Wednesday, August 18, 2021

नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये एका शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यु

नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये एका शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यु

नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये एका शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टर स्वप्नील शिंदे असे या डॉक्टरचे नाव असून, तो गायनॅकॉलॉजीच्या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेत होतारॅगिंग प्रकरणातून स्वप्नीलचा घातपात झाल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.
कुटुंबियांकडून करण्यात आलेल्या आरोपांचे कॉलेज प्रशासनाकडून खंडन करण्यात आले आहे. याबाबत कॉलेच्या प्राचार्या मृणाल पाटील यांनी सांगितले की, मयत झालेल्या विद्यार्थी डॉक्टरवर मानसोपचार सुरू होते. रॅगिंग होत असल्याबाबतची कोणीतीही तक्रार स्वप्नील किंवा त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आली नव्हती. याप्रकरणी यापूर्वीही त्याच्या पालकांना बोलावण्यात आले होते. फेब्रुवारीपासून तो बीड येथील त्याच्या घरी होता. जूनमध्ये तो कॉलेजला परतल्यानंतर त्याच्या आईला त्याच्यासोबत राहण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याची आई त्याच्यासोबत येथेच राहत होती मात्र त्यांनीही आपल्याकडे कोणतीही तक्रार केली नसल्याचे प्राचार्या पाटील यांनी सांगितले. मात्र, कॉलेजमधील काही मुली त्याला मुददाम त्रास देत होत्या. त्याचे जे काम आहे ते न देता त्याचा मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केला आहे. स्वप्नीलकडे आढळून आलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याने रॅगिंग करणार्‍यांची नावेही दिली असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांकडून याबाबत तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...