मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण
पालघर (प्रतिनिधी)दि. 12 :- आदिवासी बहुल भागातील मानव विकास निर्देशांक वाढीसाठी शेतकरी, महिला व बरोजगार युवक, युवती यांना मानव विकास कार्यक्रम अंतर्गत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
प्रशिक्षणाचे उद्घाटन दि. 13 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कै. गोविंदराव दादोबा ठाकूर सभागृह, कै.चिं.ह.महाले बाग नवली, पालघर (पुर्व) येथे आयोजित करण्यात आले आहे. इच्छूकांनी वरील पत्त्यावर उपस्थित रहावे.
पिंजरा पद्धतीने मत्स्यव्यवसाय व इतर अनुषांगीक योजना राबविण्याकरीता तसेच प्रकल्प उभारणीसाठी खेळते भांडवल ( प्रथमवर्षी ) अर्थसहाय्य निवडलेल्या पात्र लाभार्थ्यास देण्यात येईल.
जलाशयाची नांवे :
1)सुर्या, ता. डहाणू, 2) रायतळे, ता . डहाण, 3) कुर्झे, ता. डहाणु 4) मोहखुर्द, ता . विक्रमगड. 5) खांड, ता.विक्रमगड, 6 ) वाघ , ता. मोखाडा . 7) बारवी, ता. मुरबाड, 8) जांभे, ता. शहापूर . 9) खराडे, ता . शहापूर 10) धसई, ता . मुरबाड
लाभार्थी पात्रता :
लाभार्थी प्रकल्प ठिकाण उपरोक्त जलाशयाच्या 6 कि. मि. परीक्षेत्रातील रहीवासी असावा, अनुसुचित जाती / जमाती, मच्छिमार सहकारी संस्था / बचतगट /महीला बचत गट / आत्मा गट यांस प्राधान्य.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :
आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, जात प्रामणपत्राची छायाप्रत, बैंक पासबुक प्रथम पानाचे छायाचित्र.
अधिक माहितीसाठी पुढील पत्यावर किंवा दूरध्वनीवर संपर्क साधावा
सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय ( तांत्रिक ) ठाणे- पालघर 4, रॉयल पाईन्ट - 2 . नवली फाटकाजवळ पालघर(पूर्व), ता. जि. पालघर पिन कोड नंबर - 401404 दुरध्वनी / फैक्स : 02525 - 252215 ईमेल : acfthanepalghar@yahoo.in
No comments:
Post a Comment