युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी
24 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज करावेत.
पालघर(प्रतिनिधी) दि. 22 :- राष्टीय एकात्मता तसेच युवांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शासनमार्फत जिल्हा/विभागीय/राज्य/राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सन 2020-21 या वर्षात पालघर जिल्ह्यात जिल्हास्तरीय युवा महोत्साव या योजनेअंतर्गंत जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे ऑनलाईन/व्हर्च्युअल आयोजन करण्यात येत आहे. सदर युवा महोत्सावामध्ये सहभागी युवकांचे वय 15 ते 29 वर्षाच्या आतील असावे. युवा महोत्सवामध्ये खालील कलाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
1) सांघिक बाबी :- लोकनृत्य,लोकगीत
(2) वैयक्तिक बाबी :- एकांकिका (इंग्रजी व हिंदी)
(३) शास्त्रीय गायन :- हिंदुस्तानी, कर्नाटकी
(4)वकृत्व :- ऐनवळी देण्यात येणारा विषय
(5 )शास्रीय नृत्य:-,मणिपुरी,भरतनाट्यम,कुची पुडी , कथक, ओडिसा
(6)शास्त्रीय वादन :- सितार,बासरी, तबला,विणा,मृदंग,हार्मोनियम,गिटार अशा स्पर्धात्मक बाबीमध्ये युवकांना सहभागी होता येईल.
तरी जिल्हास्तरीय युवा महोत्सावामध्ये सहभागी होण्याकरिता आपले प्रवेश अर्ज 24 डिसेंबर 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर येथे प्रवेशिका अर्ज सादर कराव्यात. ज्या युवक-युवतीचे व संस्था यांचे प्रवेश अर्ज प्राप्त होतील त्यांना ऑनलाईन लिंक व जिल्हास्तरीय स्पर्धाची तारिख कळविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी श्रीमती विद्या भदाणे 9561392699, 9321413340 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. असे शरद कलावंत, जिल्हा क्रीडा अधिकारी, पालघर यांनी आवाहान केले आहे.
टिप :- देशात कोविड-19 महामारीच्या प्रादुर्भावाचा विचार होऊन कोणत्याही प्रकाराचे एकत्रीकरणास मनाई आहे.
*******
No comments:
Post a Comment