कल्याण दि.२(किशोर पाटील)कल्याण डोंबिवली महानगरपालिका ,आर एस पी अधिकारी युनिट आणि कल्याण शिक्षक सेना यांचा यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण मोहीम गुरुवार दि.२/९/२०२१ रोजी विभाग प्रमुख सुनील वायले यांच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठ कल्याण विभागीय कार्यालय येथे आर एस पी अधिकारी, शिक्षक युनिट, आणि शिक्षक सेना कल्याण यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली. कल्याण पश्चिम व वसंतव्हॅली परिसरात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे, तसेच हे लसीकरण केंद्र नियमित सुरू राहणार आहे .तरी कल्याण परिसरातील लाभार्थींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आर एस पी कमांडर डॉ. श्री. मनीलाल शिंपी यांनी दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून समस्थ नागरिकांना केले आहे.मुंबई विद्यापीठ उपकेंद्र येथे, कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.याठिकाणी दररोज १००० लाभार्थींना लसीचा लाभ घेता येणार आहे.कल्याण आर एस पी युनिटचे कमांडर मनीलाल शिंपी यांच्यासह अधिकारी अनंत किनगे ,बंशीलाल महाजन, भगवान परदेशी, बापू शिंपी, महादेव शिरसागर, आर आर भोकनल, जितेंद्र सोनवणे,किरण वसईकर,यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी कल्याण शिक्षक सेनेचे अध्यक्ष प्रशांत भामरे व शिक्षक सेना पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.आयोजक सुनीलजी वायले यांनी परिसरातील लोकांसाठी जी लसीकरण सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक आणि सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.तसेच हे स्ट्युत उपक्रम असल्याने सुनिल वायले यांचे सर्व नागरिकांच्या वतीने डॉ.श्री. मनीलाल शिंपी यांनी आभार व्यक्त केले आहेत...
Thursday, September 2, 2021
Subscribe to:
Post Comments (Atom)
ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द
* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द* पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...
-
*नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी माैजे ऊसर येथील जागा हस्तांतरित* *नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालकमंत्री कु.अादिती तटकरेंच...
-
वाहतूक नियंत्रण अधिसूचना यांना करण्यात येत आहे. पालघर :-ज्याअर्थी उपोद्घातातील अ.क्र.१ वर अंतर्भुत असलेल्या पत्रान्वये पालघर पोलीस ठाण्याचे ...
-
*स्व. हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुंदन भाऊ संख्ये यांनी आयोजित केलेल्या रक्तदान...
No comments:
Post a Comment