"दिग्गज वार्ताहर " बातम्या
दिनांक:-११ सप्टेंबर २०२०
वार। :- शुक्रवार
● भारत-जपान दरम्यान संरक्षणविषयक सहकार्य करार; चीनच्या लष्कराचे प्रादेशिक प्राबल्य वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर करार
● संसदेच्या अधिवेशनाचे डिजिटल कामकाज; संसदेच्या इतिहासात प्रथमच सदस्यांना सर्व लेखी प्रश्न ऑनलाइन पाठवावे लागतील
● कोरोनाच्या विरोधात भारताचा सुनियोजित रीतीने लढा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; कोरोनावर लस शोधली जाईपर्यंत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन
● जेईई मेन सप्टेंबर परीक्षेला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी २५ टक्क्यांवर विद्यार्थी अनुपस्थित; शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची माहिती
● राज्यात दिवसभरात २३ हजार ४४६ नवीन रुग्ण आढळले; १४ हजार २५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले; एकूण रुग्णसंख्या ९ लाख ९० हजार ७९५ वर पोहचली; ४४८ मृत्यूंची नोंद
● सांगली : जिल्ह्यात गुरुवारी नव्याने उच्चांकी ११७४ रुग्ण आढळले; जिल्ह्यातील रुग्णसंख्या २० हजार ४३४ वर पोहोचली; २४ तासात २७ जणांचा मृत्यू
● महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून रुजू होण्यापूर्वीच तुकाराम मुंढेंची बदली झाली रद्द; आता नव्या नियुक्तीची प्रतीक्षा
● पाकिस्तानच्या झिआरत घर डोंगराळ प्रदेशात असलेली संगमरवराची खाण कोसळलेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या २६ वर पोहोचली; अद्यापही सात जण बेपत्ता
● भारतीय बॅडमिंटन संघाची घोषणा; जगज्जेती पी. व्ही. सिंधू व किदम्बी श्रीकांत यांच्यावर भारतीय संघाची भिस्त असणार; थॉमस, उबर चषकासाठीचे सराव शिबीर रद्द
● राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांची 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' (NSD) च्या अध्यक्षपदी नियुक्ती
No comments:
Post a Comment