Monday, September 14, 2020

14 सप्टेंबर 2020 पालघर जिल्ह्यात 16 ते 29 सप्टेंबर या कालावधी मध्ये मनाई आदेश लागू

14 सप्टेंबर 2020  
पालघर जिल्ह्यात 16 ते 29 सप्टेंबर 
या कालावधी मध्ये मनाई आदेश लागू  

पालघर(  प्रतिनिधी  )दि. 14 :- पालघर जिल्हयात कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव आहे तसेच विविध राजकीय पक्ष व संघटना यांचे कडुन त्यांचे विविध मागण्यांकरीता मोर्चे, उपोषण, धरणे, आंदोलन व रास्ता रोको करण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पालघर जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक पालघर यांचे कार्यकक्षेत सर्वत्र शांतता व सुव्यवस्था तसेच जनजीवन सुरळीत रहावे, म्हणून पोलीस अधिक्षक पालघर यांचे कार्यकक्षेतील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत  मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये दि. 16 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2020पर्यंत खालील कृत्यास बंदी करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी पालघर, डॉ.माणिक गुरसळ, यांनी मनाई आदेश लागु केला आहे.
1) शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदुका, सुरे, लाठया अथवा काठया अथवा शारीरीक इजा करण्यासाठी   
    वापरता येईल अशी  इतर कोणतीही वस्तू बाळगणे,
2) कोणताही  क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे,
3) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे 
    किंवा तयार करणे.
4) व्यक्तीचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे.
5) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे.
6) ज्यामुळे सभ्यता अगर निती यास धक्का पोहोचेल अशा किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे तत्वे, हावभाव करणे, सोंग आणणे किंवा चित्रे, चिन्हे, फलक किंवा कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा लोकात प्रचार करणे. 
सदरचा आदेश प्रेतयात्रांना लागु असणार नाही. तसेच सदरचा आदेश केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीत असलेल्या व त्यांचे वरीष्ठांचे आदेशानुसार अगर कर्तव्याच्या किंवा अपंगत्त्वामुळे लाठी, काठी बाळगणे आवश्यक आहे अशांना लागु असणार नाही.

*************

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...