नाशिक पंचवटी रामकुंड येथील *"साई किरण धाम"* यांनी पाळलाय 4 पिढ्यांपासून अन्नदानाचा वसा.
प्रतिनिधी / निलेश भोईर
प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी नाशिक येथे पंचवटी रामकुंड परिसर, प्राचीन कपालेश्वर महादेव मंदिर व प्राचीन गंगा-गोदावरी माता मंदिर यांना लागूनच असलेल्या "साई किरण धाम" श्री साईबाबा मंदिर येथे होत असलेल्या साई भंडारा व सामाजिक सेवा कार्याची आमच्या चॅनेल ने घेतली दखल.
नाशिक जिल्ह्यातील पंचवटी रामकुंड या परिसरात गोरगरीब, वयोवृद्ध, पर्यटक, भाविक, भिक मागून उदरनिर्वाह करणारे व आपली जीवन उपजीविका भागवण्यासाठी एक वेळ अन्न कसे मिळेल कायम या चिंतेत असणाऱ्या गरजूंसाठी "साई किरण धाम" एक आशेचा किरण ठरत आहे.
येथील साई मंदिरात शिर्डी प्रमाणे साई आरतीच्या सर्व वेळांचे नियमित पालन करण्यात येते.
या संस्थेतर्फे मोफत अन्नदानाचा कार्यक्रम दररोज सकाळी 7 वा. साईबाबांच्या आरती नंतर चहा,
9 वाजता फराळ, दु.12 वा.आरतीनंतर जेवण व संध्या. 7 वाजेच्या आरतीनंतर उपस्थितांना दूध व पाव मोफत वाटप केले जाते.
पंचवटी येथे पूरसदृश परिस्थिती मध्ये सुद्धा साई किरण धाम व त्यांचे सेवेकरी आपले कर्तव्य बजावत असतात व अन्नदान सेवा सुरूच ठेवतात.
वर्षाचे 365 दिवस या संस्थेचे सेवाकार्य व नित्यक्रम असाच अखंडित सुरू असतो.
संपूर्ण राज्यात कोरोना महामारी चे प्रचंड मोठे संकट ओढवले असताना या परिस्थितीत गरीब व गरजू यांना एक वेळचे अन्न मिळवणे कठीण झाले होते, अशा वेळी साई किरण धाम सेवेकरी मंडळ यांच्या वतीने अन्नाचे पाकिट व किराणा सामान ठिकठीकाणी जाऊन गरीब व गरजूंना वाटप करण्यात आले आणि मंदिराच्या परिसरात कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करून दररोज साई भंडारा प्रसादाचे वाटप करण्यात आले.
"साई किरण धाम" यांच्या या सामाजिक कार्याची दखल नाशिक महानगर पालिकेतर्फे सुद्धा घेण्यात आली व संस्थेचे संचालक श्री मनोहरदासजी उदासी, महंत श्री हितेशदासजी उदासी व सर्व सेवाधारी कार्यकर्ते यांना नाशिक महानगरपालिकेतर्फे सन्मानपूर्वक गौरविण्यात आले व गौरव पत्र देण्यात आले.
https://youtu.be/_EHlxOQOC8s
No comments:
Post a Comment