Wednesday, July 7, 2021

राष्ट्रीय महामार्ग बनला खैर चोरांचा महामार्ग ?

राष्ट्रीय महामार्ग बनला खैर चोरांचा महामार्ग  ?

सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक ६ जुलै २०२१ रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वरील मनोर ते खानिवडे परिसरातील मौजे दहिसर तर्फे मनोर विभातील मौजे हालोली, कुडा, वरई नाका, गांंजा ढेकाळे येथील कार्यरत वन अधिकारी कर्मचारी वर्ग आपल्या कर्तव्यावर असताना. त्यांना गोपनीय रीत्या माहिती मिळाली, आज रात्री राष्ट्रीय महामार्गा लगत वसलेल्या सतीवली पाटील पाडा. येथे स्व:ताच्या फायद्यासाठी, वनविभागाचा कोणताही कायदेशीर परवाना नसताना, चोरट्या मार्गाने तोड केलेली, खैर जातीच्या प्रवर्गातील लाकडाची ओंडके भरलेल्या टेम्पो व्दारे खैराची ओंडके वाहतूक होणार आहे. त्यामुळे वन अधिकारी कर्मचारी यांनी रातभर दक्ष राहून जागता पाहरा देत असताना ,पहाटे अंदाजे ३ - ३० च्या दरम्यान खैरा रे सतीवली मार्गे एक टेंपो येत असल्याचे कळाले. चोरट्या रीतीने लाकडांची वाहतूक करणारे यांचा शोध घेत असताना, गाडी चालकाने , वनविभागाच्या कर्मचारी वर्गाने आपल्यास घेरलेले लक्षात येताच, गाडी चालक गाडी सोडून, अंधाराचा फायदा घेत, पसार झाला असताना, वनकर्मचारी यांनी पाठलाग करून सुध्दा मिळून आला नाही. 
वनकर्मचारी यांनी सदर टेम्पो क्रमांक एम एच ०४ जे के १३५७ ची झडती घेतली असताना त्या टेम्पो मधे खैर प्रजातीच्या लाकडाचे ओंडके ५० नग मिळुन आले. त्याचा आकार ० - ९३८ घन मिटर असा आहे. त्या जप्त केलेल्या मुद्दे मालाची किंमत ७,९७५ रूपये ऐवढी वनकर्मचारी यांच्या कडून सांगण्यात येत आहे. सदर गाडी टेम्पो जप्त करून रेंज कार्यालय येथे ठेवण्यात आला आहे. 
भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ ( ब ) ड व फ, ४२ ( १ ) तसेच महाराष्ट्र वन नियम २०१४ चे कलम ३१, ४७,५३,३२ अन्वये वरिष्ठ अधिकारी नम्रता हिरे वनशेत्र अधिकारी दहिसर तर्फे मनोर. यांच्या मार्गदर्शनाखाली एम टी उत्तेकर वनपाल गांजा, आर के पिंपळे वनपाल कुडा, एम मोरे वनरक्षक दहिसर तर्फे मनोर, भाईदास सातवी, विष्णू सांबरे, सुरेश किणी, रमेश किणी, सिताराम कोळेकर, मदन प-हाड, अजय जाबर सर्व वन मजुन यांनी यशस्वीपणे कामगिरी केली.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...