*पालघर जिल्ह्यात कृषि संजीवनी मोहिम ची गारगाव-खानीवड़ी च्या धामटने पाड़ा येथून सुरुवात*
पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील कृषि विभाग कडून कृषि संजीवनी मोहिम सोमवारी 21 जून रोजी सुरूवात करण्यात आली। कार्यक्रम पालघर तालुक्यातील धामटनी पाड़ा येथे गारगाव खानीवड़ी ग्रुप ग्राम पंचायत सरपंच सौ. सुजाता संतोष दळवी ह्यांच्या अध्यक्षते खाली झाला। यावेळी शेतकरी आशाद बी शेख मंचावर विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते।
कार्यक्रमाची सुरुवात कृषि पर्यवेक्षक सुधीर गावड़ ह्यांनी परिचय केला व पुष्पगुच देवून पाहुण्याचे स्वागत केले। मंचावर काशीनाथ तरकसे - जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पालघर, तरुण वैती - तालुका कृषी अधिकारी पालघर, प्रसाद गुंजवटे- मंडळ कृषी अधिकारी पालघर आणि सुधीर गावड - कृषी पर्यवेक्षक, तारापूर उपस्थित होते।
तालुका कृषी अधिकारी पालघर तरूण वैति ने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सुधारित पद्धतीने भात लागवड, बांधावर तूर लागवड, फलोद्यान लागवड, विकेल ते पिकेल ची सखोल माहिती दिली।
शेतकरी आशाद बी शेख ह्यांनी आपल्या शेतीत शेत तळ आणि त्यातून आर्थिक नफा, पिकेल ते विकेल, कृषि विभाग कडून जी सल्ला व वेळोवेळी मिलालेला मार्गदर्शन चा अनुभव इतर शेतकऱ्यांना सांगताना सांगितले की शासकीय योजनेतून शेत तळ बांधून त्यातून चांगलीच उत्पन्न घेता येते। श्री शेख म्हणाले की शेतकऱ्यांनी शेत तळ योजना च्या लाभ घ्यावा आणि आपली उत्पन्न वाढवावा।
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पालघर श्री काशीनाथ तरकसे ह्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शेतकऱ्यांनी स्वतः बीजप्रक्रिया कशी करावी. त्यानी बियाणे चा दर्जा कसा स्वत करून घ्यावा, है करुन दाखवले। बांधावर तूर आधुनिक पद्धतीने लागवडीचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। शासनाचा विविध योजनांची माहिती दिली.
शेतकऱ्यांना तूर वाटप प्रगतशील शेतकरी आशाद शेख, सरपंच सौ. सुजाता संतोष दळवी च्या हस्ते वाटप करण्यात आला।
हया कार्यक्रमात कृप तारापूर सजेतिल सर्व कृषी सहाय्यक सौ. रेखा पाटील, सौ. प्रतिभा लोंढे, सौ. तनुजा मुकणे, सौ. काजल भाताडे, रक्षित पाटील आणि प्रितम गोवारी उपस्थित होत्या।
Good
ReplyDelete