*कोस्टल हायवे कॉरिडोर अंतर्गत पालघर व वसई तालुक्यांना जोडणा-या फुलाच्या मागणीकरिता बविआ शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांची भेट*
पालघर (प्रतिनिधी)मुंबईसह पालघर जिल्हा तसेच दक्षिण गुजरातकडे जोडणारा समुद्री महामार्ग म्हणजे कोस्टल हायवे राष्ट्रीय महामार्गाशी जोडणार असल्याने किनाऱ्यावरील कॉरिडोर आणि रिंग रोड रस्ता अशा दोन रस्त्यांवरून भविष्यात वाहतूक सुरू होणार आहे. यामध्ये सध्याचा राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात आहे. तर, प्रस्तावित खाडी पुलापासून नायगाव पुलापर्यंत मुंबई सागरी रोड म्हणून प्रस्तावित आहे. सागरी महामार्ग पश्चिम किनारपट्टीच्या शहराशी जोडत असला तरी, टेंबीखोडावे (पालघर तालुक्यातून) ते मारंबळपाडापर्यंत (वसई तालुका) हा सागरी महामार्ग जोडला तर थेट मुंबई-वसई-विरार आणी गुजराथमधील शहरांना हा सागरी महामार्ग जोडला जाईल. त्यामुळे पालघर तालुका व वसई तालुका ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख पुलांचा समावेश करून लवकरात लवकर त्याला मंजुरी मिळावी याकरिता विनंती नालासोपाराचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी केंद्रीय नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे फेब्रुवारी 2019 मध्ये कार्यालयात भेट घेतली होती.त्यावेळस तात्काळीन महापौर श्री रूपेश जाधव आणि माजी महापौर श्री. नारायण मानकर उपस्थित होते. करोना काळामध्ये ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा पाठपुरावा करणे जमले नव्हते म्हणून दि. 12/08/2021 रोजी बविआ शिष्टमंडळाने रस्ते, भूपृष्ठवहन आणि राजमार्ग केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांची भेट घेतली आमदार श्री. क्षितीज ठाकूर यांच्या प्रस्तावावर नियोजनाचे काम सुरू असून लवकरच त्याची पुर्तता करणार असल्याची माहिती मंत्री महोदयांनी दिली.
याचबरोबर घोडबंदर - वर्सोवा पुल या ठीकाणी होणारी वाहतुक कोंडी संपवण्यासाठी केंद्रीय रस्ते निधीतून वसई तालुक्यातील नागले ते ठाणे तालुक्यातील भाईदरपाडा दरम्यान ब्रिज बाधण्यात यावा, पालघर तालुक्यातील दहिसर- बहाडोळी दरम्यान नदीवर मोठा ब्रिज बांधावा, महामार्ग 48 चे काम ब-याच ठिकाणी अपुर्ण आहे ते पुर्ण करावे, महामार्ग 48 वर वसई तालुक्यातील बावखळ, शिवेचा पाडा, खानिवडे, पालघर तालुक्यातील वाडा खडकोना येथे पादचारी पुल आणि सकवार व सातीवली येथे अंडरपास बांधावे अशा मागण्या आमदार श्री राजेश पाटील, माजी खासदार श्री बळीराम जाधव, माजी जि.प. अध्यक्ष श्री. काशीनाथ पाटील, माजी महापौर श्री. नारायण मानकर आणि अँड. नितीन भोईर यांच्या शिष्टमंडळाने केल्या
त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले.
No comments:
Post a Comment