Wednesday, September 8, 2021

आदिवा​सी बांधवांच्या न्याय हक्कासाठी बसपा कटीबद्ध!समाजावर होणार्या अन्यायाविरोधात वाचा फोडू— अॅड.संदीप ताजने

बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र प्रदेश 
....................
आदिवा​सी बांधवांच्या न्याय हक्कासाठी बसपा कटीबद्ध!
समाजावर होणार्या अन्यायाविरोधात वाचा फोडू— अॅड.संदीप ताजने 

मुंबई, 8 सप्टेंबर
पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल आहे. पंरतु, आतापर्यंतच्या सरकारांनी या जिल्ह्याच्या विकासाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. राज्यात आणि पालघर मधील स्थानिक स्वराज्य संस्थेत बहुजन समाज पार्टीला एकहाती सत्ता दिली तर, आदिवासी समाजासह पीडित, शोषितांना मुख्यप्रवाहात आणण्याचे काम बसपाकडून केले जाईल, असा शब्द बसपाचे प्रदेशाध्यक्ष अॅड.संदीप ताजने यांनी आज, बुधवारी पालघर येथील टीमा हॉल, टाकीनाका येथे आयोजित 'संवाद यात्रे'च्या सभेतून दिला. यावेळी प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना तसेच राज्याचे महासचिव प्रा.प्रशांत इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.

पालघर मध्ये अनेक आघाड्या झाल्या. अशीच एक आघाडी सध्या इथे कार्यरत आहे. पंरतु, आदिवासी बांधवांसह सर्वसमावेश विकासाऐवजी स्वत:चे राजकीय पोळ्या भाजून 'अपना विकास' करण्यात या आघाड्या गुंतल्या असल्याचा आरोप देखील यावेळी ताजने यांनी केला. मा.बहन मायावती जी यांच्या मार्गदर्शनात आणि युवा नेतृत्व आकाश आनंदजी यांच्या नेतृत्वात राज्यातही पार्टीची आगेकुच सुरू आहे. याच धर्तीवर सर्वसामान्यांनी बसपाला साथ दिली तर, पालघर जिल्ह्याचा विकास करू, अशी ग्वाही त्यांनी यानिमित्ताने दिली. राष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईच्या शेजारी असून देखील पालघरचा विकास झालेला नाही. पंरतु, बसपाला एकहाती सत्ता मिळाली तर हा विकास दृष्टिपथात येईल, असेही अॅड.ताजने म्हणाले. कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव,जिल्हाप्रभारी प्रा.धम्मशील खरे,राजेंद्र करोतीया, अजय जाधव, मुख्तार खान, निरज शर्मा, नैन इ​ब्रिसी, सतिश लोखंडे, सायली राउत, सुषमा ताई, मुकेश जाधव, दत्ता पाडोसा याच्यासह शहरातील प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. 
शेवटच्या नागरिकांपर्यंत विकासगंगा पोहचणार 
पालघर असो वा राज्यातील इतर मागास जिल्हे, बसपाच्या नेतृत्वात शेवटच्या नागरिकाला मुख्यप्रवाहात आणण्याचे काम केले जाईल, असे प्रतिपादन राज्य प्रभारी प्रमोर रैना यांनी केले. मा.बहन जींच्या मार्गदर्शनावर पीडित, शोषितांसह ब्राम्हण वर्गालाही विश्वास आहे. उत्तर प्रदेशात झालेले प्रबुद्ध विचार संगोष्टीत झालेले ब्राम्हण बांधवांच्या गर्दीवरून बहनजीवर असलेला त्यांचा अतुट विश्वास अधोरेखित होतो. अशात पुरोगामी महाराष्ट्रातही सर्वसमावेश विकासासाठी बसपाच पर्याय असल्याचे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...