Sunday, November 1, 2020

*दिग्गज वार्ताहर* बातम्यादिनांक :- ०२.नोव्हेंबर २०२०

*दिग्गज वार्ताहर* बातम्या
दिनांक :- ०२.नोव्हेंबर २०२०

● ऑक्टोबरमध्ये जमा झालेल्या वस्तू आणि सेवा कराने (जीएसटी) गेल्या आठ महिन्यांत प्रथमच एक लाख कोटींचा टप्पा ओलांडला; ऑक्टोबरचा महसूल गेल्या वर्षीपेक्षा १० टक्के अधिक

● स्वदेशी ‘भारत बायोटेक’च्या कोरोना लशीची मार्चनंतरच शक्यता; लशीची किंमत अजून ठरलेली नाही

● श्रीनगर शहराजवळ रविवारी झालेल्या पोलीस चकमकीत हिज्बूल मुजाहिद्दीनचा (एचएम) म्होरक्या डॉ. सैफुल्ला ठार; श्रीनगर पोलिसांची मोठी कारवाई

● शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा; गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा; असा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल

● राज्यात दिवसभरात ५ हजार ३६९ नवे रुग्ण; ३ हजाराहून अधिक कोरोनामुक्त; राज्याचा रिकव्हरी रेट ८९.९२ टक्क्यांवर

● कोरोनावर 'अखेरचा घाव'! आजपासून (दि.२) मुंबईत २४४ ठिकाणी पालिकेची मोफत 'कोरोना टेस्ट'; आधीपासून असणाऱ्या ५४ खासगी कोरोना चाचणी सेंटरमुळे चाचण्यांच्या एकूण सेंटरची संख्या ३०० हून अधिक होणार

● कोल्हापुरी चपलांच्या निर्मितीसाठी आता कारागिरांना प्रशिक्षण; या उद्योगात जे युवक कार्यरत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे

● फ्रान्समधील हिंसाचाराचा भारतीय विचारवंतांकडून निषेध; मेधा पाटकर, तिस्ता सेडलवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील १३० मान्यवरांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत

● कोलकाताचा राजस्थानवर ६० धावांनी शानदार विजय; या पराभवासोबत राजस्थानचं आयपीएलच्या तेराव्या हंगामातलं आव्हान संपुष्टात

● कोरोना काळात गरजुंना मदत केल्यामुळे प्रशांत दामलेंचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान; दिग्दर्शक, निर्माते सुभाष घई यांसह ४५ कोरोना योद्ध्यांचा केला सन्मान

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...