*पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार सर्वोत्कृष्ट क्लस्टर,तालुक्यांचा गौरव*
पालघर (प्रतिनिधी)शासन निर्णय क्रमांक प्रभायो २०२०/प्र.क्र. १०७ / योजना १० दि. १० जून २०२९ अन्वये दिनांक २० नोव्हेंबर २०२० ते दिनांक ५ जून २०२१ याया कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात आले आहे. अभियाना अंतर्गत शासन निर्णय निकषांवर (भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, घरकुलांच्या उद्दिष्टाप्रमाणे १०० टक्के मंजुरी देणे, मंजुर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे १०० टक्के वितरण करणे, मंजुर घरकुले १०० टक्के भौतीकदृष्टया पूर्ण करणे, मंजुर घरकुले १०० टक्के आर्थिकदृष्टया पूर्ण करणे, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे, डेमो हाऊसेस उभारणे, कायमस्वरूपी प्रतिक्षा यादीतील लाभाच्यांचे आवार सिडींग व आवास प्लस मधील लाभार्थ्यांचे आधार सिडींग / जॉब कार्ड मॉपिंग १०० टक्के पूर्ण करणे, शासकीय योजनांशी कृतीसंगम व नावीन्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी करणे, प्रलंबित घरकुले) मुल्याकन करण्यात आले. त्याअनुसरूण खालीलप्रमाणे सर्वोत्कृष्ट तालुका, क्लस्टर, ग्रामपंचायत व ग्रामीण गृहनिर्माण योजनेकरीता लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी कर्ज देणारी सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्था निवड करण्यात आलेले आहे. त्यापैकी प्रथम क्रमांक मिळालेल्या संस्थाना दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी मा. पालकमंत्री यांच्या गौरवण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक माणिक दिवे (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पालघर ) यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेअंतर्गत सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून जव्हार तालुका सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून आबिटघर ता.वाडा सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत सातीवली ता.पालघर यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर ग्रामीण गृहनिर्माण योजनेकरिता लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी कर्ज देणारी सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्थांची शाखा जव्हार ची प्रथम क्रमांकावर निवड करण्यात आली आहे
. राज्यपुरस्कृत आवास योजने अंतर्गत सर्वोत्कृष्ट तालुका मोखाडा, सर्वोत्कृष्ट क्लस्टर पोशेरा (मोखाडा ), सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत सायदे (मोखाडा) म्हणून प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य मंत्री आवास योजना अंतर्गत जिल्ह्यातील घरकुले बांधण्यास विशेष योगदान देणारे जिल्हा प्रभारक धनंजय पाटील आणि जिल्हा डेटा एंट्री ऑपरेटर कमलेश गुणगुणे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment