Thursday, August 5, 2021

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे पालघर जिल्हयाचे ९३.२ टक्के उद्दिष्ट पूर्ण


*प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे पालघर जिल्हयाचे ९३.२ टक्के उद्दिष्ट पूर्ण*

पालघर (प्रतिनिधी)प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे पालघर जिल्हयाचे ९३.२ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेल्या एकूण मातांचे प्रमाण ५९९८९ इतके असून योजनेचे नोंदणी केलेले एकूण लाभार्थी: ६६५७३ इतके आहेत.
योजने अंतर्गत खात्यामध्ये  एकूण रक्कम रु २७ कोटी ३९ लाख २८ हजार इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. अशी माहिती बुधवार, दि.०४ ऑगस्ट २०२१ रोजीच्या जिल्हास्तरीय पोषण अभियान अंतर्गत जिल्हा अभिसरण समिती सभेमध्ये आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

 जिल्हयातील लाभार्थ्यांनी  या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पालघर जिल्हा परिषदेचे  अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व सर्व सदस्य तसेच सर्व जिल्हा व तालुका विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  सिध्दाराम सालीमठ यांनी केले.

पालघर जिल्हयातील आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघर व वसई विरार महानगरपालिका मार्फत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविली जाते. या योजनेचा लाभ पहिल्या खेपेच्या गर्भवती महिलांना ३ टप्प्यात दिला जातो.

पहिला हप्ता मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसाच्या आत शासकीय आरोग्य संस्थेत गर्भधारणा नोंदणी केल्यावर १ हजार रुपयांचा लाभ मिळतो.

दुसरा हप्पा किमान एकदा प्रसूतीपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे ६ महिने पूर्ण झाल्यानंतर हप्ता २ हजाराचा लाभ लाभार्थीच्या खात्यात जमा केला जाईल.
तिसरा हप्ता प्रसूती नंतर बाळाचे जन्म नोंदणी व ३ महिन्याचे प्राथमिक लसीकरण पूर्ण केल्यानंतर २ हजार रुपयांचा लाभ मिळतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थाचे आधार कार्ड, पतीचे आधारकार्ड, मातेचे आधार संलग्न बँक खाते किंवा पोस्ट बैंक खाते माता बाल संगोपन कार्डची सत्यप्रत व जन्म नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य पालघर जिल्हयासाठी राज्यस्तरावरून जाने २०१७ ते मार्च २०२२ साठी एकूण ७१४६७ लाभार्थी नोंदणीचे उद्दिष्ट प्राप्त आहे. त्यापैकी दि. ०४ ऑगस्ट २०२१ अखेर ६६५७३ लाभार्थीची नोंदणी पूर्ण करून ९३.२ टक्के उद्दिष्ट साध्य साध्य केले आहे. तसेच आजतागायत २७ कोटी ३९ लक्ष २८ हजार रुपयांचा निधी लाभाथ्र्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. पालघर जिल्हयातील ग्रामीण भागासाठी दिलेल्या उद्दिष्टापकी १००.८ टक्के पेक्षा जास्त उद्दिष्ट साध्य केले असुन बसई विरार महानगरपालिका यांना दिलेल्या उद्दिष्टापैकी ८४.७ टक्के उद्दिष्ट साध्य बाकीचे उदिदष्ट मार्च अखेर पर्यंत साध्य करण्याचे प्रयत्न सुरु झाले असून प्रधानमंत्री मातृ वंदना योजने विषयी अधिक माहितीसाठी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य
सेविका यांच्याशी संपर्क साधून योजनेचा लाभ घेता येईल." अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दयानंद सूर्यवंशी यांनी दिली.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...