लस पूर्णपणे सुरक्षित सर्वांनी लसीकरण करून घ्यावे
पालघर(प्रतिनिधी) दि.10 : कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी लस आपल्याला उपलब्ध झाली असून सर्व धर्मगुरूंनी जनतेमध्ये जनजागृती करून लस घेण्याचे आवाहन करावे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे. कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या धर्मगुरूंच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन तसेच सर्व धर्माचे धर्मगुरु उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. गुरसळ म्हणाले, मृत्यूदर रोखण्यासाठी लसीकरण करुन घेण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करणे हि महत्वाची जबाबदारी आहे. मला विश्वास आहे हे कार्य सर्व धर्मगुरु पार पाडतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment