Wednesday, June 30, 2021

कृषी संजीवनी अंर्तगत कार्यक्रम संपन्न

कृषी संजीवनी अंर्तगत कार्यक्रम संपन्न 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक ३० जून २०२१ रोजी मौजे मायखोप ता,जि पालघर येथे कृषी संजीवनी अंर्तगत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला. या कार्यक्रमात मा. श्री काशिनाथ तरकसे - जिल्हा कृषि अधिकारी साहेब यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शेतकर्‍यांना, चारसूत्री पध्दतीने भात लागवड, एस आर आय / एस आर टी, भात लागवडी मध्ये पट्टा पध्दत, बांधावर तुर लागवड, तुर लागवडी नंतर शेंडा खुडणे, विरळणी करणे, शेत तलावातून मत्स्य पालन  ( मत्स्य शेती ) करणे, एम आय डी एच, कृषक अॅप अश्या विविध योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित शेतकर्‍यांच्या शंकेचे निरसन केले. श्री अजय हुले - मंडळ कृषी अधिकारी व  श्री किरण संखे - कृषी पर्यवेक्षक यांनीहि कृषी विभाच्या योजनांची माहिती शेतकर्‍यांना दिली. श्रीमती हर्षदा विनोद गावड - कृषी मित्र / महिला गटाच्या अध्यक्षा यांनी आपले अनुभव सांगितले. 
      कार्यक्रमास निलम संखे - कृषी पर्यवेक्षका, श्री योगेश पाटील   माजी जि, प सदस्य, रिचा संखे - कृषी सहाय्यक, श्रीमती करूणा पाटील - सरपंच, रूपाली धोंगडे, सरिता ठाकरे गावातील प्रतिष्ठित नागरिक शेतकरी बंधू यांच्या समक्ष मान्यवरांच्या हस्ते शेतकर्‍यांना तुर बियाणे वाटप करण्यात आले. अशी माहिती श्री प्रकाश सावर सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडुन मिळत आहे.

Tuesday, June 29, 2021

तोक्ते चक्रीवादळ नुकसानीची माहिती

तोक्ते चक्रीवादळ नुकसानीची माहिती 

पालघर (प्रतिनिधी)दि. २९: दिनांक १६ व १७ मे २०२१ रोजी "toपालघर दि. २९: दिनांक १६ व १७ मे २०२१ रोजी " तोक्ते " चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात खालीप्रमाणे नमुद केल्यानुसार नुकसान झालेले आहे.

१. मयत व्यक्ती: ३ जखमी व्यक्ती ४. २. शेतीपिके १४३४८ शेतकऱ्यांचे ६०५७.३० हे. आर. क्षेत्र.
३. मयत जनावरे ८.
४. पुर्णत: नष्ट/अंशत: पडझड झालेली कच्ची/ पक्की घरे १४४०७ ५. अंशतः बाधित बोटी-२८, पूर्णतः बाधित बोटी २५, पुर्णतः नष्ट झालेले जाळे २६६.
६. दुकानदार/टपरीधारक ४. ७. कुक्कुटपालन शेड १९
सदर नुकसानीसाठी महसूल व वनविभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दि.०३.०६.२०२१ व २३.०६.२०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार विशेष दराने मदत जाहिर केलेली असून शासनाकडून रक्कम रुपये ५१३७८५०००/- (अक्षरी एक्कावन्न कोटी सदोतीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये मात्र) इतके अनुदान जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेले आहे. पालघर जिल्ह्यातील संबंधित तहसिलदार/ सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग / जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सदरचे अनुदान उपलब्ध करुन दिलेले असून ते बाधितांना तात्काळ वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पालघर यांनी सर्व संबंधितांना दिलेले आहेत. असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर डॉ किरण महाजन यांनी कळविले आहे." चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात खालीप्रमाणे नमुद केल्यानुसार नुकसान झालेले आहे.
१. मयत व्यक्ती: ३ जखमी व्यक्ती ४. २. शेतीपिके १४३४८ शेतकऱ्यांचे ६०५७.३० हे. आर. क्षेत्र.
३. मयत जनावरे ८.
४. पुर्णत: नष्ट/अंशत: पडझड झालेली कच्ची/ पक्की घरे १४४०७ ५. अंशतः बाधित बोटी-२८, पूर्णतः बाधित बोटी २५, पुर्णतः नष्ट झालेले जाळे २६६.
६. दुकानदार/टपरीधारक ४. ७. कुक्कुटपालन शेड १९
सदर नुकसानीसाठी महसूल व वनविभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दि.०३.०६.२०२१ व २३.०६.२०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार विशेष दराने मदत जाहिर केलेली असून शासनाकडून रक्कम रुपये ५१३७८५०००/- (अक्षरी एक्कावन्न कोटी सदोतीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये मात्र) इतके अनुदान जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेले आहे. पालघर जिल्ह्यातील संबंधित तहसिलदार/ सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग / जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सदरचे अनुदान उपलब्ध करुन दिलेले असून ते बाधितांना तात्काळ वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पालघर यांनी सर्व संबंधितांना दिलेले आहेत. असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर डॉ किरण महाजन यांनी कळविले आहे.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झालेल्या कुटूंबातील व्यक्तीने संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ ऑनलाईन अर्ज सादर करावे

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झालेल्या कुटूंबातील व्यक्तीने 
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ ऑनलाईन अर्ज सादर करावे

पालघर(प्रतिनिधी) दि. 29 : राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली (National Scheduled Castes and Development Corporation) यांच्यामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी Support for Marginalized Individuals for Livelihoods and Enterprise (SMILE) ही नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. कोविड-19 या महामारीमुळे ज्या कुटूंबातील प्रमुख व्यक्ती (Breadearner) मृत्यु पावली आहे अशा कुटुंबातील प्रमुख वारसदारास एन.एस.एफ.डी.सी, नवी दिल्ली यांचेमार्फत रु.5 लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे. त्याचा सविस्तर तपशील  1) एन.एस.एफ.डी.सी. कर्ज - रूपये 4.00 लाख व्याज दर 6 टक्के 2) भांडवली अनुदान - रू. 1.00 लाख व्याज दर 6 टक्के असा आहे.

 मयत व्यक्तीची आवश्यक माहिती :
1) मयत व्यक्तीचे नांव, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, जात/पोटजात, मृत्यूची दिनांक, रेशनकार्ड, मयत झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला
2) कुटूंबातील व्यक्तींची एकुण संख्या कुटूंबातील प्रमुख वारसदार, कुटूंबातील व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न (रु. 3.00 लाखाच्या आत)

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झालेल्या कुटूंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी अथवा महामंडळाच्या ई-मेलवर पाठविण्यात यावी. सोबत लिंक - https://forms.gle/Q४८५fSUQYEuL४xUx७  असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, पालघर संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित यांनी कळविले आहे.


कोविड-19 मध्ये अनुसूचित जातीच्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यु झाला आहे अश्यांनीकुटुंबाचे पुर्नवसन करण्यारिता (व्यवसाय कर्ज योजना) 30 जून पर्यंत अर्ज करावे

कोविड-19 मध्ये अनुसूचित जातीच्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यु झाला आहे अश्यांनी
कुटुंबाचे पुर्नवसन करण्यारिता (व्यवसाय कर्ज योजना) 30 जून पर्यंत अर्ज करावे
पालघर (प्रतिनिधी)दि. 29: एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्यामार्फत कोविड-19 या जागतिक महामारीत अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यु झाला आहे. त्या कुटुंबियाचे पुनर्वसन करण्यासाठी and Support for Marginalized Individuals for Livelihoods Enterprie (SMILE) ही व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे. सदर योजनेची माहीती आणि अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहे.
तपशील/प्रकल्प मूल्य - रूपये 1.00 लाख ते 5.00 लाखापर्यंत, एनएसएफडीसी सहभाग- 80%, भांडवल अनुदान- 20%, व्याजदर- 6% परतफेडीचा कालावधी- 6 वर्षे  सदर योजनेसाठी खालीलप्रमाणे पात्रता राहिल.
1) अर्जदार अनुसूचित जातीतील असावा. 2) अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये 3.00 लाख पर्यंत असावे. 3) अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा (कुटुंब प्रमुखाच्या रेशनकार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक) 4) मृत्यु पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी. मृत्यु पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. 5) कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींकरिता पुढील पैकी एक दस्तावेज आवश्यक आहेत. अ) महानगर पालिका/नगरपालिका यांनी दिलेले मृत्यु प्रमाणपत्र आ) स्मशानभूमी प्राधिकरणारे दिलेली पावती इ) एखादया गावात स्मशानभूमी नसल्यास गट विकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यु प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे :
1) मयत व्यक्तीचे नाव पत्ता 2) आधारकार्ड  3) उत्पनाचा दाखला (3.00 लाखा पर्यंत) 4) कोविड- 19 मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्युचा दाखला 5) वयाचा पुरावा 6) रेशन कार्ड.
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे 15 जून 2021 पर्यंत मृत्यु झालेल्या अनुसूचित जातीतील (SC) कुटुंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहीती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवा ह्या लिंकवर https://forms.gle/७mG८CMecLknWGt६K7 दिनांक 30/06/2021 पर्यंत भरण्यात यावी. असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा व्यवस्थापक, पालघर यांनी कळविले आहे.

सीमा पोतदार यांची महिला काँग्रेस सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा पदी निवड

सीमा पोतदार यांची महिला काँग्रेस सोशल मीडिया  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा पदी निवड

पालघर (प्रतिनिधी)पालघर_सीमा पोतदार यांची नुकतीच काँग्रेसच्या सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाली असून संपूर्ण महाष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय असलेल्या सीमा पोतदार ह्या याअगोदर बोईसर विधानसभा अध्यक्ष  , झोनल को ओरडीनेटर विदर्भ रिजन, महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया जनरल सेक्रेटरी, आणि आता त्यांची महाराष्ट्र प्रदेश  महिला काँग्रेस सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाली आहे. महिला काँग्रेस च्या राष्ट्रीय अध्यक्षा सुस्मिता देव यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या  महिला अध्यक्षा संध्या ताई सवालाखे यांच्या सहकार्याने, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  नाना पाटोले यांच्या मार्गदर्शनाने  हे पद सीमा पोतदार यांना देण्यात आलं आहे.पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील रहिवासी असलेल्या सीमा पोतदार यांची महाराष्ट्र प्रदेश  काँग्रेस च्या सोशल मीडिया प्रदेश अध्यक्ष पदी निवड होणं हे गौरवाच असून पालघर जिल्ह्यासह महराष्ट्रात काँग्रेस नक्कीच उभारी घेईल हे मात्र नक्की.

Monday, June 28, 2021

जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लागु नये म्हणून नागरिकांनी कोव्हिड नियमांचे पालन करावे- जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ

जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लागु नये म्हणून नागरिकांनी कोव्हिड नियमांचे पालन करावे
- जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ
पालघर(प्रतिनिधी) दि. 28 : मा. मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेश दिनांक 04/06/2021 नुसार संपूर्ण जिल्ह्याचा कोविड Positivity दर 5 टक्के पेक्षा कमी असल्यास Level 1 व Level 2 मध्ये व Positivity दर 5 ते 10 टक्के असल्यास Level 3 मध्ये समावेश होतो. दि. 25/06/2021 नुसार RTPCR Positivity दराप्रमाणे पालघर जिल्ह्यामध्ये Level 3 निश्चित करण्यात आली आहे.
मात्र दि. 26/06/2021 रोजी 13.8% व दिनांक 27/06/2021 रोजी 12.9% एवढा Positivity दर वाढला आहे. पालघर जिल्ह्यात पालघर ग्रामीण 750, वसई विरार शहर महानगर पालिका 1232 एवढया केसेस आहेत.
नागरिकांनी कोविड नियमांप्रमाणे वर्तणूक करणे आवश्यक आहे. लक्षणे असलेल्या नागरिकांनी त्वरीत कोविड चाचणी करावी. तसेच इतरांना देखील प्रवृत्त करावे. Rapid Antigen Test (RAT) Negative असल्यास RTPCR चाचणी करावी. जेणेकरुन वेळेत उपचार होणे शक्य आहे. घरांमध्ये विलगीकरणात (Home Quarantine) असलेल्यांनी बाहेर फिरु नये. त्यांच्यापासुन त्यांच्या कुटुंबीयांना तसेच इतर लोकांना देखील बाधा होऊ शकते. Positivity दर वाढल्यास जिल्ह्यामध्ये Level 4 चे निर्बंध लावण्यात येतील. एकदा लावलेले निर्बंध 2 आठवडे कमी करता येणार नाहीत. तरी नागरिकांनी या कामी सहकार्य करावे. जेणेकरुन तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास योग्य नियोजन करता येईल. असे आवाहन जिल्हाधिकारी पालघर तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पालघर डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे.
*******

वैतरणा नदीच्या पुला खालून नौकानयनावर बंदी

वैतरणा नदीच्या पुला खालून नौकानयनावर बंदी
पालघर (प्रतिनिधी)दि. 28 :- रेल्वे ब्रिज क्र. 93 च्या कार्यक्षेत्रामध्ये व त्यांच्या पोहोच मार्गामधील रेती उत्खन्न  व नौकानयन मार्ग वाहतूकीसाठी बंद करणे आवश्यक आहे. उपोदघातातील अनुक्रमांक 2 वर अंतर्भूत असलेल्या पत्रान्वये मुख्य ब्रिज अभियंता यांनी पश्चिम रेल्वेवरील सदर ब्रिज बाबतचे महत्व व रेल्वे ब्रिज बाबतचा संभाव्य  धोका उदभवल्यास होणारे परिणाम टाळता येणार आहेत.
महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 20 अन्वये सर्व सार्वजनिक  रस्ते, गल्ल्या आणि मार्ग, पुल, खंदक, धरणे आणि त्यांच्या वरील किंवा त्यांच्या  बाजूंची कुंपणे आणि  पूर्ण भरतीच्या पाण्याच्या खुणेच्या खालील समुद्राचा, बंदराचा व खाडयांचा आणि नद्या, ओहोळ, नाले, सरोवर व तळी आणि सर्व कालवे व पाण्याचे पाट आणि साचलेले सर्व पाणी व वाहते पाणी इत्यादी वर राज्य शासनाचा मालकी हक्क् आहे.
रेल्वे ब्रिज क्र.93 च्या कार्यक्षेत्रातील रोडचा वापर रेती वाहतूक ट्रकसाठी प्रतिबंधित केला आहे. पोलीस अधीक्षक पालघर यांनी वैतरणा नदीवरील रेल्वे ब्रिज व इतर ब्रिजच्या 600 मीटर कार्यक्षेत्रात 24 X 7  पोलीस गस्त् ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूस  600  मीटर ( 2000 फुट )  च्या क्षेत्रात रेती उत्खननास परवानगी  देणेत आलेली नाही.
अपर जिल्हादंडाधिकारी, पालघर डॉ. किरण महाजन यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) व (3) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 30 व 34 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून वैतरणा नदीवरील रेल्वेपुलाच्या (पुल क्र. 93) दोन्ही बाजूस 2 कि.मी. कार्यक्षेत्रात दि. 03 जूलै 2021 रोजी 00.01 वा.पासून ते दि. 30 ऑगस्ट 2021 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीत पेालीस विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, नौदल, मत्स्य व्यवसाय, वन, कोस्ट गार्ड, उत्पादन शुल्क इत्यादी शासकीय विभाग वगळून इतर सर्व व्यक्तींना वैतरणा नदीवरील रेल्वेपुलाच्या (पुल क्र. 93) दोन्ही बाजूस 2 कि.मी. परिसरात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पालघर यांचे पूर्व परवानगी शिवाय कोणत्याही  प्रकारे नौकानयन मार्गाचा वापर करणेस मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

Sunday, June 27, 2021

पालघर जिल्ह्यात कृषि संजीवनी मोहिम ची गारगाव-खानीवड़ी च्या धामटने पाड़ा येथून सुरुवात

*पालघर जिल्ह्यात कृषि संजीवनी मोहिम ची गारगाव-खानीवड़ी च्या धामटने पाड़ा येथून सुरुवात*

पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील कृषि विभाग कडून कृषि संजीवनी मोहिम सोमवारी 21 जून रोजी सुरूवात करण्यात आली। कार्यक्रम पालघर तालुक्यातील धामटनी पाड़ा येथे गारगाव खानीवड़ी ग्रुप ग्राम पंचायत सरपंच सौ. सुजाता संतोष दळवी ह्यांच्या अध्यक्षते खाली झाला। यावेळी शेतकरी आशाद बी शेख मंचावर विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते। 
कार्यक्रमाची सुरुवात कृषि पर्यवेक्षक सुधीर गावड़ ह्यांनी परिचय केला व पुष्पगुच देवून पाहुण्याचे स्वागत केले। मंचावर काशीनाथ तरकसे - जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पालघर, तरुण वैती - तालुका कृषी अधिकारी पालघर, प्रसाद गुंजवटे- मंडळ कृषी अधिकारी पालघर आणि सुधीर गावड - कृषी पर्यवेक्षक, तारापूर उपस्थित होते। 

तालुका कृषी अधिकारी पालघर तरूण वैति ने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सुधारित पद्धतीने भात लागवड, बांधावर तूर लागवड, फलोद्यान लागवड, विकेल ते पिकेल   ची सखोल माहिती दिली। 
             शेतकरी आशाद बी शेख ह्यांनी आपल्या शेतीत शेत तळ आणि त्यातून आर्थिक नफा, पिकेल ते विकेल, कृषि विभाग कडून जी सल्ला व वेळोवेळी मिलालेला मार्गदर्शन चा अनुभव इतर शेतकऱ्यांना सांगताना सांगितले की शासकीय योजनेतून शेत तळ बांधून त्यातून चांगलीच उत्पन्न घेता येते। श्री शेख म्हणाले की शेतकऱ्यांनी शेत तळ योजना च्या लाभ घ्यावा आणि आपली उत्पन्न वाढवावा। 
            जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पालघर श्री काशीनाथ तरकसे ह्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शेतकऱ्यांनी स्वतः बीजप्रक्रिया कशी करावी.  त्यानी बियाणे चा दर्जा कसा स्वत करून घ्यावा, है करुन दाखवले। बांधावर तूर आधुनिक पद्धतीने लागवडीचे शेतकऱ्यांना  मार्गदर्शन केले। शासनाचा विविध योजनांची माहिती दिली.
          शेतकऱ्यांना तूर वाटप प्रगतशील शेतकरी आशाद शेख, सरपंच सौ. सुजाता संतोष दळवी च्या हस्ते वाटप करण्यात आला। 
हया कार्यक्रमात कृप तारापूर सजेतिल  सर्व कृषी सहाय्यक सौ. रेखा पाटील, सौ. प्रतिभा लोंढे, सौ. तनुजा मुकणे, सौ. काजल भाताडे, रक्षित पाटील आणि प्रितम गोवारी उपस्थित होत्या।

नाशिक इगतपुरीत सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह नाशिक ग्रामीण पोलिसांचा छापा.

नाशिक इगतपुरीत सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह नाशिक ग्रामीण पोलिसांचा छापा.

नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

इगतपुरीत सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर इगतपुरीतील स्काय ताज व्हीलामध्ये रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक सचिन पाटील आणि नाशिक ग्रामीण पोलिस यांच्या टीमने छापा टाकला. छाप्यात सिनेसृष्टीतील कलाकारांना अटक केल्याने पुन्हा सिनेसृष्टी वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.
 पोलिसांनी बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या हिना पांचाल हिच्यासह एक विदेशी महिला, मराठी आणि दक्षिणात्य चित्रपट क्षेत्रात काम करणार्‍या पाच अभिनेत्री, २ कोरियोग्राफर महिलांसह २२ जणांना बिभत्स अवस्थेत ताब्यात घेतले. पोलिसांनी कॅमेरा, ट्रायपॉड, कोकेन ड्रग्ज, हुक्कासह अमली पदार्थ व रोकड जप्त केली.
अशी आहेत ताब्यात घेतलेल्यांची नावे,संशयित पियुष शेट्टीया, आरव शर्मा, विशाल मेहता, रोहित अरोरा, अकीब खान, वरुण बाफणा, करिश्मा, चांदणी भटिजा, श्रुती शेट्टी, रुचिरा नार्वेकर, विदेशी महिला अझार फारनुद, शनैया कौर, हिना पांचाल, अषिता, शिना, प्रिती चौधरी, कौशिकी अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पियुष शहाच्या वाढदिवासाची पार्टी देण्यासाठी शुक्रवारी (दि.२५) सकाळी विभा दिनेशभाई गोंडलिया या अरव, रुचिरा नार्वेकर आणि आकीब खान यांच्यासमवेत इगतपुरीतील स्काय ताज व्हीलामध्ये थांबले. या ठिकाणी शुक्रवारी रात्री १२ वाजता पियुषचा वाढदिवसाचा केक कापण्यात आला. दुसर्‍या दिवशी शनिवारी रात्री ८ वाजेनंतर रेव्ह पार्टीला सुरुवात झाली. तरुण व तरुणी मद्यधुंद व नशेत नाचगाणी, धिंगाणा करत हुक्का, चरस, गांजा व ड्रग्जची पावडरसह मादक पदार्थांचे सेवन करत होते. मध्यरात्री २ वाजता पोलिसांनी छापा टाकला.
रेव्ह पार्टीमुळे मोठे ड्रग्ज रॅकेट समोर येणार आहे. पार्टीसाठी अमली पदार्थ कोठून आणण्यात आले. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. मुंबईमधून पोलिसांनी नायजेरियन नागरिकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यास इगतपुरीत आणले आहे अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

Saturday, June 26, 2021

महावितरणच्या पालघर मंडलातील संपर्क क्रमांक बदलले

महावितरणच्या पालघर मंडलातील संपर्क क्रमांक बदलले

पालघर: २७ जून २०२१

महावितरणच्या पालघर मंडलांतर्गत बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक बदलले आहेत. संवाद सुलभ व्हावा यासाठी संपर्क क्रमांक बदलण्यात आले असून वीज ग्राहकांनी या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

अधिकाऱ्याचे कार्यालय, पद व नवीन संपर्क क्रमांक अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत. पालघर मंडलाचे अधीक्षक अभियंता– 9028154141, कार्यकारी अभियंता (प्रशासन)– 9028154130, व्यवस्थापक (विवले)– 9028154138, व्यवस्थापक (मासं)– 9028154129, उपकार्यकारी अभियंता– 9028154132, उपकार्यकारी अभियंता– 9028154133, पालघर विभाग कार्यकारी अभियंता (वितरण)– 9028154266, अतिरिक्त कार्यकारी अभियंता– 9028154263, उपकार्यकारी अभियंता– 9028154264, पालघर उपविभाग उपकार्यकारी अभियंता– 9028154320, बोईसर उपविभाग- उपकार्यकारी अभियंता– 9028154230, बोईसर ग्रामीण उपविभाग उपकार्यकारी अभियंता– 9028154500, विक्रमगड उपविभाग उपकार्यकारी अभियंता– 9028154602, सफ़ाळा उपविभाग उपकार्यकारी अभियंता– 9028154280, डहाणू उपविभाग उपकार्यकारी अभियंता– 9028154142, तलासरी उपविभाग उपकार्यकारी अभियंता– 9028154200, जव्हार उपविभाग उपकार्यकारी अभियंता– 9028154568, मोखाडा उपविभाग उपकार्यकारी अभियंता– 9028154589, पालघर विभाग उपव्यवस्थापक (विवले)– 9028154272, पालघर विभाग – उपव्यवस्थापक (विवले) – 9028154273, पालघर विभाग डी.एस.एस. नियंत्रण कक्ष-  9028154278.

