*
, तलाव, धरणे, समुद्र किनारे या पर्यटन स्थळांच्या 1 कि.मी. परीसरात मनाई आदेश लागु
पालघर(प्रतिनिधी) दि. 11 :- पालघर जिल्ह्यामध्ये मान्सून कालावधीत मोठ्या संख्येने पर्यटक धबधबे, तलाव, धरणे व समुद्र किनारी येत असतात व त्या ठिकाणी जिवीतहानी होण्याच्या घटना घडत असतात. सद्य:स्थितीमध्ये पालघर, जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रात कोविड-19 विषाणूच्या संसर्गाचा विचार करता, पावसाळ्यात पालघर जिल्ह्यामध्ये असलेले धबधबे, तलाव किंवा धरणे, समुद्र किनारे इत्यादी पर्यटन ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी आल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची व सामाजिक अंतर राखले न गेल्यास तेथे कोविड - 19 चा प्रसार व प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी पर्यटकांची सुरक्षा अबाधित रहावी व कोणत्याही प्रकारची जिवीतहानी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करणे गरजेचे आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी पालघर, डॉ. किरण महाजन यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन पालघर जिल्ह्यातील वसई तालुका वगळून उर्वरीत सात तालुक्यांचे क्षेत्रातील सर्व धबधबे, तलाव, धरणे, समुद्र किनारे या पर्यटन स्थळांच्या 1 कि.मी. परीसरात दि.11/08/2021 ते दि.30/09/2021 या कालावधीमध्ये खालील बाबींकरीता प्रतिबंधात्मक आदेश लागू करीत आहेत.
1. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.
2. धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.
3. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडें, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे.
4. पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थे प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे.
5. वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे.
6. वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतूकीस परिणाम होईल अशा प्रकारे वाहने चालविणे.
7. वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटे करणे.
8. सार्वजनिक ठिकाणी खादयपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टीकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टीकचे साहित्य उघडयावर इतरत्र फेकणे.
9. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगळटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लील हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.
10. सार्वजनिक ठिकाणी मोठया आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डि.जे. सिस्टीम वाजवणे, गाडीमधील स्पिकर / उफर वाजवणे व त्यामुळे ध्वनी प्रदुषण करणे.
11. ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे.
सदरच्या मनाई आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील 51(b) नुसार कारवाई करण्यात येईल.
No comments:
Post a Comment