गिरीष देव भिवंडी : भिवंडी शहरात अंजुरफाटा शिवाजीनगर येथे बैठ्याघराची भिंत कोसळली असल्याने या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकले असल्याची 5:45 वाजता प्राथमिक माहिती मिळाली. या वेळी घटनास्थळी अग्निशामक दल व आपत्कालीन कर्मचारी ढिगारा उपसण्याच्या काम सुरू करण्यात आले आहे.

या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत एक जण सुखरूप काढले असून अजून एक जण अडकल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी राजेश पवार यांनी दिली आहे.नुकत्याच महाड या ठिकाणी 5 मजली इमारत कोसळली होती यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला होता. भिवंडी महानगरपालिकेकडून अनेक धोकादायक इमारतींना निर्मनुष्य करण्याचे कार्य सुरू आहे.

मागील वर्षी ही शांतीनगर या ठिकाणी 4 मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली होती. यामध्ये बिल्डर वर ही गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंजुर फाटा शिवाजी नगर येथे बैठ्या घराची भिंत कोसळल्याने भिवंडी परिसरात अनधिकृत बांधकाम मोठया प्रमाणात असल्याने या इमारती निर्मनुष्य व करण्याचे कार्य सुरू झाले आहेत तर भिवंडी मनपा आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी अनधिकृत इमारतीत कोणीही घर खरेदी करू नये असे आवाहन भिवंडी नागरिकांना केले आहे.