--

वीजबिल वसुलीला गती द्या; अन्यथा कारवाईमहावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण

वीजबिल वसुलीला गती द्या; अन्यथा कारवाई

महावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण


कल्याण: २५ जून २०२१(प्रतिनिधी)

महावितरणची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन चालू व थकीत वीजबिल वसुलीला गती द्या. येत्या ३० जूनपर्यंत वीजबिल वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करा. वसुलीच्या कामात कमी पडणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण यांनी कल्याण परिमंडलातील अधिकाऱ्यांना दिला.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या निर्देशानुसार कल्याण परिमंडलातील चालू व थकीत वीजबिलाच्या वसुलीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंते सुनील काकडे, सिद्धार्थ तावाडे, राजेशसिंग चव्हाण, किरण नागावकर, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा यावेळी उपस्थित होते. जून महिन्यातील चालू वीजबिल आणि थकबाकी असे एकूण ११२० कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट कल्याण परिमंडलाला देण्यात आले होते. मात्र जून महिना संपण्यास पाच दिवस शिल्लक असताना ४७४ कोटी रुपये वसूल होणे बाकी आहेत. जून अखेरपर्यंत वसुलीचे निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्याचे निर्देश संचालक (वाणिज्य) चव्हाण यांनी दिले.

कल्याण परिमंडलात कल्याण एक व दोन, वसई, पालघर मंडळातील सर्व वर्गवारीतील १४ लाख ४८ हजार ग्राहकांकडे चालू व थकीत वीजबिलाचे ७३९ रुपये थकीत आहेत. यात नोव्हेंबर- २०२० पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या ५५ हजार ४७० ग्राहकांकडे ३४ कोटी रुपये थकीत आहेत. तर पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचे थकीत वीजबिल १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून प्राधान्याने भरण्याबाबत शासनाने नुकतेच परिपत्रक काढले आहे. संबंधित ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा करून पथदिव्यांची १२७ कोटी व पाणीपुरवठा योजनांची ४ कोटी ८१ लाखांची थकबाकी वसूल करण्याचे निर्देश संचालक (वाणिज्य) चव्हाण यांनी दिले.

कल्याण एक आणि दोन, वसई मंडलातील सर्व कार्यकारी, अतिरिक्त व उपकार्यकरी अभियंते या बैठकीला उपस्थित होते. तर पालघर मंडलातल अभियंते व्हीसीच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले

घोटी भंडारदरा रस्त्याची झाली चाळण

घोटी भंडारदरा रस्त्याची झाली चाळण

 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे. 

इगतपुरी तालुक्यातील नगर व नाशिक जिल्ह्यांना जोडणार्‍या घोटी-भंडारदरा या राज्य मार्गाची खेड गटातील पिंपळगाव मोर ते वासाळी फाट्यापर्यंत गेल्या चार ते पाच वर्षांपासून दूरवस्था झाली आहे. खेड-टाकेद गटातील हा महत्त्वाचा मार्ग असून येथील परिसरातील नागरिकांना, रुग्णांना, विद्यार्थ्यांना, व्यापार्‍यांना व शेतकर्‍यांना नेहमी इगतपुरी, घोटी, नाशिकला जाण्यासाठी ये-जा करावी लागते.
या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही. परिसरातील रुग्णांना, गरोदर महिलांना महत्त्वाच्या उपचारासाठी घोटी किंवा नाशिक या ठिकाणी जावे लागते. मात्र प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते.
खेडपासून घोटीला पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिकेला अर्धा तास अपेक्षित आहे, मात्र सध्या रस्त्याच्या दूरवस्थेमुळे रुग्णवाहिकेलाही उशीर लागत असल्याने रुग्णांच्या जीवाशीही खेळ होत आहे. तर या रस्त्यावर अपघातांचे देखील प्रमाण वाढले आहे. बाहेरून येणार्‍या पर्यटकांकडून परत या रस्त्याने प्रवास नको असे बोलले जात आहे.
गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी या मार्गाच्या नूतनीकरणासाठी आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून ९८ कोटींचा निधी मंजूर झाला असून, या वर्षीच्या पहिल्याच महिन्यात काम सुरू होईल, अशी चर्चा लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाकडून रंगवण्यात आली होती. मात्र अजूनही रस्त्याचे काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असून रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.

मराठा समाजाचे राजकीय आरक्षण घालवणाऱ्या आघाडी सरकारच्या नाकर्त्या कारभाराविरोधात भाजपा तर्फे राज्यात एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन.

मराठा समाजाचे राजकीय आरक्षण घालवणाऱ्या आघाडी सरकारच्या नाकर्त्या कारभाराविरोधात भाजपा तर्फे राज्यात एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन.

नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

नाशिक आमदार देवयानी फरांदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नाशिक येथे तर 
राज्यात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुणे येथे कात्रज बायपासजवळ ठिय्या आंदोलन केले, तर मुंबईत मुलुंड चेक नाक्यावर आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारने ठोस पाऊल न उचलल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गमाविण्याची वेळ आली. फडणवीस सरकारने तातडीने हालचाली केल्यामुळेच त्यावेळी हे आरक्षण वाचले. मात्र त्यानंतर आघाडी सरकारने आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही वेळेत पूर्ण केली नाही. आघाडी सरकारमधील मंत्री आरक्षणाच्या मुद्द्याचा निकाल लागेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही असे सांगितले.
तर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षण गेलं. राज्य सरकार आपल्या अपयशाचं खापर मोदींवर फोडते आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊन दोन महिने लोटले तरी सरकारने ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी काही हालचाली नाही.
मराठा समाजाचे राजकीय आरक्षण घालवणाऱ्या आघाडी सरकारच्या नाकर्त्या कारभारा विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत मराठा राजकीय आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेऊ नयेत अशी मागणीही या आंदोलनातून करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यातही वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन झाले.या आंदोलनात पक्षाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. नाशिक शहरात भाजपतर्फे मुंबई - आग्रा महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले.

मोखाडा तालुका शासकीय अधिकारी यांच्याशी विचार विनिमय !मा. राजेंद्र गावीत -- खासदार

मोखाडा तालुका शासकीय अधिकारी यांच्याशी विचार विनिमय !

मा. राजेंद्र गावीत -- खासदार 

पालघर ( हिरालाल लोखंडे )
जनतेच्या समस्या निवारणासाठी खोडावे तालुका मोखाडा येथे दिनांक २६ जून २०२१ रोजी मा. राजेंद्र गावीत साहेब खासदार पालघर यांनी शासकीय योजनांची खाते निहाय माहिती घेऊन ,सर्व सामान्य नागरिकांना होणार्‍या समस्या बाबत, शासकीय प्रभारी अधिकारी वर्गासोबत, सर्वसामान्य नागरिकांच्या मुलभूत गरजा व सरकारी योजना जास्तीत जास्त लोकांना कश्या रितीने मिळतील ( त्यांच्या पर्यंत पोहोचतील ) या बद्दल चर्चा केली. 
   अनियमित पणे होणारा विज पुरवठा, कृषी बी बियाणे तसेच खत पुरवठा, रस्त्यांची परीस्थिती, कोव्हिड १९ साथी रोगा विषयी लसीकरण, जन - जागृती व संभाव्य ३ -या स्टेज मुळे येणारा प्रादुर्भाव यावर उपाययोजना.या बद्दल खात्यांच्या प्रभारी प्रमुख अधिकारी वर्गाशी विचारविनिमय, करून त्यावर त्वरित अंमलबजावणी करणे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या २२ केव्ही विद्युत प्रकल्पाची पाहणी करून, या ठिकाणी उप अभियंता व लाईन मेन देण्यासाठी आश्वासन दिले. 
  या प्रसंगी श्री वैभव पवार तहसिलदार मोखाडा, श्रीमती संगीता भांगरे गट विकास अधिकारी, श्री सतिश गवई सहा पो, निरीक्षक श्री प्रकाश निकम जि. प. सदस्य, श्री प्रल्हाद कदम विक्रमगड विधानसभा संघटक, श्री प्रदीप वाघ पं स  सदस्य,  भास्कर थेतले, आशा झुगरे, प्रभाकर पाटील - सरपंच, रघुनाथशेठ पवार, मिलींद झोले, प्रतिष्ठीत मान्यवर आदी कार्यक्रमाला उपस्थित होते

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन


*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन*
*_सामाजिक न्याय दिनाच्या दिल्या शुभेच्छा_*

मुंबई, (प्रतिनिधी)दि. २६:- सामाजिक न्यायाचे अग्रदूत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. तसेच राजर्षी शाहूंच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
मुख्यमंत्री अभिवादनात  म्हणतात,लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समताधिष्ठित समाज व्यवस्थेचा आग्रह धरला. अनेक अनिष्ट चालीरीती-प्रथांना पायबंद घातला. शिक्षण, आरोग्य अशा सामान्यांच्या जीवनाशी निगडित क्षेत्रात दूरगामी अशी धोरणे राबविली. त्यांनी कृषी, सहकार, उद्योग या क्षेत्रांच्या विकासासाठी दूरदृष्टीने प्रकल्प, योजना राबविल्या. त्याद्वारेही सामाजिक अभिसरण होईल असे नियोजन केले. त्यांच्या या द्रष्ट्यापणाची फळे आज आपण चाखतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य सत्यात उतरवण्यासाठी राजर्षी शाहूंनी परिश्रमपूर्वक प्रयत्न केले. ते सामाजिक न्यायाचे अग्रदूत आहेत. त्यांच्या या कार्याला कोटी कोटी प्रणाम. सर्वांना सामाजिक न्याय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

Friday, June 25, 2021

ठाण्यात सोमवारपासुन तीन स्तरावरील निर्बंध लागूजिल्यात सायंकाळी ४ वाजता शटर डाऊन

 
ठाण्यात सोमवारपासुन तीन स्तरावरील निर्बंध लागू
जिल्यात सायंकाळी ४ वाजता शटर डाऊन

ठाणे,ता 25 प्रतिनिधी :- 

       ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने ठिकठिकाणी लागू केलेले निर्बंध आता पुन्हा बदलले असून संपूर्ण राज्यात निर्बंधाचा एकच स्तर म्हणजे तिसरा स्तर लागू करण्यात आला आहे.कोरोनाच्या डेल्टा प्लस या नवीन प्रकारामुळे सर्व राज्यभर स्तर ३ चे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.हे आदेश २८ जूनपासून ५ जुलैपर्यंत लागू राहतील.   ठाणे शहरामध्ये म्हणजे महापालिका क्षेत्रांतर्गत निर्बंधाचा स्तर हा दोन होता. यामुळे सर्व व्यवहार खुले झाले होते.मात्र जिल्हाधिका-यांनी शुक्रवारी काढलेल्या आदेशामध्ये आता राज्यात सर्वत्र एकच स्तर म्हणजे तिस-या स्तराचे निर्बंध लागू असल्याने ठाण्यात सर्व व्यवहार  सायं.५ वाजेपर्यंतच सुरू राहतील तर दुकाने सायं. ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील.त्यामुळे संध्याकाळी ५ नंतर बाहेर फिरण्यावर बंधने आली असून बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.मॉल, चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद असतील.उपहारगृहे पूर्वीप्रमाणे मात्र क्षमतेच्या ५० टक्के सायं.४ वाजेपर्यंतच खुली ठेवता येतील.सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत सकाळी फिरता येईल. मैदाने खुली राहतील, सायकलिंग करता येईल. 
    खाजगी कार्यालयंही ५० टक्के क्षमतेसह ४ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. सरकारी कार्यालयंही ५० टक्के क्षमतेसह ४ वाजेपर्यंत खुली राहतील. लग्न समारंभ आयोजित करताना हॉलच्या क्षमतेनुसार ५० टक्के क्षमता वापरता येईल. असे ४ जून रोजी काढलेले स्तर ३ चे निर्बंध सर्वत्र लागू राहणार आहेत. त्यामुळे आता ठाणे शहरातही जिल्ह्याप्रमाणेच निर्बंध लागू राहणार असून पूर्वी ठाणे महापालिका क्षेत्रांतर्गत स्तर २ मुळे खुले झाले होते मात्र आता स्तर ३ मुळे निर्बंध आले आहेत.

