रेल्वे उड्डाणपूल बांधताना स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन बांधावा -- मा. राजेंद्र गावीत खासदार
( हिरालाल लोखंडे )
बोईसर पूर्व पश्चिम भागाला जोडणारे रेल्वे लेव्हल क्रॉसिंग क्रमांक ५२,ऐवजी नवीन उड्डाणपूल बांधण्यासाठी महाराष्ट्र शासन व रेल्वे विभागाने ५०:५० टक्के खर्च करावयाचा आहे. स्थानिक वंजार वाडा व काटकर पाडा येथील जनतेला नियोजित आराखडा मान्य नाही.
दिनांक १७ जून २०२१रोजी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, मा, राजेंद्र गावीत साहेब खासदार - पालघर यांच्या अध्यक्षते खाली श्री देशपांडे साहेब रेल्वे उपप्रकल्प व्यवस्थापक ( डी, एफ, सी, सी, आय, एल, ) अधिकारी .श्री शंखपाळे -कार्यकारी अभियंता पी, डब्ल्यू, डी. श्री किणी साहेब उपविभागीय अभियंता पी, डब्ल्यू डी. पालघर. श्री केदार काळे शिवसेना सहसमन्वयक पालघर लोकसभा. श्री सुरेश कदम पोलीस निरीक्षक बोईसर. आजी -.माजी लोकप्रतिनिधी, पंचायत समिती सदस्य, सरपंच, स्थानिक ग्रामस्थ / प्रतिनिधी यांच्या सह बैठकीत रेल्वे लेव्हल क्रॉसिंग क्रमांक ५२ फाटक कायम स्वरूपी बंद होणार असल्याने, त्या ठिकाणी एक भुयारी मार्ग असावा. त्यामुळे दुचाकी व चार चाकी वाहनाना पुर्व - पश्चिम जाता - येता येईल. नियमित पणे वापरात असलेल्या रस्त्याला बाधा न येता उड्डाणपूल करण्यात यावा.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने १५ फेब्रुवारी २०१८ ला उड्डाणपूलाला शासकीय मान्यता दिली असली तरी स्थानिक जनतेचा आजही विरोध कायम आहे. असे खासदार यांना सांगितले. या वेळी गावीत साहेबांनी अधिकारी व जनतेचे म्हणणे ऐकून घेतले. व सांगितले, जनतेच्या मागणी प्रमाणे उड्डाणपूल अधिकारी वर्गाने तयार करावा. विकास कामे होत असताना जनतेनेही सहकार्य करावे. मी या विषयावर स्थानिक जनते सोबत आहे.
No comments:
Post a Comment