Thursday, December 3, 2020

*ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत 14 डिसेंबर रोजी*

*ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत 14 डिसेंबर रोजी*


 ठाणे दि.03 (jagdhish घरत): सन 2020-25 या कालावधीत सार्वित्रिक निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी  सोमवार दि. 14 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता सरपंच पदाचे आरक्षण सोडत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलाआहे.

कोविड -19 विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनानूसार दक्षता घेणेबाबत दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात येणार आहे. आरक्षण सोडत कार्यक्रमास  उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकारी,कर्मचारी, पदाधिकारी वा ग्रामस्थ यांनी मास्क परिधान करणे बंधनकारक राहिल.

या ठिकाणी साबण,पाणी व हॅन्ड सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. बैठक व्यवस्थेमध्ये Social Distance चा वापर करावा.आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी उपस्थितांचे तापमान तपासणी करुनच कार्यस्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन,राज्य शासन व या कार्यालयाचे वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचना,आदेशांचे तंतोतंत पालन करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...