लेव्हल 3 चे नियम

१. सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने सायं.४.०० वा. पर्यंत सुरू राहतील. 
२. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार सायं.४.०० वा. पर्यंत सुरू राहतील.
३. मॉल्स/सिनेमागृहे (मल्टिप्लेक्ससह एकल स्क्रिन)/नाटयगृहे इत्यादी बंद राहतील. 
४. रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार ५०% बैठक क्षमतेने सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू राहतील. मात्र, सायं.४.०० वा.नंतर व शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे/पार्सल सर्व्हिस आणि होम डिलेव्हरी सेवा सुरू राहील. 
५. उपनगरीय लोकल वाहतूकीबाबत बृहन्ममुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील..
६. सार्वजनिक ठिकाणे/खुली मैदाने/चालणे/ सायकलिंग दररोज सकाळी ५.०० वा.पासून सकाळी ९.०० वा.पर्यंत सुरू राहतील. 
७. खाजगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सायं. ४.०० वाजेपर्यंत (सुट देण्यात आलेली कार्यालये वगळून) सुरू राहतील. 
८. कार्यालयीन उपस्थिती- शासकीय कार्यालयांसह (खाजगी- जर परवानगी असेल) ५०% क्षमतेने सुरू राहतील. 
९. क्रिडा- सकाळी ५.०० वा.पासून सकाळी ९.०० वा./ सायं.६.०० वा. पासून सायं.९.०० पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील. 
१०. चित्रीकरण Bubble च्या आतमध्ये सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू ठेवता येईल व सायं.५.०० नंतर कोणासही हालचाल करता येणार नाही. 
११ . सामाजिक मेळावे / सांस्कृतिक / करमणूक ५०% बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार सायं. ४.०० वा पर्यंत.सुरू राहतील. 
१२. लग्न समारंभ फक्त ५० लोकांच्या मर्यादेतच करता येतील. 
१३. अंत्यसंस्कार विधी फक्त २० लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल.
१४. बैठका/स्थानिक संस्थांच्या/ सहकारी संस्थांच्या निवडणूका हॉलच्या/सभागृहाच्या ५०% बैठक क्षमतेने घेणेस परवानगी राहील. 
१५. बांधकामाकरीता केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा सायं.४.०० वा.पर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी असेल. 
१६. कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सूरु राहतील. 
१७. ई-कॉमर्स- साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील.
१८. जमावबंदी सांय. ५.०० वा. पर्यंत व संचारबंदी सायं ५.०० वा. नंतर लागू राहील. 
१९. व्यायामशाळा/केश कर्तनालय/ ब्युटी सेंटर्स/ स्पा/ वेलनेस सेंटर्स सायं. ४.०० पर्यंत ५०% क्षमतेने सुरु राहतील. परंतू, गि-हाईकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता येणार नाही. 
२०. सार्वजनिक परिवहन सेवा १००% बैठक क्षमतेने सुरू राहतील. परंतू, प्रवाश्यांना उभे राहून प्रवास करता येणार नाही. 
२१ . मालवाहतूक जास्तीत जास्त ३ व्यक्तींसह (वाहन चालक/ हेल्पर/ स्वच्छक किंवा इतर असे ३ ) लागू   असलेल्या सर्व नियमांसह नियमितपणे सुरू राहील.
२२. खासगी कार / टॅक्सी / बस लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवासासाठी (आंतर जिल्हा प्रवासासाठी स्तर ५ मधील कोणत्याही भागाकडे जात असल्यास किंवा त्यामधून जात असल्यास, प्रवाशाकडे ई-पास असणे बंधनकारक राहील) नियमितपणे परवानगी राहील. 
२३. उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे युनिट नियमितपणे सुरू राहतील. 
२४. उत्पादनाच्या अनुषंगाने :
१. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिट (आवश्यक वस्तू आणि कच्चे माल / पॅकेजिंगचे उत्पादन ___ करणारे घटक म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तू व आवश्यक असलेल्या पुरवठाच्या साखळीसह)
२. सर्व सतत प्रक्रिया सुरू असणारे उद्योग (ज्या युनिट्ससाठी अशा प्रकारच्या प्रक्रियेची आवश्यकता असते, ज्या अशा प्रकारच्या स्वरूपाच्या असतात ज्यांना त्वरित थांबवता येत नाही आणि पुरेश्या वेळेशिवाय ते पुन्हा सुरू होऊ शकत नाही) 
३. राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन
४. अत्यावश्यक, गंभीर स्वरुपाच्या पायाभूत सेवा सुविधा देणारे डेटा सेंटर / क्लाऊड सेवा देणारे प्रदाता /आयटी सेवा नियमित सुरू राहतील.

अंतराळात उपग्रह सोडणाऱ्या गरीब घरातील अंजुचा शिवसेनेने केला सत्कार,आर्थिक मदतही केलीशिक्षणासाठी व तिला लागणाऱ्या उपक्रमांसाठी शिवसेना मदत करणार

अंतराळात उपग्रह सोडणाऱ्या गरीब घरातील अंजुचा शिवसेनेने केला सत्कार,
आर्थिक मदतही केली
शिक्षणासाठी व तिला लागणाऱ्या उपक्रमांसाठी शिवसेना मदत करणार 


 डहाणू (प्रतिनिधी)डहाणू तालुक्‍यातील आंबिवली येथील घरची हलाखीची परिस्थिती असलेल्या अंजू कमलाकर भोईर या विद्यार्थिनीने स्वतःच्या हाताने उपग्रह बनवून तो अंतराळात सोडल्यामुळे संपूर्ण भारतात तिचे कौतुक होत आहे. शिवसेनेनेही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करून तिच्या पाठीवर मायेचा हात फिरवला.यावेळी तिला आर्थिक मदतही केली. भविष्यात तिच्या शिक्षणासाठी व तिला लागणाऱ्या उपक्रमांसाठी आर्थिक मदत करणार असल्याचे ठोस आश्वासन विधानसभा क्षेत्र प्रमुख वैभव संखे यांनी तिच्या कुटुंबाला दिल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी वैभव संखे व शिवसेनेचे आभार मानले आहेत. शिवसेना नेहमीच अशा सर्वांच्या पाठीशी असते. त्याचबरोबरीने मंजूच्या पाठीशीही तुम्ही सर्व ठामपणे उभे असल्यामुळे आमचा विश्वास आणखीन खंबीर झाली असल्याची प्रतिक्रिया तिचे वडील कमळाकर भोईर यांनी दिली आहे. वैभव संखे यांच्यासह जिल्हा परिषदेचे गटनेते जयेंद्र दुबळा, तालुका प्रमुख अशोक भोईर, युवासेना जिल्हा समन्वयक  हेमंत धर्मामेहेर, कल्पेश पिंपळे यांनी मंजू हीच्या घरी जाऊन पालघर जिल्ह्यातर्फे तिचा जाहीर सत्कार केला व शिवसेना तिच्या पाठीशी खंबीर असल्याचा शब्दही दिला. मंजुला दिलेले प्रोत्साहन पाहून ती भारावून गेली व शिवसेनेच्या या सत्कारालाबद्दल तिने सर्वांचे आभारही मानले.
 ७ फेब्रुवारी रोजी रामेश्वरम  येथून लहान लहान १०० उपग्रह अंतराळात सोडून एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. यात देशभरातून १०००विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामुळे भारतामध्ये एक हजार विद्यार्थ्यांनी अंतराळात पाठवलेल्या उपग्रहामध्ये अंजु या विद्यार्थिनीचा ही समावेश आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन व असिस्ट रेकॉर्ड्स अशा पाच जागतिक रेकॉर्ड मध्ये या उपक्रमाची नोंद केली गेली आहे.

Thursday, June 24, 2021

अवैधरीत्या रेती उत्खनन व वाहतूक करणारे, महसुली व पोलीसांच्या रडारवर !

अवैधरीत्या रेती उत्खनन व वाहतूक करणारे, महसुली व पोलीसांच्या रडारवर !
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) केळवा सागरी पोलीस ठाणे ता,जि पालघर यांच्या हद्दीतील वैतरणा रेल्वे ब्रिज ( पश्चिम रेल्वे ) क्रमांक ९२ व ९३ च्या परीसरात मा. जिल्हाधिकारी पालघर यांचे रेती उत्खनन व नौका वाहतुकीसाठी मनाई आदेश असताना, स्वतःच्या फायद्यासाठी कोणतीही परवानगी नसताना, चोरट्या रितीने, अवैधरीत्या रेती वाहतूक व उत्खनन होत असल्याने वैतरणा ब्रिज व वाढीव - वैतीपाडा या गावांच्या किनारी मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असताना, मार्गदर्शक सूचना व आदेश प्रमाणे श्री सुनिल शिंदे तहसिलदार तथा दंडाधिकारी सो. पालघर श्री भीमसेन गायकवाड साहेब सहा, पो, निरीक्षक साहेब प्रभारी अधिकारी केळवा सागरी पोलीस ठाणे, श्री कांबळे पालघर जिल्हा खनिकर्म अधिकारी, मार्गदर्शन करीत, पोलीस कर्मचारी व महसूल विभागाचे अधिकरी - कर्मचारी, पोलीस मित्र यांनी सयुंक्त पणे दिनांक २३ जून २०२१ रोजी वेगवेगळ्या ठिकाणी स्व:ताच्या फायद्यासाठी रेती उत्खनन न वाहतूक करणार्‍या वर कारवाई करून गुन्हे दाखल केले.       १) सुरेश काशिनाथ राऊत रा. वाढीव पो. नवघर,पो,नवघर ता,जि पालघर व त्याचे ३ ते ४ साथीदार.२) गुरू अनंत पाटील रा. वाढीव ता,जि पालघर. व त्याचे २ ते ३ साथीदार. ३) विनायक काशिनाथ पाटील रा, वाढीव ता,जि पालघर त्याचे ४ ते ५ साथीदार सदर व्यक्ती रेतीच्या भरलेल्या बोटी घेऊन जात असताना, थांबण्याचे सांगितले असता, किनार्‍यावर वेगवेगळ्या ठिकाणी बोटी ठेऊन, किनार्‍या लगतच्या झाडी झुडपात पळुन गेले. मा. तहसिलदार साहेब पालघर यांच्या समवेत सोनावे - दारशेत पाडा भागात एक सेक्शन पंप, दोन रेती भरलेल्या फायबर बोटी, असा एकूण सदरच्या तीनही बोटी मध्ये अंदाजे एकूण २०,४८,१७४ /- रूपये किंमतीचा मुद्देमाल आरोपी यांच्या ताब्यात मिळून आला असून तो मा.  तहसिलदार साहेब यांच्या समक्ष जागीच  सर्वासमोर विल्हेवाट लावण्यात आली. या बद्दल केळवा सागरी पोलीस ठाणे, तसेच सफाळे पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे 
सागरी पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे दिनांक २३ जुन २०२१ रोजी गुन्हा रजि,न ३१/ २०२१ , गुन्हा रजि,न ३२/२०२१, गुन्हा,रजि,नं ३३/ २०२१ ,भा, द, वि,सं,कलम ३७१ ,१८८, ३४, सह, जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ ( ७ ),पर्यावरण अधिनियम १९८६ चे कलम १५  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
        दिनांक २६ जुन २०२१ च्या संयुक्त कारवाई दरम्यान दहिवले ता,जि पालघर येथे वैतरणा नदीच्या किनारी रेती उत्खनन करण्यासाठी वापरण्यात आलेला १) सेक्शन पंप (जु .वा. कि. सु.)  अंदाजे किंमत १२,००,०००/- रूपये २) रेती वाहतुकी करीता आलेली बोट ( जु. वा. कि. सु.)  अंदाजे किंमत १,५०,०००/- रूपये ३) बोटी मधील रेतीची अंदाजे किंमत १९,७५२/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. ( सदर मुद्देमाल कारवाई करताना मा, तहसिलदार साहेब व महसुल अधिकारी यांनी वैतरणा नदीच्या पाण्यात बुडवून नष्ट केला आहे.)  
   या बद्दल श्री किरणा जोगदंड तलाठी, तलाठी सजा पारगांव ता,जि पालघर यांनी आरोपी मनोज घाटाळ , बोट मालक अज्ञात तसेच एक मजुर अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केली असून ,सफाळे पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे गुन्हा, रजि,न ३८/२०२१, भा, द,वि,कलम ३७९, ३४, सह, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सहिता १९६६ मधील कलम ४८, ( ७ ) ४८, ( ८ ) पर्यावरण अधिनियम १९८० चे कलम १५,१९ प्रमाणे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ अधिकारी पालघर, प्रभारी अधिकारी सफाळे पोलीस ठाणे, श्री संदिप कहाळे सहा, पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार श्री ए. व्ही. खोत पुढिल तपास करीत आहे 

 दिनांक २३ जुन २०२१ रोजीच्या पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्तपणे वैतरणा नदीच्या किनारी केलेल्या कारवाईत आरोपी संकेत दिपक राऊत रा. वाढीव ता,जि पालघर व अज्ञात मजुर यांच्या  कडील रेती वाहतुकी करीता वापरण्यात आलेली बोट ( जु.वा.कि. सु.) अंदाजे किंमत१,५०,०००/- बोटी मधील २ ब्रास रेती अंदाजे किंमत १९,७५८ /-रूपये असा एकूण १,६९,७५८ /-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. ( सदर मुद्देमाल मा. तहसिलदार साहेब व महसूल अधिकारी यांनी वैतरणा नदिच्या पाण्यात बुडवून नष्ट केला आहे )
    या बद्दल श्री किरण जोगदंड तलाठी तलाठी सजा पारगांव ता,जि पालघर ,यांनी आरोपी संकेत दीपक राऊत व अज्ञात मजूर यांच्या विरोधात सफाळे पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे गुन्हे. रजि,न ३९/२०२१ भा,द,वि,सं,कलम ३७९,३४,सह  महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८ ( ७ ) ,४८ ( ८ ) पर्यावरण अधिनियम १९८० चे कलम १५,१९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी पालघर प्रभारी पोलीस अधिकारी सफाळे पोलीस ठाणे श्री संदीप कहाळे सहा. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार श्री एल. एन. धोंगडे पुढील तपास करीत आहे.

