Thursday, September 9, 2021

बोडक्या विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू !

बोडक्या विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू !

वासिंद(किशोर पाटील)- वासिंद पासून दहा कि.मी. अंतरावर असलेल्या वांद्रे गावाजवळील घाटाळ पाडा  येथील एका बोटक्या विहिरीत बिबट्याचा पडून मृत्यू झाला आहे. अशी माहिती रात्री उशिरा हाती आली.
   याबाबत वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला बाहेर काढले आहे. पिवळी जवळील वांद्रे येथील घाटाळपाडा या आदिवासी पाड्यावर असलेल्या एका जुन्या बोटक्या विहीरीत बिबट्या पडला असून त्या ठिकाणी दुर्गंधी वास येत असल्याचे  येथील शिवसेना शाखा प्रमुख विजय रेरा यांनी सांगितले.
  तर  यासंदर्भात वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी हे दाखल होऊन या बिबट्याला बाहेर काढण्यात आले आहे. तर रात्री शासकीय जागेत ठेवून त्यानंतर आज शवविच्छेदन करण्यात आले असून यामध्ये सदर बिबट्याचा पाण्यात बूडून मरण पावल्याचा प्राथमिक अहवालात नमूद झाले असल्याचे शहापूर वनक्षेत्रपाल प्रकाश चौधरी यांनी म्हटले. 
 सदर बिबट्या हा अंदाजे साडेतीन वर्षापुढील असून याबाबत पुढील योग्य ती पहाणी व तपासणी केली जाणार असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...