कोरोना सारख्या परिस्थितीत असे आरोग्य शिबिर घेणे काळाची गरज - प्रकाश पाटील
कल्याण आर एस पी टीमचे कार्य शिक्षण विभागासाठी प्रेरणादायी आहे - ज. मो. अभ्यंकर
शिक्षक सेना कल्याण, आर एस पी युनिट च्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न..
कल्याण दि.५(किशोर पाटील )
५ सप्टेंबर हा दिवस डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.त्यामुळे
कल्याण शिक्षक सेना अध्यक्ष श्री. प्रशांत भामरे व आर एस पी युनिट कमांडर डॉ.मणिलाल शिंपी यांच्या संयुक्त विद्यमाने साई स्वस्तिक हॉस्पिटल कल्याण पश्चिम येथे कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाची, सेवा करणाऱ्या, व प्रशासनाला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी आपले कर्तव्य बजावत असलेल्या आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट च्या शिक्षकांचा शिक्षक सेना अध्यक्ष व अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मा.ना. श्री.ज. मो. अभ्यंकर (राज्य मंत्री दर्जा)शिवसेना जिल्हाप्रमुख ठाणे ग्रामीण तथा
अध्यक्ष हातमाग महामंडळ महाराष्ट्र राज्य मा.ना.श्री.प्रकाश नकुल पाटील ( राज्यमंत्री दर्जा ),विजयजी साळवी, शिवसेना शहर प्रमुख कल्याण यांच्या शुभहस्ते विशेष सन्मान करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून आरोग्य शिबिराचे आयोजन करून कोरोना सारख्या परिस्थितीवर मात करण्यासाठी चांगले प्रयत्न कल्याण शिक्षक सेना व आर एस पी अधिकारी शिक्षक युनिटने केले आहे त्यामुळे या संपूर्ण युनिट चे मनापासून अभिनंदन करतो. कोरोना सारख्या परिस्थितीत असे आरोग्य शिबिर घेणे म्हणजे खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे असे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा हात माग महामंडळाचे अध्यक्ष( राज्यमंत्री दर्जा ) मा.ना.श्री.प्रकाश पाटील यांनी सांगितले.
अशा आरोग्य तपासणी शिबिरातून खऱ्या अर्थाने शिक्षक बंधूंना देखील आपल्या प्रकृतीची तपासणी करण्याची संधी मिळत आहे. या अनुषंगाने हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे .त्यामुळे कल्याण आर एस पी टीमचे कार्य शिक्षण विभागासाठी प्रेरणादायी आहे असे - अल्पसंख्यांक महामंडळाचे अध्यक्ष मा.ना.श्री.ज. मो. अभ्यंकर (राज्यमंत्री दर्जा) यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले .तसेच शिक्षक हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली उल्लेखनीय कामगिरी करून वेगळा ठसा उमटवत असतो . कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्यातील आर एस पी शिक्षकांनी कोरोना सारख्या महामारीत लोकांच्या मनामध्ये भिती निर्माण झाली होती कोणी कोणाला सहकार्य करायला पुढे येत नव्हते अशा परिस्थितीत आपली व आपल्या कुटुंबाची पर्वा न करता या आर .एस.पी शिक्षकांनी प्रशासन पोलीस विभाग यांना खांद्याला खांदा लावून सेवा दिली आणि हे करत असताना समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून गरजू लोकांना अनेक प्रकारच्या सेवा पुरवल्या खरोखर या युनिट चे कार्य म्हणजे संपूर्ण शिक्षण विभागाला नव्हे तर प्रशासनाला अभिमानास्पद आहे अशा शब्दात देखील त्यांनी शेवटी बोलताना गौरव केला.यावेळी चि. वैभव भोईर,विशाल बावा ,मुंबई शिक्षक सेना अध्यक्ष,अजित जी चव्हाण ,अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक सेना मुंबई ,मा. नगरसेवक सुनीलजी वायले व आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, कल्याण जिल्हा शिक्षक सेना अध्यक्ष, प्रशांत भामरे,सचिव श्री.जाधव व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेऊन आरोग्य शिबिर यशस्वी केले.
याप्रसंगी आर एस पी अधिकारी आर आर भोकणाल, केशव मालुंजकर, महादेव शिरसागर, बन्सीलाल महाजन, कैलास पाटील, छोटू अहिरे, दत्तात्रय सोनवणे, बापू शिंपी,संतोष गोर्डे, संजय फिरके दिलीप पावरा जितेंद्र सोनवणे, ऋषांत धामापुरकर, किरण वसईकर,सुभाष वानखेडे, विजय भामरे, अनंत किनगे,बाळकृष्ण जगे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत किनगे यांनी केले. आलेल्या सर्व मान्यवरांचे शिक्षक बांधवांचे शिबिरासाठी विशेष परिश्रम घेणारे आणि सहकार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी परिचारिका या सर्व टीमचे कल्याण जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष प्रशांत भामरे यांनी स्वागत करून आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment