Wednesday, January 6, 2021

महाराष्ट्र एकता पत्रकार संघा तर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र एकता पत्रकार संघा तर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
पालघर (प्रतिनिधी)बोईसर येथील जुने सरोवर हॉटेलच्या हॉल मध्ये महाराष्ट्र एकता पत्रकार संघाने आज    पत्रकार दिन साजरा करण्यात आला. 
आज मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला.आपले सर्वांचे प्रथम पूजेचा मान असलेल्या श्री गणपती बाप्पा व महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व 
 मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  या कार्यक्रमाचे उद्धघाटक  मा.सौ. भारती ताई कांबडी  जिल्हा परिषद अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा),उपविभागीय अधिकारी श्री विश्वास वळवी , कोकोयु केमलिन चे (HR) श्री अजित राणे, बोईसर चे उद्योजग श्री नईम चौधरी, समाज सेवक इकरार भाई सिद्दीकी,महाराष्ट्र एकता पत्रकार संघाचे अधक्ष श्री आरिफ खान, या सर्वांच्या उपस्थितीत जांभेकरांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी  6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहीले वृत्तपत्र काढून मराठी वृत्तपत्रांचा पाया रचला. पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवी जीवनमुल्ये रूजविण्यात मोलाचे योगदान दिले. 
बाळशास्त्री जांभेकरांच्या या योगदानासाठी त्यांचा जन्मदिन ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी महाराष्ट्र एकता पत्रकार संघ या दिवसाचे औचित्य साधून कार्यक्रम राबवत असतो.सौ भारती ताई कांबडी यांनी पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बंधुना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.श्री विश्वास वळवी यांनी देखील मार्गदर्शन केले,श्री अजित राणे यांनी निर्भिड पत्रकारिता कशी असायला हवी यावर मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या,श्री नईम चौधरी यांनी 
सामान्य जनतेवर सरकारी अधिकारी कशी दिशा भुल कारून सर्व सांमाण्य माण सांची फसवणूक करतात ती उजेडात आणून यांना जनतेसमोर पत्रकारांनी आणले पाहिेजेत,श्री इकारार भाई सिद्दीकी यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या तसेच समाज सेवक अहमद रजा खान यांनी पण पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या,श्री निलेश भोईर यांनी पूर्ण पत्रकारांची माहिती समजून सांगितली,श्री ललित वझे यांनी सूत्रसंचालन केले तर श्री  विजय घरत यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी पत्रकार मंडळी 
उपस्थितांची   नावे श्री संतोष राणे,श्री के. डी. मिश्रा,श्री द्यानचंद जसवाल,श्री हिरालाल लोखंडे,श्री गिरीश देव,श्री संजय बहादुर,श्री प्रवीण पाटील,श्री मंगेश नगरकर,श्री रवि राठोड,श्री मिलींद चुरी,श्री पाल, श्री जितेंद्र पाशी,श्री तुषार बऱ्हे,श्री जयू कडू,श्री रामानंद यादव,श्री रमेश कुमार चौधरी, श्री हर्षद पाटील, व इतर मंडलीच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...