*बिरसा मुंडा कृषी क्रांतिकारी योजना आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा-अति.मु.का.अ.चंद्रकांत वाघमारे*
पालघर(निलेश भोईर) सन २०२०-२१ बिरसा मुंडा कृषी क्रांतिकारी योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा पालघर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जि.प.अध्यक्षा भरती कामडी, कृषी सभापती सुशील चुरी, मु.का.अ.एस.के.सालीमठ तसेच अति मु.का.अ.चंद्रकांत वाघमारे यांनी केले आहे.
या योजनेमध्ये नवीन विहिरी साठी उच्चतम अनुदान मर्यादा २,५०,००० रु, जुनी विहीर दुरुस्ती साठी ५०,०००रु, इनवेल बोरिंग साठी २०,०००रु., वीज जोडणी आकारणीसाठी १०,००० रु. ,शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी दहा हजार रुपये सूक्ष्म सिंचन संच ई ठिबक सिंचन ब तुषार सिंचन यासाठी अनुक्रमे ५०,०००रु व २५,०००रु परसबागेसाठी रु ५००, पंपसंच( डिझेल विद्युत) साठी २०,००० रु. (१० अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे पंपसंच करिता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार शंभर टक्के अनुदान देय राहील)
पीव्हीसीएचडीपीइ पाइप साठी ३०,०००( राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार शंभर टक्के किंवा उच्चतम मर्यादा ३० हजार रु. अशा स्वरूपाची ही योजना असणार आहे.
*लाभार्थी निवडीची कार्यपध्दती*
या योजनेअंतर्गत नविन विहीर , जुनी विहिर दुरूस्ती व शेततळयाचे प्लॅस्टिक अस्तरीकरण यापैकी एक घटकाचा व त्यासोबतच्या पॅकेजचा लाभ देता येईल . नविन विहीर अथवा जुनी विहीर दुरूस्ती या घटकाचा यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना वीजजोडणी आकार , सुक्ष्म सिंचनसंच , पंपसंच , पीव्हीसी पाईप व परसबाग या घटकांचा लाभ अनुज्ञेय राहील. योजनेचा लाभ घेणेसाठी लाभार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज घेणेत येतील . ग्रामसभेने शिफारसीत केलेल्या इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज गट विकास अधिकारी , पंचायत समिती यांचेकडे सादर करून प्रत आवश्यक कागदपत्रांसह कृषि अधिकारी ( विघयो ) पं.स.यांचेकडे जमा करावी .
*योजनेत सहभागी होण्यासाठी अटी व शर्थी*
१ ) लाभार्थी हा बिरसा मुंडा कृषि क्रांती ( क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील ) योजनेकरीता अनुसुचित जमाती तसेच डॉ . बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेकरीता अनुसुचित जाती व नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे.
२ ) शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकान्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे.
३ ) शेतकऱ्याचे नाव जमिन धारणेचा ७/१२ दाखला ८ - अ चा उतारा असणे आवश्यक आहे . ( नगर पंचायत , • नगरपालीका व महानगरपालीका क्षेत्राबाहेरील शेतकरी )
४ ) लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे .
५ ) लाभार्थ्यांचे बँक खाते असावे व सदर बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
६ ) दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांनी दारिद्र्य रेषेखाली असल्याबाबतचा दाखला अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे .
७ ) शेतकऱ्याचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रू .१,५०,००० / - पेक्षा जास्त नसावे.
८ ) ज्या शेतकऱ्याचे सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन्न रू . १,५०,००० / - चे मर्यादेत आहे अशा शेतकऱ्यांनी संबंधित तहसिलदार यांचेकडून सन
२०१ ९ -२० चे उत्पन्नाचा अद्यावत दाखला घेणे व अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.
९ ) नविन विहिरीसाठी किमान ०.४० हेक्टर व नविन विहीर ही बाब वगळून योजनेतील अन्य बाबींसाठी किमान ०.२० है . क्षेत्र असणे आवश्यक आहे आणि योजनेतंर्गत सर्व बाबींसाठी कमाल क्षेत्र मर्यादा ६.०० हेक्टर शेतजमिन राहील.
१० ) आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी दुर्गम भागात व विखंडीत असल्याने ०.४० हे . पेक्षा कमी जमिन धारणा असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास त्यांची एकत्रित जमिन ०.४० हे.इतकी होत असल्यास त्यांनी करार लिहून दिल्यास त्यांना योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील . त्याचप्रमाणे दारीद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना ६ हे . धारण क्षेत्राची अट लागु असणार नाही.
११ ) बिरसा मुंडा कृषि क्रांती ( क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील ) योजनेकरीता अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकन्यांनी अर्ज केल्यास सदरचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
१२ ) तसेच डॉ . बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेकरीता अनुसुचित जमाती शेतकन्यांनी अर्ज केल्यास सदरचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल .
उपरोक्त प्रमाणे नमूद केल्या नुसार वरील दोन्ही योजनांकरीता www.mahadbtmahait.gov.in या शासनाच्या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा सन २०२०-२१ आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे . इच्छुक शेतकऱ्यांनी सदर संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करुन ऑनलाईन सादर केलेल्या अजांची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित छायांकित प्रतीसह कृषि अधिकारी ( विषयो ) पंचायत समिती यांचेकडे स्वहस्ते सादर करावी . तरी सदर योजनांच्या अधिक माहितीसाठी संबंधीत कृषि अधिकारी ( विषयो ) पंचायत समिती यांचेशी संपर्क करावा .
अशी माहिती जिल्हा कृषि विकास अधिकारी सूरज जगतात यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment