Thursday, September 16, 2021

भिवंडी महापालिकेला लाजवेल असा काल्हेर ग्रामपंचायतीचा थाट... गणेश विसर्जन घाटावरील सोयी सुविधा मध्ये जिल्हाभर नाव लौकीक.

भिवंडी महापालिकेला लाजवेल असा काल्हेर ग्रामपंचायतीचा थाट...
 गणेश विसर्जन घाटावरील सोयी सुविधा मध्ये जिल्हाभर नाव लौकीक...
भिवंडी दि.१६(किशोर पाटील) भिवंडी तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून नाव लौकीक असलेल्या काल्हेर ग्रामपंचायतीने राज्य सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सरपंच सौ.योगिता अनिल म्हात्रे,उप सरपंच श्री. भरत जयवंत पाटील,ग्रामविकास अधिकारी श्री.रमेश राठोड,व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांनी गणेश विसर्जन घाटावरील केलेली पूर्व तयारी पाहता भिवंडी महानगपालिका असो वा इतर जिल्ह्यातील पालिका प्रशासन असो  या सर्वांना प्रेरणादायी व लाजवेल असे काम त्यांनी केले आहे.
यासाठी त्यांना नारपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मालोजी शिंदे व त्यांचे सर्व सहकारी यांनी मोलाची साथ दिली आहे.त्यामुळे दीड दिवसांच्या गणपती पासून ते आज पर्यंत गणेश घाटावरील सोयी सुविधा मध्ये वाढ होताना दिसत आहे.त्यांनी सजवलेलं व डेकोरेट केलेलं समुद्र किनाऱ्या पासून ते ४० ते ५० फूट अंतरावर गणेश मूर्ती चालत घेऊन जाऊन तेथे कोणत्याही प्रकारची गर्दी न करता अगदी सहज प्रवेश केला जातो. व राज्य शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे हा उद्देश समोर ठेऊन गणेश मूर्ती विसर्जित केल्या जातात.विशेष म्हणजे 
वार्ड क्रं.१ ते वार्ड क्रं.६  मध्ये वेगवेगळे टेबल माडण्यात आले आहेत.व प्रत्येक वार्ड साठी दोन निरीक्षक नेमले आहेत जेणे करुन प्रत्येक वार्ड मधील गणेश मूर्ती ही नेमणूक केलेल्या निरीक्षकाच्या  ताब्यात दिली जाते.जेणे करून गर्दी होत नाही.नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.अशा घटनेमुळे 
काल्हेर ग्रामपंचायतीचे नाव संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे असे म्हणायला वावगे ठरू नये.त्यामुळे  ठाणे जिल्ह्यातील महानगर पालिका प्रशासनाने काल्हेर ग्रामपंचायतीचा आदर्श घ्यावा व येणाऱ्या काळात सुधारणा कराव्यात......याच सदिच्छा....

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...