Wednesday, June 23, 2021

पालघर जिल्ह्याकरिता मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणाचे सत्र दि. १ जुलै २०२१ पासून सुरु

पालघर जिल्ह्याकरिता मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणाचे सत्र दि. १ जुलै २०२१ पासून सुरु

पालघर(प्रतिनिधी) दि. २३ : वसई मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रातून पालघर जिल्ह्याकरिता मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणाचे सत्र दि. १ जुलै २०२१ पासून सुरु होणार आहे. सदर प्रशिक्षण हे सहा महिने मुदतीचे असून त्यात मत्स्यव्यवसाय नौकानयनाची मूलतत्त्वे, सागरी डीझेल इंजिनाची निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्यक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते. सदर प्रशिक्षणा करिता दरमहा दारिद्रय रेषेवरील प्रशिक्षणार्थी यांचेकडून रु. ४५०/- व दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थी कडून रु. १००/- शुल्क आकारले जाते.
सदर प्रशिक्षणाकरिता उमेदवार किमान ४ थी पास व १८ ते ३५ वयोगटातील असावा. इच्छुक उमेदवाराने अर्ज विहित नमुन्यात मच्छिमार संस्थेचे शिफारसपत्र, शाळा सोडल्याचा दाखला व एक फोटोसहीत दि. ३०.०६.२०२१ पर्यंत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वसई येथे वसई मच्छिमार सर्वोदय सहकारी संस्था इमारत पाचूबंदर वसई येथे पाठवावेत. अधिक माहिती करिता अजिंक्य पाटील, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी वसई मो. नं. ९८९२१०३२३५ व श्रीकांत इंगळे ९४२०१८६८७० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी वसई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Tuesday, June 22, 2021

कृषि संजीवनी मोहीम 1 जुलै 2021 पर्यंत साजरी करण्यात येणार

कृषि संजीवनी मोहीम 1 जुलै 2021 पर्यंत साजरी करण्यात येणार

पालघर (प्रतिनिधी)दि. 22 :- कृषि तंत्रज्ञानामधील छोटीशी सुधारणा देखील पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करु शकते. खरीप हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यातील कृषि विभागाचे अधिकारी/कर्मचारी, कृषि विभाग- जिल्हा परिषद, कृषि विद्यापीठे/कृषि विज्ञान केंद्रे यांचे शास्त्रज्ञ, कृषिमित्र यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.
दि. 21 जुन 2021 ते 01 जुलै 2021 या कालावधीत प्रत्येक दिवशी महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन 'कृषि संजीवनी मोहीम' साजरी करण्यात येणार आहे. 

1) दि. 21 जून 2021- भात रोपवाटिका कीड रोग मार्गदर्शन करणे
2) दि. 22 जून 2021 - बीजप्रक्रिया
3) दि. 23 जून 2021 -  जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर
4) दि. 24 जून 2021 -  सुधारित भात लागवड तंत्रज्ञान 
5) दि. 25 जून 2021 - विकेल ते पिकेल
6) दि. 28 जून 2021 - महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार
7) दि. 29 जून 2021 - तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतक-यांचा सहभाग
8) दि. 30 जून 2021 -जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना
9) दि. 01 जुलै 2021 - कृषी दिन आणि मोहिमेचा समारोप कार्यक्रम 

या मोहिमा कालावधीमध्ये संबंधित विषयाबाबत राज्यभर प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे.  गावोगावी शेतीशाळा, चर्चासत्र, वेबिनार, प्रात्यक्षिके, सभा प्रशिक्षण, शिवारफेरी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचे सुध्दा मार्गदर्शन या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी कृषि संजीवनी मोहीमेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधुंना करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषि सहायक तसेच नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी  संपर्क साधावा.

Monday, June 21, 2021

सहकारी संस्थेने लेखापरिक्षण 31 जुलै पर्यंत पुर्ण करावे

*सहकारी संस्थेने लेखापरिक्षण 31 जुलै पर्यंत पुर्ण करावे*

ठाणे दि.21 (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81(1)(अ) नुसार प्रत्येक सहकारी संस्थेने प्रत्येक वर्षांचे वैधानिक लेखापरिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नियुक्त केलेल्या सहकार विभागाच्या नामतालीकेवरील लेखापरिक्षकांकडून अथवा निर्बंधकाने नियुक्त केलेल्या लेखापरिक्षकांकडून दि. 31 जुलै पर्यंत पुर्ण करुन घेणे आवश्यक आहे. 
ज्या सहकारी संस्था, सन 2020-21 चे वैधानिक लेखापरिक्षण दि. 31.07.2021 पुर्वी पुर्ण करुन घेण्यास असमर्थता दर्शवतील अथवा टाळाटाळ करतील किंवा संबंधित लेखापरिक्षकांस विहीत मुदतीत लेखापरिक्षणासाठी दप्तर उपलब्ध करुन देण्यास कुचराई करतील अशा सर्व सहकारी संस्थांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मधील तरतुदीनुसार संस्था नोंदणी रद्द करणे, संचालक मंडळ बरखास्त करणे, संबंधित अधिकारी/पदाधिकारी पदावर राहण्यास अपात्र ठरणे तसेच संबंधितांवर उचित कायदेशिर शिक्षा व आर्थिक स्वरुपाचा दंड ई. स्वरुपाची निबंधकांकडून कारवाई करण्यात येईल.
सर्व वैधानिक लेखापरिक्षकांनी यांनी (सनदी लेखापाल/फर्म/प्रमाणित लेखापरिक्षक) त्यांची नियुक्ती झालेल्या संस्थेचे सन 2020-21 चे लेखापरिक्षण विहीत मुदतीत दि. 31.07.2021 पुर्वी पुर्ण करण्यात टाळाटाळ अथवा कुचराई केल्यास तसेच सबळ कारणाशिवाय विहित मुदतीत पुर्ण न केल्यास संबंधित लेखापरिक्षक सहकार कायदा व नियमामधील तरतुदीनुसार उचित कारवाईस पात्र राहतील. ही बाब संबंधित लेखापरिक्षकांनी गांभिर्याने घेणे आवश्यक आहे. अन्यथा अशा वैधानिक लेखापरिक्षकांचे नाव सहकार खात्याचे लेखापरिक्षक नामतालीकेवरुन कमी करणे बाबत कारवाई करण्यात येईल. असे जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-1, सहकारी संस्था, ठाणे यांनी कळविले आहे

आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त कोव्हीड सेंटर, प्रा.आ.केंद्र येथे योग सत्रांचे आयोजन


*आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त कोव्हीड सेंटर, प्रा.आ.केंद्र येथे योग  सत्रांचे आयोजन*

पालघर (प्रतिनिधी) आधुनिक जीवन शैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे आजच्या काळात  आणि  अभाव यामुळे आजच्या काळात अनेक असंसर्गजन्य आजार बळावलेले आढळून येतात. शारिरीक आजारासोबत  मानसिक आजारांचे प्रमाण देखील दिसून येते व मानसिक  महामारीच्या प्रादुर्भाव काळात  स्वास्थ्य उत्तम राखणे आणि त्याद्वारे रोग आरोग्य विभाग, जि.प. पालणार या मार्फत विविध उपक्रम सुरू आहेत.  यामध्ये १६५ आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून आरोग्य सेवा गावोगावी पोहचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून आज रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर च्या माध्यमातून आरोग्य केंद्र आरोग्य  वर्धिनी केंद्र आणि विशेषत: कोव्हिड सेंटर येथे योग आणि प्राणायाम  सत्रांचे आयोजन करण्यात आले. यावेळी नियमित योगाभ्यास  केल्याने होणारे फायदे आणि मानसिक स्वास्थ्याचे महत्व याचे विवेचन करण्यात आले.

 आपले मानसिक आणि शारिरीक स्वास्थ उत्तम राखण्यासाठी योग, नमाज,  इ साधनांचा अवलंब करणे तसेच कोव्हीड विषयक नियमांचे पालन करणे हितकारक असल्याचे प्रतिपादन  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दयानंद सूर्यवंशी यांनी दिली.

राहुल गांधी ह्यांच्या वाढ दिवसानिमित्त डहाणू येथे काँग्रेस तर्फे गरजू लोकांना अन्न धान्य वाटप .

राहुल गांधी ह्यांच्या वाढ दिवसानिमित्त डहाणू येथे काँग्रेस तर्फे गरजू लोकांना अन्न धान्य वाटप . 
     डहाणू(प्रतिनिधी):- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या वाढ दिवस काँग्रेसजनांतर्फे गरजु लोकांना अन्न धान्य वाटप करून साजरी करण्यात आला। पालघर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष केप्टन सत्यम ठाकूर यांनी आमच्या प्रतिनिधी यांना माहीती देताना सांगितले की काँग्रेस चे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी हे  देशात  जनतेचा आवाज बुलंद करणारे, गरीबांचे कैवारी, युवकांचे प्रेरणास्थान, देशाचे भविष्य असून काँग्रेस तर्फे त्यांच्या वाढदिवसा निमित्त डहाणू तालुक्यातील तणाशी गावातील खरेपाडा,पारशी पाडा,आणी भीमरपाडा येथील गरीब गरजू लोकांना अन्न धान्याचे वाटप करण्यात आले. 
           ह्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष *कॅप्टन सत्यम ठाकूर होते आणि पालघर जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष स्वप्नील पाटील ह्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. 
           ह्या वेळी पालघर जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील,डहाणू तालुका अध्यक्ष संतोष मोरे,जिल्हा युवक चिटणीस समीर चौधरी, जयदेव पाटील, प्रभाकर पाटील,महिला कार्यकर्त्यां प्राजक्ता पाटील,पंकज मिश्रा,राजन ठाकूर,संदीप यादव,सुनील चौधरी,चिनार पाटील,राकेश राऊत,आशिष किणी,विकास गोवारी,आकाश चौधरी तसेंच  काँग्रेस आणी युवक काँग्रेस चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार खासदार राहुल गांधी यांच्या वाढ दिवस हा "संकल्प दिवस"म्हणून साजरा करण्यात आला।ह्या वेळी डहाणू तहसीलदार कार्यालय समोर केंद्र सरकारच्या नवीन तीन मंजूर काळे कायदे रद्द करण्या करिता घोषणा देण्यात आल्या। या वेळी जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष केप्टन सत्यम ठाकूर,जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अशोक माळी, जिल्हा सरचिटणीस मोईज शेख,हफिजू खान,संतोष मोरे,गोवर्धन बारी,सुधाकर राऊत,नगीनदास देवा,समर्थ मल्हारी, रणछोड माह्यावंशी, चेतन माह्यावंशी व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।

मराठा क्रांती मूक मोर्चा आंदोलन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत संपन्न.

मराठा क्रांती मूक मोर्चा आंदोलन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत संपन्न.
नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे. 

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुकारलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चा आंदोलन आज नाशिक येथे गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहाजवळील मैदानावर सुरु आहे. या आंदोलनासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती नाशिकमध्ये रविवारी सायंकाळी दाखल झाले होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन सुरु झाले. या आंदोलनात पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे. विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह खासदार, आमदार यांच्यासह मान्यवरांची उपस्थितीत आहे.
सकाळपासून सुरु असलेल्या या आंदोलनासाठी काळा शर्ट, तोंडाला काळा मास्क परिधान करुन आंदोलनक सामील झाले. तर काही जण काळ्या फिती लावून आंदोलनात सहभागी झाले. मुख्यमंत्री यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा नाशिकला ठरवू असे संभाजीराजे यांनी सांगितले होते. त्यामुळे नाशिकच्या या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आंदोलनाबरोबरच नाशिकमध्ये राज्यभरातील समन्वयकांची बैठकही होणार आहे. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.
आज सुरु असलेल्या मूक मोर्चात उपस्थितीत मान्यवर आपले मनोगत व्यक्त करत आहे..
या आंदोलनात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या आंदोलनाला पाठींबा देत आपली भूमिका मांडली
पालकमंत्री छगन भुजबळ
- मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळाले पाहिजे यात कुणाच्याही मनात दुमत नाही.
- मराठा समाज आणि ओबीसीं समाज दोघेही अडचणीत
- मराठा समाजाला विरोध करण्यासाठी ओबींसींचा आक्रोश मोर्चा नाही
- काही जण मराठा समाज आणि ओबीसीमध्ये वितुष्ट निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत
- सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचे आरक्षण नाकारले, तर ओबीसींचे होतं ते रद्द केले
- सर्वांना एकत्र येऊन लढले पाहिजे
- मराठा आरक्षणासाठी कोर्टात लढतांना केंद्र सरकारची मदत गरजेची
- चर्चेशिवाय मार्ग नाही
- मी तुमच्या बरोबर आहे

Sunday, June 20, 2021

मराठा क्रांती मूक मोर्चा या आंदोलनासाठी खासदार संभाजीराजे नाशिक मध्ये दाखल.

मराठा क्रांती मूक मोर्चा या आंदोलनासाठी खासदार संभाजीराजे नाशिक मध्ये दाखल.

 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुकारलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चा आंदोलन २१ जून रोजी नाशिक येथे होणार आहे. या आंदोलनासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती नाशिकमध्ये रविवारी सायंकाळी दाखल झाले आहे. त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. हा मोर्चा सकाळी १० वाजेपासून गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृह मैदानावरुन निघणार आहे.या मूक आंदोलनात जिल्ह्यातील तीन्ही मंत्र्यांसह खासदार, आमदारांना निमंत्रित केले असून आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका जाणून घेतली जाणार आहे. सकाळी तीन तास चालणा-या या आंदोलनासाठी काळा शर्ट, तोंडाला काळा मास्क परिधान करावा, हे शक्य नसेल तर किमान काळ्या फिती लावून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन राज्य समन्वय करण गायकर यांनी केले.
या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी शुक्रवारीच नांदुर नाका वरद लक्ष्मी येथे बैठक झाली. त्यानंतर या मूक मोर्चासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली. मूक मोर्चाबरोबरच नाशिकमध्ये राज्यभरातील समन्वयकांची बैठक होणार आहे. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

वृद्धाश्रमात साजरा केला पालघर शिवसेनेने वर्धापनदिन. पालघर (प्रतिनिधी)

*वृद्धाश्रमात साजरा केला पालघर शिवसेनेने वर्धापनदिन*
पालघर (प्रतिनिधी)

पालघर शिवसेना जिल्ह्याच्या वतीने शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिन कोविड  या महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
यावेळी शिरगाव येथील आनंद वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांशी संवाद साधून प्रीतीभोजनाचे आयोजन करण्यात आले. वृद्धांसोबत गाणे गाऊन,मनोरंजन करून त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली, यावेळी पालघर जिल्हा शिवसेना प्रमुख श्री.राजेशभाई शाह,पालघर विधानसभा आमदार श्री.श्रीनिवास वनगा,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती भारती कामडी,जिल्हा महिला संघटक श्रीमती ज्योती मेहेर,पालघर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री.उत्तम घरत,जि. प.माजी महिला बालकल्याण सभापती श्रीमती नमिता राऊत,माजी कृषी सभापती श्री. सुशील चुरी,नगरपरिषद चे बांधकाम सभापती श्री.रवींद्र म्हात्रे,जि. प. सदस्य श्रीमती वैदेही वाढण,शहर प्रमुख भूषण संखे,महिला तालुका प्रमुख श्रीमती नीलम म्हात्रे,माजी सभापती श्रीमती मनीषा पिपंळे,शहर संघटक श्री. सुनील  महेंद्रकर, महिला शहर उपसंघटक श्रीमती मोनिका गवळी,नगरसेवक श्री.चंद्रशेखर वडे ,उपशहर प्रमुख जे.के.संखे आदी उपस्थित होते,
आनंद वृद्धाश्रमाच्या संचालिका श्रीमती मनीषा कोटक व श्री कोटक यांनी सर्वांचे स्वागत केलं आणि माहिती दिली,
यावेळी जिल्हाप्रमुख श्री.राजेशभाई शाह व आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले तसेच पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे,बिस्किटे वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ.दिनकर गावीत व डॉ.सचिन,श्री.ललित जैन, श्री.निलेश राऊत,श्री.हरीश वझे,श्री.राज घोलप,श्री.रामदास गुप्ता आदी उपस्थित होते.

विरार - नालासोपारा पावसाळ्यातील समस्या ?मा. खासदार राजेंद्र गावीत साहेबांनी केली पाहणी .

विरार - नालासोपारा पावसाळ्यातील समस्या ?

मा. खासदार राजेंद्र गावीत साहेबांनी केली पाहणी .
विरार ( हिरालाल लोखंडे  ) सुमारे आठ ते दहा दिवसापासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे व वसई - विरार - नालासोपारा भागाचे  मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेल्या सखल भागातील, पाण्याचा नैसर्गिक रीतीने वाहून जाण्यासाठी असलेले नैसर्गिक प्रवाह मार्ग ( नाले , मोठ्या गटारी  ) बंद झाल्याने, शहरांतील सखल भागात पाणी साचून राहत असल्याने, तेथे राहत असणार्‍या लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
 अतिवृष्टीमुळे नालासोपारा शहरातील तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे झालेले मालमत्तेचे नुकसान - झालेली गैरसोय, दूर करण्यासाठी व कोणत्या उपाययोजना त्वरीत करता येतील. जेणेकरून पावसाळी पाण्याचा निचरा जलदगतीने होउन शहरी भागातील नागरिकांना पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही. या बाबत दिनांक १८ जुन २०२१ रोजी मा. राजेंद्र गावीत खासदार पालघर यांनी वसई - विरार महानगरपालिका अभियंते व सक्षम अधिकारी वर्गासह पाणी निचरा न होणार्‍या भागाची पाहणी करून ,योग्य त्या सुचना वजा आदेश दिले. 
    आचोळे - नालासोपारा पुर्व येथील जया पॅलेस भागातील समस्या, पावसाळी पाण्याचा निचरा योग्य रितीने न होणे, नागरिकांच्या मालमत्तेचे होणारे नुकसान तसेच वाहतूक व्यवस्थेला होणारे अर्थिक नुकसान या संर्दभात माहिती व निवेदन, श्री प्रदीप सावंत- शिवसेना शहर प्रमुख, रोहन चव्हाण - युवासेना विधानसभा अधिकारी यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने मा. खासदार साहेबांना देण्यात आले. या वेळी श्री किरण चेंदवणकर - जिल्हा संघटक, श्री विनायक निकम - वाहतूक सेना उपजिल्हा संघटक, उपजिल्हा प्रमुख, प्रवीण म्हाप्रळकर, नविन दुबे, पंकज देशमुख, सुरेंद्र सिंह, भरत देवघरे, मलर वणन, कुणेश्वर शर्मा, विनोद  पार्टे, दिपाली राणे - महिला आघाडी विभाग संघटक, अनिता शिवकर - उपविभाग संघटक, तसेच मान्यवन - प्रतिष्ठित नागरिक, अनेक शिवसैनिक, युवा शिवसैनिक आजी -  माजी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते

Friday, June 18, 2021

सामाजिक भावनेतून रस्त्यांचे बांधकाम, मा. श्रीनिवास वनगा आमदार व श्री राजेशभाई शाह शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते लोकार्पण.

सामाजिक भावनेतून रस्त्यांचे बांधकाम, 
 मा. श्रीनिवास वनगा आमदार व श्री  राजेशभाई शाह शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते लोकार्पण. 
पालघर ( हिरालाल लोखंडे ) समाजाला आपले काही देणे लागते, समाजामुळे आपण आहोत, या सामाजिक भावनेतून श्री भास्कर, मोक्ष सर्जिकल कंपनीचे मालक श्री रघु शेट्टी आदेश्वर मेडीटेक्स च्या संचालिका श्रीमती आशा राऊत, संचालक श्री शैलेश राजपुरे, श्री गणपती अय्यर, श्री पुजारी, श्री बबलू मिश्रा यांच्या पुढाकाराने माहीम - सावरेपाडा ता,जि पालघर येथील खाजगी रस्ता ( अंदाजे २००मिटर )मजबूती करण / खडी करण करून मा.श्रीनिवास वनगा पालघर विधानसभा आमदार, श्री राजेशभाई शाह पालघर शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते आज दिनांक १८ जून २०२१ रोजी लोकार्पण करण्यात आला. 
 या प्रसंगी श्री नरेश चौधरी माजी सरपंच माहीम, श्री विशाल बरड ग्रा,पं.सदस्य माहीम. श्री सागर भूतखडे / श्री रंजन प्रहर, माजी ग्रा,पं.सदस्य माहीम. सुधिर जैन /  श्री गौतम जैन आदि सामाजिक 
कार्यकर्ते उपस्थित होते. 
माहीम - सावरेपाडा दरम्यान रस्त्यासाठी ७५ लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला असून, चींतुपाडा व परिसरातील रस्ते या साठी शासनदरबारी प्रस्ताव प्रस्तावित केले असल्याचे आमदार वनगा साहेब यांनी सांगितले. अशी माहीत कार्यक्रम सुत्रसंचालक श्री निलेश राऊत यांच्या कडुन मिळत आहे.

नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी MIND MASTERY (मांईंड मास्टरी)बाबत समुपदेशनाचे ऑनलाईन मार्गदर्शन सत्र

*नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी MIND MASTERY (मांईंड मास्टरी)*
*बाबत समुपदेशनाचे ऑनलाईन मार्गदर्शन सत्र*

ठाणे दि.18 (प्रतिनिधी) :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र,  ठाणे व सह्योग कॉलेज ऑफ मँनेजमेंट स्टडिज, ठाणे यांचे मार्फत दिनांक 21 जून 2021 (सोमवार)  रोजी  दु. 3.00 वाजता नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी  MIND MASTERY (मांईंड मास्टरी) या विषयावर समुपदेशनाचे ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सत्रास श्रीमती योगिता सणस, (Motivationl Speaker) आदित्य एज्युकेशन अँड ट्रेनिंग सिस्टम हया मार्गदर्शन करणार असून  सदर सत्र झूम अँपव्दारे (Meeting ID-2999467094, Password- 1234) किंवा युटयुब चँनल व्दारे                                  (https://www.youtube.com/channel/UCmyeetS7XKK4DjKg5s0BFMg या लिंकवर आयोजित करण्यात येणार आहे. तरी नोकरी इच्छुक सर्व उमेदवारांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन                    श्रीमती कविता ह जावळे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे यांचे मार्फत करण्यात येत आहे.

