Monday, June 28, 2021

जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लागु नये म्हणून नागरिकांनी कोव्हिड नियमांचे पालन करावे- जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ

जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लागु नये म्हणून नागरिकांनी कोव्हिड नियमांचे पालन करावे
- जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ
पालघर(प्रतिनिधी) दि. 28 : मा. मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेश दिनांक 04/06/2021 नुसार संपूर्ण जिल्ह्याचा कोविड Positivity दर 5 टक्के पेक्षा कमी असल्यास Level 1 व Level 2 मध्ये व Positivity दर 5 ते 10 टक्के असल्यास Level 3 मध्ये समावेश होतो. दि. 25/06/2021 नुसार RTPCR Positivity दराप्रमाणे पालघर जिल्ह्यामध्ये Level 3 निश्चित करण्यात आली आहे.
मात्र दि. 26/06/2021 रोजी 13.8% व दिनांक 27/06/2021 रोजी 12.9% एवढा Positivity दर वाढला आहे. पालघर जिल्ह्यात पालघर ग्रामीण 750, वसई विरार शहर महानगर पालिका 1232 एवढया केसेस आहेत.
नागरिकांनी कोविड नियमांप्रमाणे वर्तणूक करणे आवश्यक आहे. लक्षणे असलेल्या नागरिकांनी त्वरीत कोविड चाचणी करावी. तसेच इतरांना देखील प्रवृत्त करावे. Rapid Antigen Test (RAT) Negative असल्यास RTPCR चाचणी करावी. जेणेकरुन वेळेत उपचार होणे शक्य आहे. घरांमध्ये विलगीकरणात (Home Quarantine) असलेल्यांनी बाहेर फिरु नये. त्यांच्यापासुन त्यांच्या कुटुंबीयांना तसेच इतर लोकांना देखील बाधा होऊ शकते. Positivity दर वाढल्यास जिल्ह्यामध्ये Level 4 चे निर्बंध लावण्यात येतील. एकदा लावलेले निर्बंध 2 आठवडे कमी करता येणार नाहीत. तरी नागरिकांनी या कामी सहकार्य करावे. जेणेकरुन तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास योग्य नियोजन करता येईल. असे आवाहन जिल्हाधिकारी पालघर तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पालघर डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे.
*******

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...