधील प्रभारी अधिकारी श्री संदिप कहाळे साहेब यांनी, भारतीय दंड संविधान कलम ३५३, ५०४, ५०६, प्रमाणे गुन्हा नोंदणी करून आरोपी यास अटक केली असून, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...