रेल्वे उड्डाणपूल बांधताना स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन बांधावा -- मा. राजेंद्र गावीत खासदार

रेल्वे उड्डाणपूल बांधताना स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन बांधावा -- मा. राजेंद्र गावीत खासदार 
 ( हिरालाल लोखंडे )
 बोईसर पूर्व पश्चिम भागाला जोडणारे रेल्वे लेव्हल क्रॉसिंग क्रमांक ५२,ऐवजी नवीन उड्डाणपूल बांधण्यासाठी महाराष्ट्र शासन व रेल्वे विभागाने ५०:५० टक्के खर्च करावयाचा आहे. स्थानिक वंजार वाडा व काटकर पाडा येथील जनतेला नियोजित आराखडा मान्य नाही. 
  दिनांक १७ जून २०२१रोजी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, मा, राजेंद्र गावीत साहेब खासदार - पालघर यांच्या अध्यक्षते खाली श्री देशपांडे साहेब रेल्वे उपप्रकल्प व्यवस्थापक ( डी, एफ, सी, सी, आय, एल, ) अधिकारी .श्री शंखपाळे -कार्यकारी अभियंता पी, डब्ल्यू, डी. श्री किणी साहेब उपविभागीय अभियंता पी, डब्ल्यू डी. पालघर. श्री केदार काळे शिवसेना सहसमन्वयक पालघर लोकसभा. श्री सुरेश कदम पोलीस निरीक्षक बोईसर. आजी -.माजी लोकप्रतिनिधी, पंचायत समिती सदस्य, सरपंच, स्थानिक ग्रामस्थ / प्रतिनिधी यांच्या सह बैठकीत रेल्वे लेव्हल क्रॉसिंग क्रमांक ५२ फाटक कायम स्वरूपी बंद होणार असल्याने, त्या ठिकाणी एक भुयारी मार्ग असावा. त्यामुळे दुचाकी व चार चाकी वाहनाना पुर्व - पश्चिम जाता - येता येईल. नियमित पणे वापरात असलेल्या रस्त्याला बाधा न येता उड्डाणपूल करण्यात यावा. 
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने १५ फेब्रुवारी २०१८ ला उड्डाणपूलाला शासकीय मान्यता दिली असली तरी स्थानिक जनतेचा आजही विरोध कायम आहे. असे खासदार यांना सांगितले. या वेळी  गावीत साहेबांनी अधिकारी व जनतेचे म्हणणे ऐकून घेतले. व सांगितले, जनतेच्या मागणी प्रमाणे  उड्डाणपूल अधिकारी वर्गाने तयार करावा. विकास कामे होत असताना जनतेनेही सहकार्य करावे. मी या विषयावर स्थानिक जनते सोबत आहे.

पालघर शहरात मच्छिमार बांधवांना व्यवसायासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याबाबत

पालघर (प्रतिनिधी): पालघर शहरात मच्छिमार बांधवांना व्यवसायासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याबाबत आज दिनांक १८/०६/२०२१ रोजी वरील विषयंतर्गत निवेदन मा.मुख्याधिकारी न.प पालघर व गटनेता मा.कैलास म्हात्रे नगरसेवक यांना देण्यात आले. आपणास कळविण्यात येते की कोविड १९ च्या प्रादुर्भावाने कित्येक उद्योगधंद्यावर वाईट परिणाम होऊन त्यांच्यावर उपजिविका करणाऱ्या लोकांचे उपासमारीने हाल होत असताना पालघर शहरात जुना पालघर येथे मासळी बाजारासाठी दिलेली जागा लहान असल्याने बरचश्या मच्छिमार भगिनी पालघर स्टेशन  च्या समोर काही मच्छीमार भगिनी माहीम रोड ,हायवेलगत जागेवर आपला मासे विकण्याचा व्यवसाय कित्येक वर्षांपासून करित आहेत परंतु नगर परिषदेने गेल्या २-४ दिवसापूर्वी त्यांच्यावर करवाई करून मच्छीमार भगिनिंच्या माश्यांच्या पाट्या लाथ मारून फेकून देण्यात आल्या सदर प्रकरण गंभीर असून ज्या व्यवसायावर उदरनिर्वाह होत असताना त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तरीही रिपाई (आ)पालघर जिल्ह्याच्या वतीने निवेनाद्वारे मागणी करीत आहोत ज्या अधिकाऱ्याने मच्छीमार भगिनीवर अन्याय केला आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व मच्छीमार भगिनींना कायमसवरूपी व्यवसाय करण्यासाठी ताबडतोब जागा उपलब्ध करून देण्यात यावी असे निवेदन देण्यात आले त्या समयी पालघर जिल्हाध्यक्ष मा.सुरेश जाधव, उपाध्यक्ष कुंदन मोरे, शहर उपाध्यक्ष राम ठाकूर ई. मान्यवर उस्थितीत होते*

Thursday, June 17, 2021

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या मार्फत संत सावतामाळी रयत बाजार अभियान अंतर्गत शेतकऱ्यांनी पिकवावे आणि शेतकऱ्यांनी च विकावे

बोईसर (प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या मार्फत संत सावतामाळी रयत बाजार अभियान अंतर्गत शेतकऱ्यांनी पिकवावे आणि शेतकऱ्यांनी च विकावे(विकेल ते पिकेल) या योजनेला चालना मिळावी व शेतकऱ्याचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभाग पालघर व आत्मा योजने अंतर्गत कुकडे गारगाव रोडवर शेतकरी गटाचे श्री. आशाद बंन्ने शेख. यांच्या MREGS अंतर्गत शेततळे मधील उच्च दर्जाचे मृगला. कटला. थेलेपिया. या प्रजातीचे  १ ते १.५ टन मासे विक्रीस उपलब्ध आहेत. परिसरातील लोकांना ताजे मासे उपलब्ध होण्याकरिता गावात विक्री स्टॉल .वाण. वेळापत्रक तयार करण्यात आले. सदर विक्री स्टॉल ला कृषी व आत्मा कडून वजन काटा. रॅक फोल्डेबल. आणि छत्री श्री शेख यांना देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. काशिनाथ तरकसे, उपविभागीय कृषि अधिकारी श्री. दिलीप नेरकर,  तालुका कृषि अधिकारी श्री तरुण वैती.... यांचे मार्गदर्शन श्री शेख ला वेळो वेळी मिळत  होते।
     सदर कार्यक्रमात माननिय. मंडळ कृषि अधिकारी पालघर. कृषी पर्यवेक्षक . सुधीर गावड. यांनी मार्गदर्शन केले आणि कृषी सहाय्यक... प्रतिभा लोंढे. रेखा पाटिल. तनुजा मुकणे. काजल भाताडे. प्रीतम गोवारी. रक्षित पाटिल.यांनी सहकार्य केले.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील १४ दिवसांपासून कामावरून बाहेर काढलेल्या २१४ कामगारांना अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हस्तक्षेपाने कामावर केले पुन्हा रुजू.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील १४ दिवसांपासून कामावरून बाहेर काढलेल्या २१४ कामगारांना अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हस्तक्षेपाने कामावर केले पुन्हा रुजू. 

 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे. 

ईगतपुरी:- ईगतपुरी येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील २१४ कामगारांना कामावरून काढून टाकले होते यावेळी या कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस सचिन गोळे यांची भेट घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युनियन ची स्थापना करण्यात आली होती. आज ईगतपुरी येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या प्लांटला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन भाऊ गोळे व नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी कंपनीला भेट देऊन कंपनीतील मॅनेजमेंट सी कामगारांना कामावरून कमी केल्याबद्दल जाब विचारला व कामगारांना लवकरात लवकर कामावर घेऊन सर्व कामगारांना शासकीय नियमानुसार पगार व सर्व सुविधा देण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभे करेल यावेळी धुळे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत मॅनेजमेंट व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे प्रदेश सचिव सचिन गोळे व पदाधिकारी यांच्यात चर्चा होऊन सर्व कामगारांना उद्यापासून कामावर घेऊन शासकीय नियमानुसार सर्व सुविधा कामगारांना दिल्या जातील अशी लेखी हमी दिली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सचिव सचिन गोळे, मनसेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष दिलीप भाऊ दातीर मनसेचे उपतालुका अध्यक्ष भोलेनाथ चव्हाण मनविसे तालुका अध्यक्ष प्रताप जाखेरे ईगतपुरी शहर अध्यक्ष सुमित बोधक विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राज जावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कामगारांनी या निर्णयाचे स्वागत करुन आनंद व्यक्त केला यावेळी सर्व कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सचिव सचिन गोळे व सर्व पदाधिकारी चे आभार मानले व कामगारांच्यावतीने सर्वच पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

Wednesday, June 16, 2021

रायगड सरकारी जिल्हा रुग्णालयाचे डॉ.सुहास माने यांची पदावरून बडतर्फ करून हाकलपट्टी करण्याची मागणी. शिवराज्य ब्रिगेड संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जगदीश घरत यांनी केली

रायगड सरकारी जिल्हा रुग्णालयाचे डॉ.सुहास माने यांची पदावरून बडतर्फ करून हाकलपट्टी करण्याची मागणी.
जिल्हा अध्यक्ष जगदीश घरत  यांनी केली
रायगड (प्रतिनिधी) सरकारी जिल्हा रुणाल्यातील सर्व धुरा हातात घेतल्या पासून डॉ.सुहास माने यांनी आपल्या पदाचा मनमानी पद्धतीने वापर करून कंत्राटी कामगार यांचा देखील छळ केला आहे .तसेच त्यांनी खरच ज्याठिकाणी डॉक्टर ची गरज आहे तिथे न पाठवता दुसरीकडे पाठवणे असा मनमानी पद्धतीने कारभार सुरू केला होता.ओम साई मंडल कर्जत यांनी देखील तक्रार दाखल केली होती. तसेच  कोरोना काळामध्ये अनेक अशी कृत्यकेली आहेत.की यामुळे सर्व सामान्य जनतेचे हाल झाले आहेत.ह्यांच्या विरोधात जिल्हाधीकारी कार्यालयात ह्या डॉक्टर विरोधात अनेकतक्रारी दाखल झाल्या होत्या पण ह्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे ह्या डॉक्टर ची हिम्मत जास्त वाढली .त्यांनी कोरोना मध्ये रुग्णांना ने आण करण्यासाठी सरकारी रुग्णवाहिनी असताना देखील त्यांनी कोणालाही दिली नाही .ह्या भागात ह्याच डॉक्टर विरोधात सोशल मीडियावर व रायगड जिल्ह्यात जनतेच्या चर्चेत हा विषय असायचा पण यांच्या विरोधात कोणीही पाऊल उचले नाही .ह्यासर्व गोष्टीची जाणीव रायगड जिल्हा मधील  शिवराज्य ब्रिगेड संघटनेचे  जिल्हाअध्यक्ष  जगदीश घरत यांच्या कानावर येताच त्यांनी ह्या प्रकरणाची चौकशी करून घेतली व लगेच त्यांनी एक संघटने चे पत्र तयार करून .अलिबाग चे आमदार महेंद्र दळवी यांना व निवासी जिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाड यांना हे निवेदन दिले .ह्या निवेदनात डॉक्टर यांनी जनतेसोबत जी वागणूक केली आहे  व त्यांनी केलेला सर्व गोंधळ ह्या निवेदनात नमूद करून त्यांची  असलेल्या पदावरून हकलपट्टीकरून  ह्या  पदावरून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.ही लवकरात लवकर व्हावी यासाठी ते याचा पाठपुरावा करून घेतील असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 18 जून पर्यंत मुदतवाढ

*परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी*
 *18 जून पर्यंत मुदतवाढ*

ठाणे दि.16 (प्रतिनिधी) :- अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाच्या (पी.एच.डी.) अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेंतर्गत 2021-2022 शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांकडून परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 जून 2021 पर्यंत होती. यात मुदतवाढ करण्यात आली असून आता 18 जून 2021 पर्यंत या योजनेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त (पुणे) डॉ. प्रशांत नारनवरे (भा.प्र.से.) यांनी केले आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात अध्ययनासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी. साठी जागतिक स्तरावर तीनशेच्या आतील रँकमधील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याने नमुन्यातील अर्ज swfs.applications.2122@gmail.com या ई-मेलवर पाठवून त्याची प्रत मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण आयुक्तालय, चर्चपथ, महाराष्ट्र राज्य, पुणे – 411001 या पत्त्यावर द्यावी.
या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेचे शिक्षण शुल्क, निर्वाह भात्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहे. एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ही शिष्यवत्ती लागू राहणार नाही. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे आणि पी.एच.डी. साठी 40 वर्षे कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एम.डी. आणि एम.एस. अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील. तसेच वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा जास्त नसावे.

शिष्यवृत्ती अर्ज करणेसाठी मुदतवाढ**अंतिम मुदत दिनांक 30 जून पर्यंत*

*शिष्यवृत्ती अर्ज करणेसाठी मुदतवाढ*
*अंतिम मुदत दिनांक 30 जून पर्यंत* 

ठाणे दि.16 (प्रतिनिधी) :- शासनाच्यावतीने MahaDBT प्रणालीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2020-2021 चे ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची मुदत पुन्हा वाढविण्यात आली असुन 30 जून 2021 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवत्ती करीता अज्र करावेत. सदर मुदत ही अंतिम असुन विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज करावेत असे आवाहन मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, श्रीमती वंदना कोचुरे यांनी केले आहे.
शासनमार्फत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण फी व परिक्षा फी, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यावेतन योजना, राजर्षी शाहु गुणवत्ता शिष्यवृत्ती, भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती इ. योजना राबविल्या जातात. सदर योजनेकरीता विद्यार्थी MahaDBT या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करुन शकतात.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ही अर्ज केलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी तसेच ज्या विद्यार्थ्यांचे त्रुटी अभावी अर्ज प्रलंबित आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी सदर मुदत वाढीचा लाभ घ्यावा. मुंबई विभागातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे अर्ज त्वरीत निकाली काढावेत. शिष्यवृत्ती पासुन कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही या दृष्टीने संबंधित प्राचार्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, श्रीमती वंदना कोचुरे यांनी केले आहे.

स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत प्रमुख पिकांची मूल्यसाखळी विकसीत करण्यासाठी अमेरिकेच्या कृषी विभागासोबत करार

*‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत प्रमुख पिकांची मूल्यसाखळी विकसीत करण्यासाठी अमेरिकेच्या कृषी विभागासोबत करार*
-         *कृषी मंत्री दादाजी भुसे*
मुंबई, (प्रतिनिधी)दि. १६: अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्यात मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन ( स्मार्ट) प्रकल्प राबविण्यात येत असून त्यामाध्यमातून प्रमुख पिकांच्या स्पर्धाक्षम आणि सर्व समावेशक मूल्यसाखळी विकसीत करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज राज्य शासनाचा कृषी विभाग आणि अमेरिकेचा कृषि विभाग यांच्यात राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आणि अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत डेविड रांझ यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
महाराष्ट्र आणि अमेरिकेच्या कृषि विभागात परस्पर तांत्रिक सहकार्यासाठी हा सामंजस्य करार झाला. कृषिमंत्री श्री. भुसे  यावेळी म्हणाले कि, या कराराच्या माध्यमातून कृषि क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी धोरण राबविण्यासाठी टाकण्यात आलेले महत्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार  राज्यात "विकेल ते पिकेल" अभियानाच्या माध्यमातून बाजाराभिमुख पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतानाच त्या शेतमालासाठी निश्चित अशी बाजार व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे.

त्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्यातून मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन ( स्मार्ट) प्रकल्प राबविण्यात येत असून प्रमुख पिकांच्या स्पर्धाक्षम आणि सर्व समावेशक मूल्यसाखळ्या विकसीत करण्यात येणार आहे. याकामी अमेरिकेचा कृषी विभाग तांत्रिक सहकार्य करणार आहे. या कराराच्या माध्यमातून राज्याच्या कृषि विभागाची क्षमताबांधणी करण्यात येईल. कृषि पणन, बाज़ार माहिती आदी बाबींमध्ये क्षमताबांधणीसाठी काम केले जाईल, असेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.

अमेरिकेचे वाणिज्य दूत डेविड रांझ म्हणाले कि, आज करण्यात आलेला सामंजस्य करार हा महत्वाकांक्षी असून अमेरिकेच्या कृषि विभागाचा भारतातील राज्य सरकार सोबतचा पहिला करार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामाध्यमातून द्विपक्षीय क्षमताबांधणी करण्यात येईल. अमेरिकेचे कृषि क्षेत्रात मोलाचे योगदान असून जागतिक अन्नसुरक्षा आणि कापूस तसेच इंधनाची वाढती मागणी या क्षेत्रात संयुक्तरित्या काम करण्यास फार मोठा वाव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  

राज्याचे कृषि आयुक्त धीरज कुमार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अमेरिकेच्या वाणीज्यदूतातील कृषी तज्ञ लॅझारो सँडवाल, ध्रुव सूद, श्रीमती सुमेधा रायकर-म्हात्रे, कृषी विभागाचे उपसचिव सुशील खोडवेकर, अतिरिक्त प्रकल्प संचालक दशरथ तांभाळे, सहसचिव श्रीकांत आंडगे आदी उपस्थित होते.

Tuesday, June 15, 2021

अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांनी 30 जुन 2021 पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज सादर करावे.

अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांनी 30 जुन 2021 पर्यंत 
विहीत नमुन्यात अर्ज सादर करावे.

पालघर(प्रतिनिधी) दि 15 :- मा. अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांनी सन 2021-22 या अर्थिक वर्षात न्युक्लिअस बजेट योजने अंतर्गत खालील योजनांना तत्वा मान्यता दिलेली आहे. त्यानुसार अनुसुचित जमातीच्या लाभार्थी / बचत गटांची निवड करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार जि. पालघर या कार्यालया अंतर्गत असलेल्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा या चार तालुक्यातील अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी "अ" गटातील योजना राबविण्यासाठी  लाभार्थ्यांनी  खालील अटी व शर्तीच्या अधिन राहुन कागदपत्रांसह अर्ज या कार्यालयात दिनांक 15 जुन 2021 ते दिनांक 30 जुन 2021 या कालावधीत विहीत नमुन्यात सादर करण्यात यावे.
योजनेचे नाव पुढील प्रमाणे आहेत. : 
1) अनुसुचित जमीतीच्या  शेतकऱ्याने लागवड केलेल्या क्षेत्रास तारेचे कुंपण तयार करण्यासाठी अर्थसहाय्य देणे.
2) आदिवासी महिला बचत गटांना नागली, वरई इतर पापड तयार करण्यासाठी अर्थसहाय्य देणे.
3) अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांना 250 मोगरा लागवड ठिबक सिंचन व तारेचे कुंपण इ. करण्यासाठी अर्थसहाय्य देणे.(क्लस्टर पध्दतीनुसार)
4) अनुसुचित जमातीच्या  बचतगटास  विविध व्यवसाय करण्यासाठी डिबीटीच्या माध्यमातुन अर्थसहाय्य देणे.
5) अनुसुचित जमातीतील ज्या लाभार्थ्यांचे शिलाई मशिन प्रशिक्षण पुर्ण झालेले आहे अशा लाभार्थ्यांना शिलाई मशिन खरेदी करणेसाठी अर्थसहाय्य देणे.
6) अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना गिनीराईस मिल व घरघंटी खरेदी करण्यासाठी डिबीटीच्या माध्यमातुन अर्थसहाय्य देणे.
7) अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना विविध व्यवसाय करण्यासाठी डिबीटीच्या माध्यमातुन अर्थसहाय्य देणे.
8) अनुसुचित जमातीच्या वनहक्क लाभार्थ्यांना वनपट्टा सपाटीकरण तसेच लागवड व इतर अनुषंगीक कामांसाठी अर्थ सहाय्य देणे.
उपरोक्त योजना राबविण्यासाठी लाभार्थ्यानी जोडवयाची कागदपत्रे खालील प्रमाणे.
1)   विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरलेला असावा व अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडलेली असावीत.
      अ) दारिद्र रेषेखालील दाखला (ग्रामसेवकाने प्रमाणित केलेला (नजिकच्या काळातील)
      ब) जातीचा दाखला.
      क) रहिवासी दाखला (ग्रामसेवकाने प्रमाणित केलेला (नजिकच्या काळातील) 
      ड) विद्युत देयकाची छायाप्रत.         
      ई) ग्रामसभेचा ठराव.
      फ) यापूर्वी न्यु.ब.योजनेतंर्गत कोणत्याही योजनेअंतर्गत कोणताही लाभ घेतला नसल्याबाबतचे ग्रामसेवकाचा दाखला.
      ज) घर स्वत:चे नांवावर असल्याबाबत घराच्या कराची पावती. 
      म) अर्जावर दोन पासपोर्ट आकाराचे फोटो स्टॅपलरने लावलेले असावेत.
      ग) लाभार्थी अपंग/विधवा/परितक्त्या/निराधार महिला यांनी अर्जामध्ये तसा स्पष्ट उल्लेख केलेला असावा.
टिप :- लाभार्थ्यांना व्यक्तिश: एकाच योजनेकरीता अर्ज दिला जाईल व एकाच योजनेकरीता अर्ज करता येईल, प्रकल्प कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज मोफत उपलब्ध आहे. 
महत्वाची सुचना :- प्रकल्प कार्यालयात यापुर्वी सादर केलेले सर्व अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे इच्छुकांनी नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्जदाराने एखाद्या योजनेकरीता अर्ज केला तो त्या योजनेस पात्र झाला असे नाही. असे आवाहन अशिमा मित्तल (भा.प्र.से) प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार जि. पालघर यांनी केले आहे.

लिंग विनिश्चित वीर्य मात्रा :- पशु पालकांसाठी नवी संजीवनी व 90 टक्के उच्च वंशावळीच्या मादीची निर्मिती

लिंग विनिश्चित वीर्य मात्रा :- पशु पालकांसाठी नवी संजीवनी व 
90 टक्के उच्च वंशावळीच्या मादीची निर्मिती
पालघर (प्रतिनिधी)दि. 15 :- राज्यातील गायी व म्हशी मधील दुध उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीकोनातून गायी व म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमासाठी लिंग विनिश्चित वीर्य मात्रा वापर करून उच्च अनुवंशिकते च्या कालवडी / पारड्या ची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यात 90% उच्च वंशावळीची मादी वासरांची निर्मिती होणार आहे. सदर वीर्य मात्रा ह्या पशु पालकांना केवळ 81 रुपयांना उपलब्ध होणार आहे. असे महाराष्ट्र राज्याचे पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री श्री सुनील केदार यांनी लिंग विनिश्चित वीर्य मात्रा उत्पादन व पुरवठा कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.
जिल्ह्यातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्था, फिरते पशु चिकित्सालया द्वारे व जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र पालघर या कार्यालयामार्फत सदर वीर्य मात्रा ह्या पशु पालकांना मागणी नुसार व त्यांच्या कडील उपलब्ध असणाऱ्या जातनिहाय गायी व म्हशींप्रमाणे पुरविण्यात येणार आहेत. कृत्रिम रेतनाद्वारे जन्मास येणाऱ्या अतिरिक्त नर वासरांचे संगोपन करण्यासाठी पशु पालकांना अनावश्यक खर्चाचा भार सहन करावा लागत होता. परंतु या तंत्रज्ञाना मुळे आता सदर भार हा कमी होणार आहे. पारंपारिक वीर्य मात्रांच्या वापरा ऐवजी जर ह्या अत्याधुनिक तंत्रज्ञाना चा वापर करून वीर्य मात्रांचा क्षेत्रीय स्तरावर गायी व म्हशीमध्ये वापर केल्यास 90 % मादी वासरांची निर्मिती करणे शक्य होईल.
ज्या शेतकऱ्यांच्या गायी व म्हशी मध्ये लिंग विनिश्चित वीर्य मात्रा वापरून कृत्रिम रेतन केले आहे अश्या शेतकऱ्यास रु. 40/- अधिक कृत्रिम रेतानासाठी शासनास देय असलेले सेवाशुल्क रु. 49/- असे फक्त रु. 81/- च अदा करावे लागणार आहे.
सदर तंत्रज्ञानामुळे उच्च वंशावळीच्या कालवडीची निर्मिती होणार असल्याने भविष्यात निश्चितच दुध उत्पादन वाढेल व जिल्ह्यातील आदिवासी पशु पालकांना या मार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पालघर डॉ. प्रशांत ध. कांबळे यांनी केले आहे.