वैतरणा नदीच्या पात्रात,
पालघर महसूल विभागाची कारवाई.
रेती चोरांच्या जाळल्या बोटी .
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) मा. जिल्हाधिकारी साहेब यांचे वैतरणा ब्रिज ( पश्चिम रेल्वे ) क्रमांक ९२ व ९३ च्या २ किलो मीटर परिसरात नौकानयन, रेती उत्खनन, व वाहतुकीसाठी मनाई आदेश क्र. जा. क्र. गृह / का. टे. मनाई आदेश / एस आर ३४ /२०२१दिनांक ३०/ ०८ / २०२१अन्वये च्या मनाई आदेशांचे उल्लंघन करीत सदर परिसरात स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरीत्या उत्खनन करून रेती चोरून, घेऊन जात असल्याची माहिती. महसूल विभागास मिळाली असताना, दिनांक ६ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ७ नंतर श्री सुनील शिंदे तहसीलदार तथा दंडाधिकारी सो. पालघर. यांच्या आदेशानुसार व त्यांच्या सह वैतरणा नदीच्या पात्रातील रेल्वे ब्रिज क्रमांक ९२, ९३ च्या पुर्वे कडील भागातील वैतीपाडा, वाढीव, कांदरवन, दारशेत उंबरपाडा विभागात. श्री सुनील शिंदे तहसिलदार पालघर, श्री राजेश पाटील मंडळ अधिकारी सफाळे, श्री अनिल वायाळ मंडळ अधिकारी तारापूर, श्री किरण जोगदंड तलाठी- तलाठी सजा जलसार, श्री रत्नदिप दळवी तलाठी- तलाठी सजा सफाळे श्री महेश कचरे तलाठी- तलाठी सजा चहाडे, श्री संजय चुरी तलाठी - तलाठी सजा उमरोळी श्री संदीप कहाळे सा. पोलीस निरीक्षक सफाळे पोलीस ठाणे. श्री भीमसेन गायकवाड सा. पोलीस निरीक्षक केळवा सागरी पोलीस ठाणे व त्यांचे कर्मचारी यांनी संयुक्त रित्या वैतरणा नदीच्या पुर्वेकडील पात्रात व रेल्वे ब्रिज क्रमांक ९२,९३ च्या शेत्रात गस्तीवर असताना, स्वतःच्या फायद्यासाठी, कोणत्याही प्रकरचा उत्खनन - वाहतुकीची परवानगी नसताना, चोरीच्या उद्देशाने रेती उत्खनन न वाहतूक करीत असताना आढळून आले असताना, थांबण्याचा इशारा दिल्यानंतर.बोटीवर कामकरणारे झाडा झुडपांचा सहार घेत पळुन गेले.
गस्ती पथकाने कारवाई करीत खालील प्रमाणे मुद्देमाल माल जप्त केला.१) वैतरणा नदीच्या ब्रिजच्या जवळपास वैतीपाडा.रेतीची भरलेली जुनी बोट पण वापरात असलेली.अंदाजे किंमत १,५०,०००/- रूपये. त्यात असलेली रेती २ ब्रास अंदाजे किंमत १९,७५८ /-रूपये. बोट मालक किशोर विश्वनाथ पाटील राहणार वैतीपाडा ता,जि पालघर.
२) वैतीपाडा - रेतीची भरलेली जुनी बोट पण वापरता असलेली, अंदाजे किंमत १,५०,०००/- रूपये.त्यात असलेली रेती २ ब्रास अंदाजे किंमत १९,७५८/- रूपये. सदर कारवाई श्री रत्नदिप दळवी तलाठी यांनी केली.
३) वैतरणा नदीच्या पुर्वेकडील पात्रत, दारशेत उंबरपाडा हद्दीत. एक लोखंडी बोट रेतीने भरलेली व सेक्शन पंप जुना पण वापरात असलेला. अंदाजे किंमत १२,००,०००/- रूपये व बोटीत असलेली रेती ८ ब्रास अंदाजे किंमत ७९,०३२ रूपये
४) वैतरणा नदीच्या पात्रात कांदरवन येथे जुनी पण वापरात असलेली रेतीने भरलेली बोट अंदाजे किंमत १,५०,०००/- रूपये .त्यात असलेली रेती २ ब्रास अंदाजे किंमत १९,७५८ /- रूपये. सदर कारवाई श्री किरण जोगदंड तलाठी जलसार यांनी केली आहे.
सदर संयुक्त कारवाईत १६,५३,३०६/-रूपये किंमतीचा मुद्देमाल माल जप्त करून मा. तहसीलदार साहेब यांच्या व पंचाच्या समक्ष सदर मुद्देमाल बाहेर काढण्यासाठी जेसीबी, हायझर व कोणत्याही प्रकारचे साधन उपलब्ध नसल्याने जागेवरच जाणून व पाण्यात बुडवून नष्ट करण्यात आला आहे पुढील कारवाई साठी सफाळे पोलीस ठाणे व सागरी पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे भारतीय दंड विधान सह कलम ३७९,१८८,३४ सह जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ ( ७ ) पर्यावरण अधिनियम १९८६ चे कलम १५ प्रमाणे दिनांक ६ सप्टेंबर २०२१ रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment