अन्न व नागरी पुरवठा विभागात अधिकाऱ्यांची पदोन्नती मध्ये भष्ट्राचार.....
नागपूर :-शासन स्तरावर अन्न व नागरी पुरवठा मधील, पुरवठा निरीक्षण अधिकारी, व सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सेवाप्रवेश नियम बदली करण्याची प्रक्रिया सुरू आहे ती कोणासाठी...? अन्न व नागरी पुरवठा कर्मचारी व अधिकारी संघ महाराष्ट्र राज्य च्या अध्यक्षांचा महाराष्ट्र शासनास सवाल, एक वर्ष उलटून गेले तरी नागपूर व अमरावती विभागातील 39 पुरवठा निरीक्षक यांना राज्य स्तरावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून पुरवठा निरीक्षण अधिकारी संवर्गात दिलेल्या पदोन्नतीची अद्याप कुठलीही चौकशी झाली नाही. सेवाप्रवेश नियम बदली केला तर फायदा हा फक्त एका विभागाला होतो. नागपूर विभागातील पुरवठा कर्मचाऱ्यांना नागपूर वगळता उर्वरित महाराष्ट्राला म्हणजे कोकण पुणे नाशिक औरंगाबाद व अमरावती विभागातील पुरवठा कर्मचारी व अधिकारी त्यांच्यावर मोठा अन्याय होत आहे,एका विभागासाठी झुकते माप का उर्वरित भागावर अन्याय का...? सेवाप्रवेश नियम बदली झाला तर नागपूर वगळता उर्वरित महाराष्ट्रातील पुरवठा कर्मचारी पदोन्नतीवर मोठा दुष्परिणाम होणार आहे. पुढील पंधरा ते वीस वर्ष *व काही अधिकाऱ्यांना त्याच पदावर निवृत्ती होणार व* पदोन्नती पूर्णपणे अंधारात जाणार आहे,असे मत अध्यक्ष भागवत सोनार यांनी निवेदन द्वारे मांडले आहे.यात मोठा आर्थिक व्यवहार करून ही प्रक्रिया झाली असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग ना पू 15 तील कक्ष अधिकारी यांचे म्हणणे आहे की कोणाला काय करायचे ते करा मी सेवाप्रवेश नियम बदली केल्या शिवाय राहणार नाही अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या डोक्यावर नेमका कोणाचा हात आहे ? त्यांची चौकशी करून तात्काळ बदली करा.एक वर्ष उलटून गेला तरी नागपूर व अमरावती तील 39 पुरवठा निरीक्षक यांना पुरवठा निरीक्षण अधिकारी संवर्गात दिलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून दिलेले पदोन्नतीची अद्याप कुठलीही चौकशी झाली नाही. या संदर्भात शासनांने हि काही अधिकारी यांच्या फायद्या साठी व इतर उर्वरित महाराष्ट्रातील कर्मचार्यांवर अन्याय करणारी आहे,ती तत्काळ मागे घ्यावी,आणि इतर कर्मचार्यांवर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी करीत आहे.
कोट....
काही प्रशासकीय अधिकार्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून केलेल्या नियमबाह्य पदोन्नती कायम करण्यासाठी,जो सेवा प्रवेश नियमात बदलाचा घाट घातला आहे ,त्याची उच्च स्तरीय समिती कडून चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी.
भागवत सोनार ,अध्यक्ष ,अन्न व नागरी पुरवठा कर्मचारी व अधिकारी संघ महाराष्ट्र राज्य.
No comments:
Post a Comment