Saturday, September 11, 2021

श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण यांच्यावतीने २५० गरीब गरजु मुलांना शिरा व पोहे वाटप

श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण यांच्यावतीने २५० गरीब गरजु मुलांना
 शिरा व पोहे  वाटप
कल्याण दि.११(किशोर पाटील)कल्याण शहरातील श्री स्वामीनारायण ट्रस्ट,रोटी डे ग्रुप व  कच्छ युवक संघ कल्याण यांच्या सौजन्याने श्री स्वामीनारायण ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ.श्री. दिनेश बळवंतराय ठक्कर व सर्व पदाधिकारी यांनी गणेश चतुर्थीच्या मंगळ दिनी एक महाप्रसाद मानव सेवा हीच ईश्वर सेवा माणून   शुक्रवार दि.९/०९/२०२१ रोजी कल्याण शहरातील विविध विभागात जाऊन तेथील अनाथ,गोरगरीब,गरजु मुलांना शिरा व पोहे  वाटप केले,तसेच ते रोजच ५०० ते १००० गरीब, गरजु,अनाथ, बालकांना मोफत   कम्युनिटी किचन च्या माध्यमातून जेवण देतात.व आपल्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.
या त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा गौरव केला आहे. म्हणून त्यांच्या या स्त्युत उपक्रमाला दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...असेच सामाजिक,धार्मिक, आध्यात्मिक, कार्य त्यांच्या हातून घडावे याच सदिच्छा....

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...