Wednesday, March 31, 2021

तमाम जनतेला जाहीर निवेदन

जनतेला जाहीर निवेदन 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी मा. डॉ. माणिक गुरसाळ साहेब, जिल्हाधिकारी पालघर यांनी कोविडा - १९ विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या दृष्टिकोनातून पालघर जिल्ह्यामध्ये काही निर्बंध लागु करणेकामी दिनांक २६ मार्च  २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्या कडुन आदेश पारीत करण्यात आलेले होते. सदरचे अधिक्रमित (रद्द ) करण्यात आले आहेत. मा. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्याकडील आदेश दिनांक २७ मार्च २०२१ व इकडील आदेश दिनांक २७ मार्च २०२१  प्रमाणे खालील खालील खुलासा करण्यात येत आहे. 
१ ) सायंकाळी ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदी असल्याने उल्लंघन करणार्‍यास प्रतिव्यक्ती रूपये १०००-/ इतका दंड आकारण्यात येईल. 
२ ) सायंकाळी ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व सार्वजनिक ठिकाणी बगीचा - समुद्र किनारा - उद्यान बंद राहणार आहेत. उल्लंघन केल्यास प्रति व्यक्ती रूपये १०००-/ इतका दंड करण्यात येईल. 
३ ) मास्क परिधान परिधान न केल्यास रूपये ५००-/ इतका दंड करण्यात येईल. 
४ ) सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास रूपये १०००-/ इतका दंड करण्यात येईल. 
५ ) दिनांक १४ एप्रिल २०२१ पासूनचे विवाह बंदीचे आदेश रद्द करण्यात आले असून विवाह समारंभास ५० लोकांच्या मर्यादेत, सबंधित पोलिस स्टेशन यांच्या कडुन परवानगी घेण्याच्या व कोविडा - १९ चे सर्व मार्गदर्शक सुचना पालन करण्याच्या अटीवर परवानगी राहिल. 
६ ) सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ८ पर्यंत सुरू राहतील. 
७ ) खाद्य गृह - परमीट रूम - बार  सकाळी ७ ते सायंकाळी ८ पर्यंत सुरू राहतील. होम डिलीव्हरी किचन / वितरण कक्ष रात्री १० पर्यंत सुरू राहतील 
८ ) सर्व सरकारी व निमसरकारी कार्यालयामध्ये गर्दी टाळण्यासाठी  निवडून आलेले लोक प्रतिनिधी व्यतिरिक्त तातडीचे काम असलेल्यांना अभ्यागतानाच प्रवेश दिला जाईल 
३० मार्च २०२१ प्रेस नोट कोविडा -१९ प्रमाणे

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...