Friday, September 3, 2021

पालघर - बोईसर शहरातील शासकीय प्रसूती केंद्र त्वरीत सुरू करावी . श्री केदार काळे - शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक

पालघर - बोईसर शहरातील शासकीय प्रसूती केंद्र त्वरीत सुरू करावी .
   श्री केदार काळे - शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक 

पालघर ( हिरालाल लोखंडे )  पालघर ग्रामीण रूग्णालयात स्रीरोग तज्ञ असून ही इतर आजाराच्या उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या जास्त असल्या कारणांमुळे, प्रसूतीसाठी येणाऱ्या ( गरोदर ) महिलांना लगतच्या वैद्यकीय शिक्षण विभागांच्या प्रसूती केंद्रामध्ये पाठविण्यात येत असतात. करोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे प्रसूती साठी येणाऱ्या महिलांना दाखल करून घेण्यात येत नाही. तर प्रसूती साठी येणाऱ्या ( काही ) महिलांना गुंतागुंती झाल्याचे सांगुन, व पालघर ग्रामीण रूग्णालयात भुलतज्ञ ( डाॅक्टर ) नसल्याचे कारण सांगत, खाजगी रूग्णालयाकडे पाठवण्यात येत असल्याचे दिसुन येत आहे. मनोर ग्रामीण रूग्णालयाची नवरी नटली परंतु, स्रीरोग तज्ञ डाॅक्टर नसल्याने......... बोईसर येथील येथील ग्रामीण रूग्णालयात बंदच आहे. 
   पालघर - बोईसर येथील शासकीय प्रसूती केंद्र लवकरात लवकर सुरू करावी. करोना प्रादुर्भावामुळे, जरी करोना रूग्णांना ग्रामीण रूग्णालयात दाखल येत असलेतरी, प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांसाठी वेगळी सोय करावी. ज्यामुळे करोना रुग्णांशी त्यांचा संबंध येणार नाही. यांची खबरदारी घेत प्रसूती केंद्र सुरू करावीत. यासाठी मा. श्री राजेश टोपे आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य. मा. श्री, दादासाहेब भुसे पालक मंत्री पालघर, मा. पालघर जिल्हा शल्यविशारद ( शल्य चिकित्सक ) यांना सर्व खबरदारी सह, प्रसूती केंद्र सुरू करावी. अशी मागणी श्री केदार काळे शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक यांनी केली आहे. त्याच प्रमाणे पालघर ग्रामीण रूग्णालयात येथे लवकरात लवकर भूलतज्ञ यांची नेमणूक करण्यात यावी. मनोर ग्रामीण रूग्णालयात स्रीरोग तज्ञ डाॅक्टर यांची त्वरित नेमणूक करण्यात यावी. बोईसर ग्रामीण रूग्णालय लवकर सुरू करावे या बद्दल आरोग्य मंत्री, पालक मंत्री पालघर व पालघर शल्य चिकित्सक याच्या कडे मागणी केली आहे. अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...