Monday, August 2, 2021

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग आयोजित आर .एस. पी .अधिकारी युनिट यांच्या सौजन्यानेसफाई कर्मचारी व पत्रकारांना रेशन कीट वाटप कार्यक्रमाचे आयोजन!

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग आयोजित आर .एस. पी .अधिकारी युनिट यांच्या सौजन्याने
सफाई कर्मचारी व पत्रकारांना रेशन कीट वाटप कार्यक्रमाचे आयोजन!

  समाजसेवकांचा ग्लोबल पीस भारत सेवा रत्न सुवर्ण पदक पुरस्कार देऊन होणार सन्मान ....
भिवंडी दि.२(स्व.रा.तो)महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग आयोजित आर .एस. पी .अधिकारी युनिट ठाणे यांच्या सौजन्याने ग्रामपचायत वळ येथील
सफाई कर्मचारी व भिवंडी शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांना रेशन कीट वाटप कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि.४/०८/२०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.वसंत मुंढे,कार्याध्यक्ष श्री,संजयजी भोकरे,राज्य सरचिटणीस श्री विश्वासराव आरोटे,प्रसिध्दी प्रमुख श्री.नवनाथ  जाधव,कोकण विभाग अध्यक्ष श्री नितीन शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली दैनिक स्वराज्य तोरण कार्यालय  कैलास नगर वळपाडा भिवंडी येथे आयोजित करण्यात आला आहे.याच कार्यक्रमाचे औचित्य साधुन सामाजिक, शैक्षणिक ,क्रीडा, सांस्कृतिक,आरोग्य,व वारकरी संप्रदायात नेहमीच सामाजिक बांधीलकी जपून मदतीचा हात पुढे करणारे. श्री.सोन्या काशिनाथ पाटील,श्री.यशवंत महादू सोरे,श्री.रामचंद्र शांताराम देसले,श्री.श्रीधर जयवंत पाटील,श्री.किशोर बळीराम पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन आर. एस. पी .कमांडर  श्री.मनिलाल शिंपी यांनी  ग्लोबल पीस ब्रँड अँबेसिडर अँड डायरेक्टर,  महाराष्ट्र राज्य महात्मा गांधी  ग्लोबल पीस फाउंडेशन, इन्स्टिट्यूट, आयएसओ प्रमाणित, ओडीसा स्टेट गव्हर्मेंट संलग्न आयोग पुरस्कृत,(The Globle Best Social Worker award 2021, आणि Bharat Seva Ratna Gold Medal award 2021) 
ग्लोबल पीस भारत सेवा रत्न सुवर्ण पदक पुरस्कार देऊन वरील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.तसेच पाच महिला पत्रकार यांचा देखील हिरकणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.तर पत्रकार बांधवांना देवदूत पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती आर .एस. पी. कमांडर  श्री.मनिलाल शिंपी यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना दिली.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...