*शासकीय आश्रमशाळा गिरगांव येथे बालिका दिन साजरा*
तलासरी (प्रतिनिधी)एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गिरगांव, ता.तलासरी जि. पालघर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त व राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक श्री. निमचंद राठोड यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याविषयी भाषणाद्वारे माहिती दिली. या प्रसंगी श्रीमती. हमीबाई वांगड यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. बालिका दिनानिमित्त माध्यमिक शिक्षक श्री. हर्षद यशवंत चौधरी यांनी रांगोळी स्पर्धा, श्री. अंकुश राऊत यांनी मेहंदी स्पर्धा, अधिक्षक श्री. रवींद्र बहुरे यांनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना या प्रसंगी डहाणू येथील श्रीमती. कल्पना ओझा मॅडम यांच्या मार्फत रंग व चित्रकला वह्या वाटण्यात आल्या. शिक्षकांनी बोधकथेद्वारे गोष्टीरूपातून स्त्री शिक्षणाबद्दल जनजागृती केली.
No comments:
Post a Comment