कै. मोहन सिताराम हडळ रा. वेळगाव ता,जि पालघर, यांच्या वारसांना " राज्य राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद " व्दारा रूपये ४,००,०००/- मदत
पालघर ( हिरालाल लोखंडे ) दिनांक २५ जून २०२१ रोजी पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे , पालघर जिल्ह्यातील अनेक गावे - पाडे - वस्ती असलेली ठिकाणे जलमय झालेली. तर अनेक ठिकाणी पूर - महापूराने थैमान घातलेले. क्षणात होत्याचे, ना होते केले. वेळगाव ता,जि पालघर येथील मोहन सिताराम हडळ यांना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने, पुरात वाहून गेले. कुटूंबातील कर्ता पुरूष मुसळधार पडणाऱ्या पावसाच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे, निराधार कुटूंबातील व्यक्तीना, मायेचे पांघरूण म्हणून दिनांक १३ आॅगस्ट २०२१ रोजी कै. मोहन हडळ यांच्या कुटूंबाला राज्य राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून ४,००,०००/- रूपये अक्षरी चार लाख रूपये. मा. श्री राजेश पाटील आमदार बोईसर विधानसभा, मा. श्री राजेंद्र गावीत खासदार पालघर, श्री सुनील शिंदे तहसिलदार पालघर, यांनी कै. मोहन हाडळ यांच्या राहत्या घरी जावून, सदर निधी त्यांच्या कुटूंबाला सुपूर्त केला. या प्रसंगी आमदार राजेश पाटील यांनी हाडळ कुटूंबाचे सांत्वन करीत, तहसिलदार शिंदे साहेब पालघर यांना सदर कुटूंबीयांना, घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी सूचना दिल्या.
या प्रसंगी श्री राजेश पाटील आमदार साहेब, मा. श्री राजेंद्र गावित साहेब खासदार पालघर, श्री सुनील शिंदे तहसिलदार पालघर, यांच्या सह श्री काळुराम दोधडे ( काका ) आदिवासी एकता परिषद संस्थापक, श्री विश्वनाथ घरत बहुजन विकास आघाडी पालघर जिल्हा उपाध्यक्ष, अॅड. नितीन भोईर बहुजन विकास आघाडी पदाधिकारी, श्री दिलीप गायकवाड - आदिवासी दलित सेना संस्थापक, श्री संदीप म्हात्रे मंडल अधिकारी मनोर, श्री कचरे तलाठी, तलाठी सजा मनोर, अंकुश पडवळे सरपंच कोंढाण, जितेंद्र संखे ग्रामसेवक, प्रताप पाटील उपसरपंच ग्रा. पंचायत निहे, भुषण पाटील / सुधीर माने बहुजन विकास आघाडी पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment