Tuesday, July 6, 2021

आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करून G2C सेवा कार्यान्वीत " करणेकामी जिल्हयाचे संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणेचे आवाहन

*''आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करून G2C सेवा कार्यान्वीत " करणेकामी जिल्हयाचे संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणेचे आवाहन*

पालघर (प्रतिनिधी)दि. ०६ :- महा ई-सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र, नागरी सुविधा केंद्र तसेच संग्राम केंद्र यांना आपले सरकार सेवा केंद्रे हे नाव देऊन सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरचे एक सारखे बँडिंग करण्यात आले आहे. आपले सरकार सेवा केंद्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळावर सोपविण्यात आली असलेबाबत जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांचे मार्फत कळविले आहे.

जिल्हयातील रिक्त असलेल्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करून G2C सेवा कार्यान्वीत करणेबाबतची जाहीर नोटीस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://palghar.gov.in/या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्जदारांनी दिनांक ०७ जुलै, २०२१ ते २१ जुलै, २०२१ या कालावधीत जिल्हाचे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या गुगल फॉमव्दारे अर्ज सादर करावा. अर्जदार यांचेकडे अर्ज सादर करते वेळी सी. एस. सी आय डी असणे आवश्यक आहे. आवश्यक असलेल्या ठिकाणी संग्राम केंद्र आयडीधारक असल्यास त्यांस प्रथम प्राधान्य देणेत येईल. या बाबत अधिकची माहिती जिल्हयाचे संकेतस्थळावर, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पंचायत समिती यांचे कार्यालयाचे नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली असलेबाबतची माहिती डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी पालघर यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...