दि. १३/९/२०२०
*पोषण माह अंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन*
पालघर (प्रतिनिधी) :माहे सप्टेंबर २०२० संपूर्ण महिना पोषण माह म्हणून साजरा करण्यात यावा या केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यात यशस्वीरित्या पोषण माहो साजरा करण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार दिनांक ७ सप्टेंबर ते ३०सप्टेंबर २०२० पर्यंत पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे पोषण माह साजरा करण्यात येणार आहे. सीएस नुसार बालकांना गृहभेटी देणे, अंगणवाडी जवळ परसबाग या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करणे. या या विषयांवर विशेषतः पोषण माह अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सर्वे क्षेत्रातील गरोदर व स्तनदा माता यांना गृहभेटी देणे, ० ते ६वर्ष वयोगटातील बालकांचे वजन व उंची मापन, टप्प्याटप्प्याने CAS नुसार SAM बालकांना गृहभेटी देणे व पालकांचे समुपदेशन करणे, पोषण विविधता वरचा आहार यामध्ये शिक्षण विभागामार्फत ऑनलाइन पोस्टर स्पर्धा आयोजन करणे, मातांना सदर आहाराविषयी समुपदेशन करणे, लसीकरणाचे महत्त्व व वृद्धी मापना विषयी मार्गदर्शन करणे न जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका यांच्याद्वारे अंगणवाडीसेविका यांच्याकरिता प्रोत्साहनात्मक पर्यवेक्षण आयोजित करणे, गरोदर महिलांना समुपदेशन करण्याकरिता AAA च्या समन्वयाने गृहभेटी आयोजित करणे समुदाय आधारित नुसार कार्यक्रमाचे छोट्या गटांमध्ये आयोजन करणे, अंगणवाडीतील SAM बालकांच्या पालकांसोबत छोट्या गटांमध्ये बैठक आयोजन करणे, वयोगटातील बालकांचे लसीकरण त्यावर चर्चा व मार्गदर्शन करणे, च्या माध्यमातून सुदृढ झालेल्या बालकांच्या यशोगाथांचे आयोजन करणे, तसेच अल्पसंख्यांक विभागाशी संपर्क साधून 'नयी रोशनी' हा कार्यक्रम पोषण माह अंतर्गत राबविणे, कॉमन सर्विस सेंटर( CSC) मध्ये पहिले १००० दिवसांचे महत्व तसेच लवकर स्तनपान याविषयी जनजागृती करणे व इतर अनेक कार्यक्रम पोषण माह अंतर्गत राबविण्यात येत आहेत.
सदर उपक्रम शासनाने निर्देशित केलेल्या covid-19 संदर्भातील नियमांचे चे पालन करूनच पार पाडले जातात अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी प्रवीण भावसार यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment