मा. ग्रामविकास राज्यमंत्री श्री अब्दुल सत्तार यांच्याशी नवीन विकास कामे यावर धोरणात्मक चर्चा
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक ०८ जुन २०२१ रोजी पालघर तालुक्याचे जनक व राजकीय शेत्रात लोकहिताची प्रभावीपणे कामे करवून घेणारे, मा. राजेंद्र गावीत साहेब खासदार यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री अब्दुल सत्तार यांची मंत्रालयात जाऊन जनहिताच्या कामासाठी भेट घेतली.
यावेळी गाव खेड्यातील ग्रामविकास योजने अंतर्गत पालघर जिल्ह्यातील ग्रामीण वस्त्यांचा विकास करीता गावांतर्गत रस्ते, पाऊस पाणी निचरा व संरक्षक भिंती, ग्रामपंचायत कार्यालयांचे नूतनीकरण, गाव - खेड्यातील आठवडे बाजारासाठी सुविधा, गाव तेथे समाज मंदीर / सभागृह, सार्वजनिक शौचालये, एस टी बसच्या प्रवाश्यांना बस स्टाप ठिकाणी प्रवासी निवारा शेड, सार्वजनिक ठिकाणी बगिचा व सुशोभिकरण, लोड शेडिंग व कमी दाबाने विज पुरवठा होणार्या गावांना सोलर पथ दिवे, तसेच चौकात सोलर हायमस्ट व सुशोभीकरण इत्यादी मूलभूत विकासाकरिता पालघर जिल्ह्याला विषेश सहाय्य करण्याची चर्चा करुन निवेदनही देण्यात आले.
ग्रामविकास राज्यमंत्री यांनी पालघर जिल्ह्यातील गाव - खेडी - पाडे यांचा नियोजनात्मक दूरदृष्टी कोन पाहता, आपण यावर सविस्तर चर्चा व योग्य धोरणात्मक निर्णय घेऊन ग्राम खेड्यांच विकासासाठी योग्य असे निर्णय घेण्यासाठी मी प्रयत्न शिल असेल असे चर्चेत बोलताना दिसुन येत आहे.
No comments:
Post a Comment