Saturday, September 11, 2021

रेल्वे हमाल माथाडी कामगारांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन माथाडी'चे बेमुदत धरणे आंदोलन

रेल्वे हमाल माथाडी कामगारांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन माथाडी'चे बेमुदत धरणे आंदोलन 
 अहमदनगर दि.११(किशोर पाटील)
         अहमदनगर रेल्वे स्टेशन च्या ठेकेदार हुंडेकरी हे माथाडी कामगारांची अडवणूक करीत सुमारे ४० दिवसांपासून माथाडी कामगारांचे काम बंद केले आहे. व संपामुळे कामगार येतं नाहीत, असं खोटं बोलून प्रशासनाची फसवणूक केली आहे. गेल्या ४० दिवस काम नसल्यामुळे माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे, म्हणुन वंचित बहुजन माथाडी, ट्रान्सपोर्ट व कामगार युनियन च्या वतीने सर्व कार्यकर्त्यांना परिवारासह दि . १४/०९/२०२१ पासून सहाय्यक कामगार आयुक्त अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन माथाडी चे जिल्हा सरचिटणीस सुनिल भिंगारदिवे यांनी पत्राद्वारे दिला आहे
   यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे,महासचिव योगेश साठे, संघटक फिरोज पठाण,शहर जिल्हाध्यक्ष संजय जगताप,उपाध्यक्ष प्रवीण ओरे,भाऊ साळवे,मनोज कर्डिले,रेल्वे माथाडी कामगार अमर डाके,गौतम सैदाणे,अशोक देवकर, अमर ठाकूर,अमोल रणदिवे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...