कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झालेल्या कुटूंबातील व्यक्तीने
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ ऑनलाईन अर्ज सादर करावे
पालघर(प्रतिनिधी) दि. 29 : राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली (National Scheduled Castes and Development Corporation) यांच्यामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी Support for Marginalized Individuals for Livelihoods and Enterprise (SMILE) ही नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. कोविड-19 या महामारीमुळे ज्या कुटूंबातील प्रमुख व्यक्ती (Breadearner) मृत्यु पावली आहे अशा कुटुंबातील प्रमुख वारसदारास एन.एस.एफ.डी.सी, नवी दिल्ली यांचेमार्फत रु.5 लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे. त्याचा सविस्तर तपशील 1) एन.एस.एफ.डी.सी. कर्ज - रूपये 4.00 लाख व्याज दर 6 टक्के 2) भांडवली अनुदान - रू. 1.00 लाख व्याज दर 6 टक्के असा आहे.
मयत व्यक्तीची आवश्यक माहिती :
1) मयत व्यक्तीचे नांव, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, जात/पोटजात, मृत्यूची दिनांक, रेशनकार्ड, मयत झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला
2) कुटूंबातील व्यक्तींची एकुण संख्या कुटूंबातील प्रमुख वारसदार, कुटूंबातील व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न (रु. 3.00 लाखाच्या आत)
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झालेल्या कुटूंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी अथवा महामंडळाच्या ई-मेलवर पाठविण्यात यावी. सोबत लिंक - https://forms.gle/Q४८५fSUQYEuL४xUx७ असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, पालघर संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment