Tuesday, June 15, 2021

अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांनी 30 जुन 2021 पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज सादर करावे.

अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांनी 30 जुन 2021 पर्यंत 
विहीत नमुन्यात अर्ज सादर करावे.

पालघर(प्रतिनिधी) दि 15 :- मा. अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांनी सन 2021-22 या अर्थिक वर्षात न्युक्लिअस बजेट योजने अंतर्गत खालील योजनांना तत्वा मान्यता दिलेली आहे. त्यानुसार अनुसुचित जमातीच्या लाभार्थी / बचत गटांची निवड करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार जि. पालघर या कार्यालया अंतर्गत असलेल्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा या चार तालुक्यातील अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी "अ" गटातील योजना राबविण्यासाठी  लाभार्थ्यांनी  खालील अटी व शर्तीच्या अधिन राहुन कागदपत्रांसह अर्ज या कार्यालयात दिनांक 15 जुन 2021 ते दिनांक 30 जुन 2021 या कालावधीत विहीत नमुन्यात सादर करण्यात यावे.
योजनेचे नाव पुढील प्रमाणे आहेत. : 
1) अनुसुचित जमीतीच्या  शेतकऱ्याने लागवड केलेल्या क्षेत्रास तारेचे कुंपण तयार करण्यासाठी अर्थसहाय्य देणे.
2) आदिवासी महिला बचत गटांना नागली, वरई इतर पापड तयार करण्यासाठी अर्थसहाय्य देणे.
3) अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांना 250 मोगरा लागवड ठिबक सिंचन व तारेचे कुंपण इ. करण्यासाठी अर्थसहाय्य देणे.(क्लस्टर पध्दतीनुसार)
4) अनुसुचित जमातीच्या  बचतगटास  विविध व्यवसाय करण्यासाठी डिबीटीच्या माध्यमातुन अर्थसहाय्य देणे.
5) अनुसुचित जमातीतील ज्या लाभार्थ्यांचे शिलाई मशिन प्रशिक्षण पुर्ण झालेले आहे अशा लाभार्थ्यांना शिलाई मशिन खरेदी करणेसाठी अर्थसहाय्य देणे.
6) अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना गिनीराईस मिल व घरघंटी खरेदी करण्यासाठी डिबीटीच्या माध्यमातुन अर्थसहाय्य देणे.
7) अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना विविध व्यवसाय करण्यासाठी डिबीटीच्या माध्यमातुन अर्थसहाय्य देणे.
8) अनुसुचित जमातीच्या वनहक्क लाभार्थ्यांना वनपट्टा सपाटीकरण तसेच लागवड व इतर अनुषंगीक कामांसाठी अर्थ सहाय्य देणे.
उपरोक्त योजना राबविण्यासाठी लाभार्थ्यानी जोडवयाची कागदपत्रे खालील प्रमाणे.
1)   विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरलेला असावा व अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडलेली असावीत.
      अ) दारिद्र रेषेखालील दाखला (ग्रामसेवकाने प्रमाणित केलेला (नजिकच्या काळातील)
      ब) जातीचा दाखला.
      क) रहिवासी दाखला (ग्रामसेवकाने प्रमाणित केलेला (नजिकच्या काळातील) 
      ड) विद्युत देयकाची छायाप्रत.         
      ई) ग्रामसभेचा ठराव.
      फ) यापूर्वी न्यु.ब.योजनेतंर्गत कोणत्याही योजनेअंतर्गत कोणताही लाभ घेतला नसल्याबाबतचे ग्रामसेवकाचा दाखला.
      ज) घर स्वत:चे नांवावर असल्याबाबत घराच्या कराची पावती. 
      म) अर्जावर दोन पासपोर्ट आकाराचे फोटो स्टॅपलरने लावलेले असावेत.
      ग) लाभार्थी अपंग/विधवा/परितक्त्या/निराधार महिला यांनी अर्जामध्ये तसा स्पष्ट उल्लेख केलेला असावा.
टिप :- लाभार्थ्यांना व्यक्तिश: एकाच योजनेकरीता अर्ज दिला जाईल व एकाच योजनेकरीता अर्ज करता येईल, प्रकल्प कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज मोफत उपलब्ध आहे. 
महत्वाची सुचना :- प्रकल्प कार्यालयात यापुर्वी सादर केलेले सर्व अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे इच्छुकांनी नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्जदाराने एखाद्या योजनेकरीता अर्ज केला तो त्या योजनेस पात्र झाला असे नाही. असे आवाहन अशिमा मित्तल (भा.प्र.से) प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार जि. पालघर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment