*२८ डिसेम्बर रोजी रस्ते सुरक्षा समितीची बैठक*
पालघर (प्रतिनिधी)दि १८ : गृह विभाग महाराष्ट्र शासन अधिसूचना दि. ११/१०/२०११ आणि गृह( परिवहन) विभाग महाराष्ट्र अधिसूचना दि.१३/०५/२०१५ नुसार जिल्हा रस्ते सुरक्षा समिती गठीत करण्यात आली असून सदर समितीचा आढावा घेणे कामी .जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा रस्ते सुरक्षा समिती पालघर यांचे अध्यक्षतेखाली दि.२८/१२/२०२० रोजी दुपारी १.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकी साठी जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे सर्व सदस्य , तसेच प्रकल्प संचालक , भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सुरत हे उपस्थित राहणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी दिली आहे.
तरी जिल्ह्यातील नागरिकांच्या या संदर्भात काही सूचना असल्यास homebranchpalghar@gmail.com या मेल आय डी वर दि. २५/१२/२०२० पर्यंत मेल करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात आले आहे.
*******
No comments:
Post a Comment