Monday, August 31, 2020

"दिग्गज वार्ताहर" सकाळच्या बातम्या


दिनांक:-०१.सप्टेंबर २०२०
वार :-  मंगळवार

● भारतरत्न आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे दीर्घ आजाराने सोमवारी निधन; प्रणव मुखर्जींवर आज (दि १) दुपारी २.३० वाजता दिल्लीत अंत्यसंस्कार होणार; ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

● देशभरातील गेल्या तीन महिन्यातील एकूण पावसाची स्थिती समाधानकारक; देशभरात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे १० टक्के अधिक पाऊस  

● संसदेचे अधिवेशन १४ सप्टेंबरपासून; सर्व खासदारांची चाचणी केली जाणार; अंतराचा नियम पाळण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा सभागृहातील गॅलऱ्यांमध्ये आसनव्यवस्था 
 
● अर्थव्यवस्थेची अधोगती, विकासदर उणे २३.९ टक्के; अर्थव्यवस्थेच्या प्रमुख घटकांपैकी, उत्पादन आणि बांधकाम क्षेत्राची सरलेल्या तिमाहीत अत्यंत दारुण स्थिती दिसली

● राज्यात तब्बल ११ हजार १५८ रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात; एकाच वेळी ११ हजार ८५२ नवीन रुग्णांची वाढ; राज्यातील कोरोनास्थिती अद्यापही चिंता वाढवणारी 

● आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंद; अनलॉक ४ जाहीर झाल्यानंतर नागरी उड्डाण संचालनालयाचा निर्णय

● पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात राज्य सरकारला आरक्षण अधिकार; एमसीआय ही वैधानिक संस्था असून तिला आरक्षणाबाबत तरतूद करण्याचा अधिकार नाही

● इस्त्रायल - संयुक्त अरब अमिराती दरम्यान विमान सेवा सुरू; इस्त्रायलहून अबुधाबीकडे पहिल्या व्यापारी विमानाचे काल उड्डाण झाले ही एक ऐतिहासिक घटना मानली जात आहे

● आता तरी बुद्धिबळाची दखल घ्यावी; ऑलिम्पियाडच्या यशानंतर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसंदर्भात महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदची अपेक्षा

●  देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जाण्याने देशाचं फार मोठं नुकसान झालंय : अभिनेता रितेश देशमुख

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...